15 December 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Brahmastra Video | ब्रह्मास्त्रमधील BTS व्हिडिओ आऊट, बीग बी अमिताभ बच्चन यांची बोल्ड स्टाईलमध्ये तलवारबाजी

Brahmastra Video |  बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहेत. चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी असताना निर्मात्यांनी चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बीग बी बोल्ड स्टाईलमध्ये तलवारबाजी करताना दिसून येत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टंट करताना दिसून येत आहेत.

ब्रह्मास्त्रमधील रिलीजचा व्हिडीओ आऊट
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड सुरु असल्याने, ब्रह्मास्त्र चित्रपटाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चित्रपट तब्बल 400 कोटींचा असल्याने सर्वांना चित्रपटाकडून आशा लागून राहिल्या आहेत.

चित्रपटावर करोडोंचा खर्च
चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, शाहरुख खान आणि मौनी रॉय यांच्या भूमिका असणार आहेत. दरम्यान, चित्रपटामध्ये संगीतापासून ते व्हीएफएक्सपर्यंत मोठ्या प्रमाणआत खर्च करण्यात आला आहे.

‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन जोऱ्यात
गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर त्याच सोबत चित्रपटामधील सर्व कलाकार चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत. यादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चित्रपट बॉयकॉट होणार का?
चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीयांना हा चित्रपट ये जवानी है दिवानी या चित्रपटाच्या आधीच बनवायचा होता मात्र काही कारणांमुळे या चित्रपटाला वेळ लागला. गेली 8 वर्ष अयान मुखर्जी या चित्रपटावर मेहनत घेत आहेत. दरम्यान काही दिवसांपासून बॉयकॉटचा ट्रेंड सुरु असल्याकारणाने दिग्दर्शकांना बॉयकॉटची भिती वाटू लागली आहे. या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कितपत कमाल करतो.

ब्रह्मास्त्र चित्रपट बहिष्काराचा सामना करत आहे :
हा व्हिडीओ पाहून अंदाज लावता येईल की, चित्रपट बनवण्यासाठी सर्वांनी किती मेहनत घेतली आहे.अशा परिस्थितीत हा चित्रपट फ्लॉप झाल्यास निर्मात्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कितपत कमाल दाखवू शकतो हे पाहावे लागेल.व्हिडीओ बनवण्याचा प्रश्न आहे, तर त्याला खूप पसंती मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brahmastra BTS Video Out Checks details 5 September 2022.

हॅशटॅग्स

Brahmastra(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x