Health First | खूप बारीक आहात? | या टिप्सनी वाढेल तुमचे वजन
मुंबई, १२ मार्च: वजन वाढवणं म्हणजे सामान्य समजाप्रमाणे जंक फूड, तळलेले, तूपकट, गोड धोड खाणं, काही पण व्यायाम न करणं आणि सारखं अबर चबर खात राहणं असे नसते. ठाण्यामध्ये वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेणे एका व्यायाम प्रशिक्षकाच्या जीवावर बेतले. व्यायाम न करता, योग्य आहार न घेता केवळ गोळ्या आणि पावडर खाऊन बारीक होण्याचे पर्याय तरुणांनी आजमावणे म्हणजे आळसाचा परमोच्च बिंदूच म्हणावे लागेल. (How to gain weight with proper diet health article)
तुम्हाला लठ्ठपणा कमी करणे हे जितके कठीण काम आहे तितकेच कठीण आहे वजन वाढवणे. बारीक व्यक्तीला वजन वाढवणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. तज्ञांच्या मते वजन वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जीवनशैली, आहार आणि व्यायामाची मदत मिळते. दोन्ही स्थितींमध्ये सप्लिमेंट्स घेणे, औषध अथवा इंजेक्शनचा वापर नुकसानदायक ठरू शकतो.
वजन वाढण्यासाठी बऱ्याचदा लोक प्रोटीन पावडर, मास गेन पावडर यांचा वापर करतात जे शरीरासाठी नुकसानदायक असते. याशिवाय तुम्ही तुमचा डाएट योग्य ठेवा. तसेच हाय कॅलरी असलेले आणि हेल्दी फॅट असलेल्या खाण्याचे सेवन करा. यामुळे तुमचे वजन वाढू लागेल. तुम्ही दररोज जितक्या कॅलरीजचे सेवन करा त्यात कमीत कमी ३०० कॅलरीज वाढवा. तुम्हाला नक्कीच परिणाम दिसेल. मात्र वजन वाढवण्यासाठी कॅलरीजच्या नावाखाली जंक फूड्स अथवा फास्ट फूडचे सेवन अजिबात करू नका.
नट्स अथवा नट बटर:
नियमितपणे नट्स अथवा नट बटरचे सेवन केल्यास तुमचे वजन वाढू शकते. नट्स खाल्य्याने तुमचे वजन हेल्दी पद्धतीने वाढते. नट्स हेल्दी स्नॅक्स आहेत. हे तुम्ही जेवणाच्या दरम्यानच्या वेळेत खाऊ शकता. अर्धा कप नट्समध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. याचप्रमाणे पीनटर बटरही तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता. दरम्यान यात शुगर नसावी. नट्समध्ये तुम्ही बदाम, काजू, शेंगदाणे, पिस्ता आणि अक्रोड यांचा समावेश करू शकता.
केळ्याने वजन वाढवण्याची पद्धत:
केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात तसेच चांगले फॅट वाढवण्यासाठी पोषक तत्वेही असतात. याशिवाय यात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, फायबर, पोटॅशियम, प्रोटीन आणि गुड फॅट असते. दररोज दोन ते तीन केळी खाल्ल्याने तुम्हाला योग्य फिटनेस मिळेल. तसेच हाडेही मजबूत होतील. एक केळे खाल्ल्याने ९०हून अधिक कॅलरीज तर २० ग्रॅमहून अधिक कार्ब्स मिळतात.
दलिया आणि चणे खा:
दलिया आपल्या शरीरासाठी हेल्दी मानला जातो. याचे सेवनाने कार्बोहायड्रेटच नव्हे तर कॅलरीजही मिळतात. गहू तसेच ओट्सही वजन वाढण्यास तुमची मदत करातात. दलियासोबत काळे चणे खाल्ल्याने अधिक फायदे मिळतात. यासाठी रात्री एक मूठ काळे चणे आणि अर्धा मूठ सोयाबीन भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी हे कच्चे खा. तसेच भिजवलेले पाणी पिण्यासही हरकत नाही.
वजन वाढवण्यासाठी दही:
दह्याचे भरपूर फायदे शरीरास होतात. दह्यामध्ये फॅट्स, प्रोटीनसह अनेक पोषकतत्वे असतात. दह्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. जेवताना तुम्ही नियमितपणे दही सलाड खाऊ शकता. यात तुम्ही काकडी, बीट आणि काळी मिरी आणि दही टाकू सलाडही खाऊ शकता.
लक्षात ठेवा वजन वाढवायचे आहे म्हणून जंक फूड अतिरिक्त खाणे टाळा. यामुळे तुमचे फक्त वजनच वाढेल. मात्र हेल्दी पद्धतीने वजन वाढण्यासाठी पोषकतत्वे असलेल्या पदार्थांचाच समावेश करा.
News English Summary: Weight loss will be followed by fatigue and constant tiredness. Gaining weight for a thin person is no less of a challenge. According to experts, lifestyle, diet and exercise help to gain and lose weight. In both cases, taking supplements, medications or injections can be harmful.
News English Title: How to gain weight with proper diet health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News