12 December 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi, Interacting with Farmers, New farmers laws

नवी दिल्ली, २५ डिसेंबर: शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हा कायदा कसा योग्य आहे, त्यात शेतकऱ्यांचे कसे हित दडले आहे. ते सविस्तरपणे समजावून सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. तिथलं सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीय असं मोदी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

कृषी सुधारणा कायद्यांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात. जिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे तुम्ही पिकवलेली वस्तू विका’. तुम्हाला बाजारपेठेत, खरेदीदारांना उत्पादन विकायचे असेल, तर विकू शकता. शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या सुधारणांमध्ये चुकीचे काय आहे? असा सवाल नरेंद्र मोदींनी केला.

दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी’चं वितरण नरेंद्र मोदींनी एक बटन दाबून डिजिटल पद्धतीनं केलं. याद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ९ कोटी ४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दाखल करण्यात आले. या कार्यक्रमाचं संचालन कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हाताळलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी हेदेखील वेगवेगळ्या स्थानांवरून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. तसंच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहीत सर्व केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार या कार्यक्रमात उपस्थित आहेत.

 

News English Summary: Speaking on the Agriculture Reforms Act, Prime Minister Modi said, “The new Act allows farmers to sell their produce wherever they want. Sell your produce where you can get a good price. ‘ You can sell in the market, if you want to sell the product to buyers. If farmers are getting this freedom then what is wrong with those reforms? This question was asked by Narendra Modi.

News English Title: Prime Minister Narendra Modi interacting with Farmers over new farmers laws news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x