14 December 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

अदानी समूहाला विमानतळ न देण्याचा केरळ सरकारचा ठराव एकमतानं मंजूर

Kerala State Assembly, Passes Unanimous Resolution, Against Leasing Of Trivandrum Airport, gautam Adani

तिरुवनंतपुरम, २४ ऑगस्ट : देशातल्या सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) या कंपनीकडे सध्या मुंबई विमानतळाचा कारभार आहे. त्याचा 74 टक्के हिस्सा आता अदानींकडे येण्याची शक्यता आहे.

MIAL मध्ये GVK ग्रूपचा सर्वाधिक आहे. आता GVK कडचा 50 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा गौतम अदानी ग्रूप खरेदी करणार आहे. याशिवाय छोट्या भागिदारांकडूनही अदानी त्यांचे हक्क विकत घेईल आणि त्यांच्याकडे 74 टक्क्यांची मालकी येईल. सध्या MIAL कडे मुंबई विमानतळाची देखभाल तसंच अद्याप पूर्ण झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारीही आहे.

मोदी सरकारने याअगोदरच जयपूर, तिरुवनंतपुरम, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू आणि गुवाहाटी विमानतळं याधीच अदानी ग्रूपकडे PPP (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर चालवायला दिलेली आहेत. त्यात आता मुंबई आणि होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळाचंही काम अदानी समूहाकडे जाईल.

दरम्यान, केरळ विभानसभेने सोमवारी तिरुअनंतपुरम विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव संमत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे कंत्राट अदानी समुहाला देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. मात्र आता याविरोधात केरळ सरकारने दंड थोपटले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारने फेरविचार करावा असं म्हटलं आहे. राज्य सरकारने विमानतळाच्या कारभारातील काही वाटा अदानी समुहाला देण्याची तयारी दर्शवलेली असतानाही केंद्राने हे विमानतळ खासगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे विजयन यांनी म्हटलं आहे.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नईथाला यांनीही राज्य सरकारच्या या ठरावाला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी राज्य सरकारचे धोरण हे दुतोंडी असल्याची टीका केली आहे. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक पद्धतीने अदानी समुहाला विरोध करते तर दुसरीकडे छुप्या पद्धतीने त्यांना मदत करत असल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे. तसेच या विमानतळाची देखभाल करण्यासाठी सीआयएएल म्हणजेच कोच्चीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची नियुक्ती का करण्यात आली नाही असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला आहे. यामागे अदानी ग्रुपला पाठिंबा देण्याचा डाव असल्याची शक्यता रमेश यांनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: The Kerala assembly on Monday unanimously passed a resolution urging the Centre not to lease out the Thiruvananthapuram international airport to Adani Enterprises.

News English Title: Kerala State Assembly Passes Unanimous Resolution Against Leasing Of Trivandrum Airport News Latest Updates.

हॅशटॅग्स

#GautamAdani(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x