महत्वाच्या बातम्या
-
Health First | मीठ टाकून कलिंगड का खाऊ नये? | नक्की वाचा
कडक उन्हाळ्याच्या मौसमात येणारं कलिंगड हे आवर्जून खाण्यासारखं फळ आहे. मात्र काहीजण भरपूर प्रमाणात चाट मसाला किंवा मीठ टाकून हे फळ खातात. मात्र अशाप्रकारे कलिंगडाचं सेवन करणं पूर्णपणे चुकीचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस घेतानाही निवडणूक मार्केटिंग? | आसामी गमचा, पुदुचेरी केरळच्या नर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशामधील तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोरनाची लस घेतली. मोदींनी सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर त्याबद्दलची माहिती समोर आली.
4 वर्षांपूर्वी -
Health First | म्हणून उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे
कडक उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते. अशावेळी लालबूंद गर असलेली कलिंगड ठिकठिकाणी आपल्याला दिसतात. ही कलिंगड उन्हापासून आपल्या शरीराची होणारी लाही लाही रोखण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. एसी, पंखा, कूलर हे आपल्या शरीराला बाहेरून काही काळापुरता थंडावा पोहोचवत असले तरी कलिंगड हे शरीराला आतून थंड करणारं नैसर्गिक कुलर असल्याचं म्हणता येईल. म्हणूनच उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | म्हणून अक्रोड कवचासहच खरेदी करावा
पौष्टिक अक्रोडास सुक्यामेव्यात महत्वाचं स्थान असते. केक किंवा अन्य पदार्थांमध्ये अक्रोड वापरले जातात. अक्रोड हे कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्व , प्रथिने, तंतूमय व पिष्टमय पदार्थांचा खजिना आहे. मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड फायदेशीर आहे म्हणूनच बदाम, पिस्त्यासोबत अक्रोडचंही सेवन करतात. हल्ली बाजारात अक्रोडचा गर मिळतो, अक्रोडचं कवच अत्यंत टणक असतं म्हणूनच कवच फोडून त्यातील गर विक्रीसाठी असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पपई खा आणि वजन घटवा
ऋतू कोणताही असो पण आपली प्रकृती ही धडधाकट राहायला पाहिजे. सध्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकजण वाढत्या वजनानं त्रस्त आहेत. या समस्येवर पपई हे फळ जास्त फायदेशीर ठरू शकतं. पपई रक्त शुद्ध करते पण त्वचा आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासही ती फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळा आला | फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे
कडक उन्हाळ्यात बाहेरून काटेरी पण आतून मधुर असणारे फणस सहज दिसतात. खासकरून कोकणातून हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. कोकणाबरोबरच बंगळुरू, गोव्यातही फणसाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. फणसामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे पण त्याचबरोबर फणसात प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | झोपे, अपचन सारख्या समस्यांवर जायफळ फायदेशीर
जायफळ ही भारतीय मसाल्यांमध्ये प्रामुख्यानं वापरली जाते. जायफळीत अँटी ऑक्सिडंट, रोग प्रतिकारक शक्ती अधिक आहे. जायफळ ही प्रामुख्याने आतड्यांच्या व पचनाच्या विकारांवर फायदेशीर आहे. ज्यांना झोपेची समस्या आहे अशांनी जायफळ दुधात टाकून रात्री प्यावं यामुळे चांगली झोप लागते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दह्याचा आहारात समावेश असावा | वाचा फायदे
आहारात दह्याचा आवर्जुन सहभाग करावा, असं आयुर्वेदातही सांगितलं आहे. दह्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, रिबोफ्लेविन, लोह व कॅल्शिअम ही नैसर्गिक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. दह्यात असणारे लॅक्टोबॅसिल्स हे आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पचनास उपयुक्त अशा बॅक्टेरियांची निर्मिती करतात. त्याचप्रमाणे दह्यात असलेले कॅल्शिअम हे हाडांसाठी मजबुत असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोमट पाण्यासोबत काळी मिरी खाण्याचे हे आहेत फायदे
काळी मिरी हा मसाल्यामध्ये वापरला जाणारा प्रमुख जिन्नस होय. पूर्वी काळी मिरीला युरोपीय बाजारात सोन्याइतकाच भाव होता याचे दाखले आपण इतिहासात वाचतो. केवळ अन्नपदार्थांची चवच नाही तर अनेक औषधी गुणधर्मही काळी मिरीत आहेत. काळ्या मिरीचे व्यापारी हे त्यावेळी सर्वात श्रीमंत व्यापारांपैकी एक म्हणून गणले जायचे. चला तर मग जाणून घेऊ काळ्या मिरीची फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दिवसांतून २ अंड्यांपेक्षा जास्त अंडी खाणं आरोग्यास घातक
आहारात अंड्यांचा समावेश करावा असं आवर्जून सांगितलं जातं. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा नेहमीच आरोग्यासाठी घातक असतो. दिवसांतून दोन अंड्यांपेक्षाही अधिक अंडी खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक असतं असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे लवकर मृत्यू होणं किंवा हृदय विकार संबधीत समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जंक फूडमुळे मुलांना अॅलर्जीचा धोका अधिक
हल्लीच्या मुलांना पौष्टिक आहारापेक्षाही जंक फूडची आवड अधिक असते. फळे, भाज्या, दूध यांनी परिपूर्ण आहार खायला मुलं नकार देतात. बहुतेक मुलं ही जंक फूडच्या आहारी जात चालली आहेत. सकस आहार घेण्यापेक्षा जंक फूडचा आहारात समावेश करण्याचं प्रमाण हे अधिक वाढलं आहे. जंक फूड हे आरोग्यास अत्यंत धोकादायक असल्याचं यापूर्वीही पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. मात्र असं असलं तरी लहान मुलांची जंक फूडच्या आहारी जाण्याची सवय अद्यापही सुटली नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अॅसिडिटीच्या त्रासावर सब्जा फायदेशीर
तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे पाच पदार्थ तुमचा उदास मूड करतील ठिक
खाणं आणि मन यांचा संबंध तसा खूप जवळचा. आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परिणाम होत असतो हे आपल्याला मान्य करायलाच हवं. त्यातून काही पदार्थ असे असतात ज्यामुळे तुम्हाला झटपट उर्जा मिळते आणि तुमचा उदास, कंटाळवाणा मूड एका फटक्यात ठिक होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे पाच फायदे
लसूण जेवणाची चव वाढवते पण त्याचबरोबर लसणीत अनेक औषधी गुणधर्मदेखील आहेत. रिकाम्या पोटी लसूण खाल्ली तर त्याचे अनेक फायदे आरोग्यास होवू शकतात. हे फायदे कोणते ते पाहू.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत करोना लस
देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. “१ मार्चपासून ६० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण केलं जाणार,” असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नोकरीदार महिलांसाठी खुशखबर | ESIC कडून आजारपणातील लाभाशी संबंधीत नियमात बदल
कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) मंगळवारी झालेल्या बैठकीत नोकरी करणार्या महिलांना मोठा दिलासा दिला आहे. बैठकीत महिलांसाठी आजारपणातील लाभ (Sickness Benefit) घेण्याच्या अटींमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. ईएसआयसीच्या या बैठकीत मातृत्व रजेनंतर आवश्यकता भासल्यास आजाराशी संबंधीत सुटी देण्याच्या व्यवस्थेत दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, महिला विमाधारक 20 जानेवारी 2017 च्यानंतर याचा दावा करू शकतात. महिला विमाधारकाला यापूर्वी हा क्लेम मिळवण्यासाठी 78 दिवसापर्यंत काम करणे अनिवार्य होते. मात्र, आता तो कालावधी कमी करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रामदेव बाबांच्या पतंजलीला राज्यात दणका | 'कोरोनिल'च्या विक्रीस महाराष्ट्रात बंदी
योग गुरु बाबा रामदेव यांनी 19 फेब्रुवारीला कोरोनाचे औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. हे औषध आता बाजारातही उपलब्ध झाले आहे. पण, महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पतंजलीला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मध ते केळी | उत्तम झोपेसाठी हे पदार्थ फायदेशीर
वेळेत झोप न लागणं ही अनेकांची मोठी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या झोपेवर होत आहे. अपुरी झोप किंवा झोपच न येणे यांसारख्या समस्येमुळे आपल्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. मात्र आपल्या आहारात आपण काही बदल केले, काही पदार्थांचा आहारात समावेश केला तर नक्कीच उत्तम झोप येण्यासाठी याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नारळ पाणी कधी प्यावं | समजून घेणं गरजेचं
नारळ पाणी हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं. त्यातून उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेक पोषक तत्वाचा खजिना नारळ पाण्यात असतो म्हणूनच नारळ पाणी प्यावं. खूप तहान लागणे, जीव कासावीस होणे, चक्कर येणे, प्रेशर ‘लो’ होणे यासाठीही नारळ पाणी उपयोगी आहे. मात्र हे कोणी प्यावं आणि कधी प्यावं हे पाहणंही गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Beauty Tips | दालचिनीनं घालवा चेहऱ्यावरचे मुरूम
मसाल्यात वापरला जाणारा प्रमुख पदार्थ म्हणून दालचिनी ओळखली जाते. या मसाल्याला गोडसर अशी चवी असते त्यामुळे परदेशात अनेक गोड पदार्थात दालचिनी आवर्जून वापरली जाते. खाद्यपदार्थांबरोबरच या दालचिनीचा वापर आपण त्वचेची प्रमुख समस्या दूर करण्यासाठीही करू शकतो. चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूम आणि पुरळासाठी दालचिनी फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL