15 December 2024 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

भाजपचे लोढा, आ. पराग शहा, अर्णब गोस्वामींची संपत्ती हजारो कोटीची | चौकशी केली का?

Shivsena, MLA Pratap Sarnaik, BJP, ED enquiry

मुंबई, 08 डिसेंबर : हा प्रताप सरनाईक तानाजी मालुसरे आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल, असं सांगतानाच हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी केला. मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात राजस्थानातून आलेले मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शाह ज्यांनी महापालिका निवडणुकीला ५ हजार कोटीची संपत्ती दाखवली त्यांची चौकशी केली का? असा सवाल केला.

प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक (MLA Pratap Sarnaik, Vihang Sarnaik and Parvesh Sarnaik on ED enquiry) यांनी आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी तानाजी मालुसरे सारखा आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल. माझी संपत्ती एवढी मोठी असेल तर त्याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच पराग शहा, सुधाकर शेट्टी, मंगलप्रभात लोढा, अर्णव गोस्वामी यांची संपत्तीही अमाप आहे, असं ते म्हणाले. अभिनेत्री कंगना रणौतची संपत्ती तपासली का? हिमाचलची पोरगी मुंबईत संपत्ती कमावते. त्याचे काय? असा सवाल त्यांनी केला.

मी रिक्षा चालवायचो, ऑमलेटची गाडी सुद्धा चालवली. पण तीस वर्षात प्रत्येक कायद्याचं पालन करुन इथपर्यंत पोहोचलो आहे. त्याचा मला अभिमान आहे असे सरनाईक म्हणाले. भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे. जीएसटी, ईडी, इन्कम टॅक्स सारख्यामोठया संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी चौकशी करावी, मी प्रत्येक चौकशीला सामोरा जायला तयार आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ही लढाई भारतीय जनता पक्षाविरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. त्यात सरनाईक यांचा बळी देण्याचा प्रयत्न झाला. मला कुणी कितीही ऑफर दिली तरी मी शिवसैनिकच राहील. भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील आघाडी सरकार पाच नव्हे 25 वर्षे राहणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

 

News English Summary: This was the reaction of Pratap Saranaik while interacting with the media. I am like Tanaji Malusare. Will come out of every crisis. I am happy if my wealth is so big. He said that the wealth of Parag Shah, Sudhakar Shetty, Mangalprabhat Lodha and Arnav Goswami is also immense. Did actress Kangana Ranaut’s property checked? Porgi of Himachal earns wealth in Mumbai. What’s his He asked such a question.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik Criticized BJP over ED enquiry during communicating Media news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x