कंगनासाठी कृषी कायद्याला समर्थन देणारेच देशभक्त | संवेदनशील मुद्द्यात देशभक्ती घुसवली
नवी दिल्ली, १९ डिसेंबर: केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचं जोरदार समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी महासंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांना फक्त आडतीमध्ये बांधून मागील सरकारनं जे पाप केलं, त्याचं प्रायश्चित म्हणजे हे कृषी कायदे असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. देशात कृषी कायदे लागू होऊन 6 महिने लोटले पण देशातील एकही मार्केट कमिटी बंद झालेली नाही. मग विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचं काम का सुरु आहे? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केलाय.
दुसरीकडे याच विषयाला अनुसरून अभिनेत्री कंगना रणौतचा शेतकरी आंदोलनावर सतत ट्विट करण्याचा पराक्रम सुरूच ठेवला आहे. ती कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर तसेच थेट आंदोलक शेतकऱ्यांवर निशाणा साधते. आता कंगना रणौतने एक पाऊल पुढे टाकत कृषी कायद्याला देशभक्तीसोबत जोडलं आहे. तिचं हे ट्विट समाज माध्यमांवर व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे.
ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, त्या सर्वांना गुड मॉर्निंग जे अखंड भारतावर प्रेम करतात, ज्यांना या देशाला तोडायचं नाही. केवळ त्या लोकांना गुड मॉर्निंग जे कृषी कायद्याला समजून घेतात आणि त्याचं समर्थन करतात. ते सर्व खरे देशभक्त आहेत. फसवणूक करणाऱ्यांपासून बचाव करा’. कंगनाचं हे ट्विट आता ट्रेन्ड करू लागलंय. कारण तिने या संवेदनशील मुद्द्यात देशभक्ती घुसवली आहे. अशात समाज माध्यमांवरील वाद-विवाद अधिक वाढला आहे.
Good morning to only those who love Akhand Bharat and don’t want it to break in pieces,Good morning to only those who know and care to understand the consequences of farmers bill and genuinely support it they are the real desh Bhakts and well wishers of Farmers,beware of frauds. pic.twitter.com/oKBQzgVnBf
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 19, 2020
News English Summary: Good morning to only those who love Akhand Bharat and don’t want it to break in pieces,Good morning to only those who know and care to understand the consequences of farmers bill and genuinely support it they are the real desh Bhakts and well wishers of Farmers, beware of frauds said Kangana Ranaut.
News English Title: Kangana Ranaut against made controversial twit on farm bills news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा