26 April 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Special Recipe | उकडीचे मोदक बनवा सोप्या रीतीने - पहा पाककृती

Ukadiche Modak recipe in Marathi

मुंबई, ०२ ऑगस्ट | एक महिन्यावर गणपती बाप्पाचे आगमन आले आहे आणि त्यासाठी सगळ्यांची लगबग सुरु झाली असणार. अशात बाप्पाचा आवडता मोदक बनवायची आवड प्रत्येक स्त्रीला निर्माण होते. त्यातल्या त्यात उकडीचा मोदक हा नेहमी बनवायला कठीण समजला जातो. पण मनात घेतलं तर सगळं सोपं आहे. चला , तर मग बघूया उकडीच्या मोदकाची पाककृती.

साहित्य:
* २ वाट्या नारळाचा किस
* १ +१/२ बारीक चिरलेला गूळ
* १ टिस्पून वेलची पावडर
* २ वाट्या तांदळाचे पीठ
* चिमटीभर मीठ
* २ वाट्या पाणी
* १ टेबलस्पून तूप

कृती :
१. प्रथम एका भांड्यात तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला गूळ टाकावा आणि मंद आचेवर परतून घ्यावा.
२.गूळ परतून झाला की त्यात नारळाचा किस टाकून खरपूस भाजून घ्यावा.
३. दोन्ही साहित्य नीट परतून घ्यावे आणि वरून वेलची पावडर घालून हे तयार झालेले सारणाचे मिश्रण थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवावे.
४.एका पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन , चिमूटभर मीठ घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे.
५. पाण्याला उकळी येताच , त्यात तांदुळाचे पीठ घालून चांगले ढवळावे आणि नंतर १० मिन झाकून ठेवावे.
६. नंतर मोठ्या परातीत उकड घेऊन ती मळून घ्यावी.
७. आता उकडीतून छोटा गोळा घेऊन , दोन्ही अंगठ्याच्या मदतीने खोलगट पारी करावी.
८. ह्या पारी मध्ये एक मोठा चमचा सारण घालावे आणि कडा चिमटीत पकडून मोदकाच्या कळ्या काढाव्यात.
९. आता केळीच्या पानाला तेलाचा हात लावून हे पण मोदक पात्रात ठेवावे . ह्याच पानावर प्रत्येक मोदक पाण्यात नीट भिजवून ठेवावा.
१०. आता मोदक पात्राचे झाकण लावून १५ मिन मोदक उकडून घ्यावेत.
तयार झालेले मोदक तुपाबरोबर वाढावे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ukadiche Modak recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x