13 December 2024 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Toyota Rumion MPV | टोयोटा रुमियन लाँच, या 7 सीटर एमपीव्हीचे बुकिंग लवकरच सुरू होणार, किंमत जाणून घ्या

Toyota Rumion MPV

Toyota Rumion MVP | टोयोटाने आपली नवी रुमियन एमव्हीपी भारतात लाँच केली आहे. नवीन रुमियन एमपीव्ही मारुती सुझुकी अर्टिगावर आधारित आहे. सध्या नव्या रुमियन एमपीव्हीची किंमत आणि बुकिंगची माहिती टोयोटा कंपनीकडून येत्या काळात देण्यात येणार आहे. याची किंमत 10 लाखांच्या जवळपास असू शकते, असा अंदाज आहे.

बाह्य आणि अंतर्गत इंटेरिअर

अर्टिगाच्या तुलनेत टोयोटाच्या नव्या रुमियनमध्ये किरकोळ बदल पाहायला मिळत आहेत. बाहेरच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर नवीन बंपर देण्यात आला आहे. ग्रिल व्यतिरिक्त, ड्युअल टोन अलॉय व्हील्स, फॉग लॅम्प सराउंड देण्यात आले आहेत.

इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर टोयोटा न्यू रुमियनमध्ये नवीन ब्लॅक आऊट डॅशबोर्ड देण्यात आला आहे जो खूपच आकर्षक दिसत आहे. या नव्या मॉडेलमध्ये ७ सीट कॉन्फिगरेशनही देण्यात आले आहे.

इंजिन

नव्या रुमियन मॉडेलमधील इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने मारुतीचे १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन १०३ एचपी आणि १३७ एनएमचा जबरदस्त डार्क जनरेट करू शकते, असा दावा करण्यात येत आहे. टोयोटाचे नवे रुमियन मॉडेलही अर्टिगा मॉडेलप्रमाणेच सीएनजीवर चालेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. सीएनजीमध्ये हे इंजिन ६४.६ किलोवॅट पॉवर आणि १२१.५ एनएम टॉर्क जनरेट करू शकते. सीएनजी व्हेरियंट प्रति किलोमीटर सुमारे 26.11 किलो मायलेज देते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह जोडलेले आहे.

एमपीव्ही रेंज सतत वाढत आहे

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने याला यशस्वीरित्या बाजारात आणले आहे, त्याआधी कंपनीची एमपीव्ही रेंज, इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस आणि वेलफायर मॉडेल्स बाजारात आले आहेत. टोयोटा आणि मारुती सुझुकी या दोन्ही कंपन्या बॅज इंजिनीअरिंग पार्टनरशिप अंतर्गत अशी मॉडेल्स बाजारात लाँच करत आहेत.

News Title : Toyota Rumion MPV 7 Seater Launched check details on 10 August 2023.

हॅशटॅग्स

#Toyota Rumion MPV(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x