1 May 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Brand Rahul Gandhi | राहुल गांधी असतील विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा? वरिष्ठ काँग्रेस नेत्याने लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्याचा अर्थ सांगितला

Brand Rahul Gandhi

Rahul Gandhi | राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे विरोधकांच्या पहिल्या बैठकीपासूनच सक्रिय आहेत. ते सातत्याने विधाने करत असतात. पाटण्यात विरोधी पक्षांच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी राहुल गांधीयांना लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच ते हे सुद्धा गमतीने म्हणाले होते की ‘आप दूल्हा बनो, हम सब बाराती जाएंगे’. त्यांच्या या विधानामुळे पत्रकार परिषदेत थोडावेळ मजा मस्करी रमली होती. पण नंतर त्याचा खरा राजकीय अर्थ काढला जाऊ लागला होता.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी लालू यादव यांनी राहुल गांधी यांना नवरदेव म्हणत अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याच मुद्द्यावरून बिहारमध्ये एकत्र सरकार चालवणाऱ्या राजद आणि जेडीयूमध्ये सुद्धा मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार तारिक अन्वर यांनी लालू यादव यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ स्पष्ट केला आहे.

विरोधी पक्षांची दुसरी बैठक १७-१८ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीत विरोधक पंतप्रधानपदाचा उमेदवार पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांमध्ये जागावाटपाबाबत समझोता होईल, असेही वृत्त आहे. काँग्रेस नेते तारिक अहमद यांनी राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे म्हटले आहे. आज तकच्या वृत्तानुसार, त्यांनी लालू यादव यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ समजावून सांगितला आणि म्हणाले, “वर राहुल गांधी होईल, बाकी बाराती आहेत.

तारिक अनवर म्हणाले की, “लालू यादव म्हणाले होते की, तुम्ही नवरदेव व्हा आणि आम्ही सर्व वराती लग्नात येऊ. म्हणजेच त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार मानण्याची त्यांची तयारी आहे. विरोधक बाराती होण्यासही तयार आहेत असं त्याचा राजकीय अर्थ निघतो असं ते म्हणाले.

News Title : Brand Rahul Gandhi in Lok Sabha Election check details on 12 July 2023.

हॅशटॅग्स

#Brand Rahul Gandhi(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x