28 April 2024 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

परवानगी मिळण्यासाठी गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन

MLA Gopichand Padalkar

सांगली, १५ ऑगस्ट | शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा आणि शेतीमातीसाठी एकत्र यावं लागणार आहे, अशी साद घालत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या विरोधात भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ॲागस्ट रोजी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे बंदी झुगारून शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

शर्यत परवानगीसाठी शर्यतीचे आयोजन:
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला बंदी आहे. नुकताच राज्यभरात शेतकरी विविध शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने केली. मात्र आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी थेट बैलगाडी आणि छकडा गाडी शर्यतीचे जाहीर आयोजन केले आहे. आटपाडी तालुक्यातल्या झरे या आपल्या गावी विना-लाठी काठी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या स्पर्धेसाठी थेट लाखांचे बक्षीस ही जाहीर करण्यात आले आहे.

इतर राज्यांत शर्यत, मग महाराष्ट्रात का नाही ?
याबाबत आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, गोवंश टिकला तर शेती-माती आणि गाव-माणसांच्या गोष्टी टिकतील व आपली संस्कृतीही टिकेल. देशी दुभते-दुधाळ जनावरे पाहायची असतील. तसेच येणाऱ्या पिढ्यांना सकस आहार द्यायचा असेल, बैलपोळा साजरा करायचा असेल, तर गोवंश वाढवावा लागेल. यासाठी आपल्या ग्रामीण व्यवस्थेत एक आधीपासूनच व्यवस्था आहे. ती म्हणजे बैलगाडा शर्यतीची. बैलगाडा शर्यतीमुळं शेतकरी सकस बैलांचे पोषण करतो. त्याला उत्तम प्रकारे सांभाळतो. त्यामुळेच तर आपल्या भागात खिलार सारखा गोवंश वाढला आहे. पण बैलगाडा शर्यतीवर बंदी आणून आपल्याला हा गोवंशच नामशेष करायचाय काय ? तामिळनाडू सारखा अध्यादेश महाराष्ट्र सरकारला काढता येत नाही का? असा सवाल करत शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा, शेती-मातीसाठी एकत्र यावं लागणार आहे. त्यामुळेच आपण भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे 20 ॲागस्ट रोजी आयोजन केले आहे. त्यामुळे समस्त शेतकऱ्यांनी गोवंशाच्या आस्तित्वासाठी आणि शेतकरी आस्मितेसाठी लढा देण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Gopichand Padalkar organizing bullock cart race without permission news updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x