28 April 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचा संबंध काय? | हे मला पवार साहेबांनी सांगावं - राज ठाकरे

Raj Thackeray

पुणे, २० ऑगस्ट | माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.

माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं (MNS Chief Raj Thackeray reply to Sharad Pawar over caste politics after NCP formation) :

राज ठाकरे पाचव्यांदा पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचले अन् यशवंतराव चव्हाणपण वाचले आहेत. मी जे बोललो त्याच्या माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं, असं राज म्हणाले. मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असंही त्यांनी (Raj Thackeray reply to Sharad Pawar) सांगितलं.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला. यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचले आहेत… प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे. त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं.

आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकारांचं घ्यायचं आणि.. :
जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले आहेत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Chief Raj Thackeray reply to Sharad Pawar over caste politics after NCP formation news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x