देशातील सर्वच राज्यात भाजपच्या गुजरात लॉबीचे वर्चस्व असावं हा हट्ट मोदी-शहांना नडतोय? गुजरात लॉबीला वसुंधरा राजेंच्या भूमिकेची धास्ती
Rajasthan BJP | राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता कमी आणि नुकसान अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पक्षांतर्गत नेतृत्वसंघर्षाचेही संकट उभे ठाकले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्व सातत्याने सामूहिक नेतृत्वासाठी आग्रही आहे, तसेच गुजरात लॉबीला सर्वच राज्यांमध्ये आपलंच प्राबल्य हवं असतं. मात्र माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बलाढ्य गट त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं यासाठी प्रचंड राजकीय दबाव वाढवत आहेत.
राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस महत्त्वाच्या आहेत, कारण त्याचे निकाल पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवतील. विशेष म्हणजे या पाचही राज्यांमध्ये म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांपैकी मिझोराम वगळता सर्व चार राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेत्यांचे चेहरे मजबूत स्थितीत आहेत. मात्र मणिपूरमधील हिंसाचाराने मणिपूरमध्ये सुद्धा भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांसमोर मोठं राजकीय आव्हाहन उभं राहिलं आहे. सर्व्हेनुसार या राज्यांमध्ये काँग्रेस कर्नाटकचा विजय रिपीट करेल असं म्हटलं जातंय. त्यात राजस्थानमध्ये भाजपवर पक्षांतर्गत दबाव वाढला आहे.
राजस्थामध्ये गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह मिटला असताना आता तो भाजपमध्ये पेटल्याचं चित्र आहे, मात्र दुसरीकडे काँग्रेस सध्या एकवटलेली दिसत आहे. त्याचबरोबर काँग्रेस सरकारने अशा अनेक घोषणा आणि कार्यक्रम सुरू केले आहेत, ज्यामुळे सत्ताविरोधी वातावरणही कमी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपही अतिशय सावध आहे.
गेल्या दोन दशकांत भाजप आणि काँग्रेसचे राजकारण दोन नेत्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. भाजप सरकारचे नेतृत्व वसुंधरा राजे आणि काँग्रेस सरकारचे नेतृत्व अशोक गेहलोत करत होते. अशा तऱ्हेने वसुंधरा राजे यांचा चेहरा जाहीर करण्यासाठी भाजपमधील एक गट पक्षावर दबाव टाकत आहे.
मात्र, राज्यातील पक्षनेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव ही भाजपसाठी सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या पाच वर्षांत येथे अनेक प्रयोग झाले, पण तरीही राज्यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सर्वाधिक वजनदार नेत्या आहेत. मात्र, राज्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासारखे चेहरेही पक्षाकडे आहेत. यावेळी पक्षाने ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांना राज्यसभेत आणून गुलाबचंद कटारिया यांना राज्यपाल केले. जगदीप धनखड़ यांना उपाध्यक्ष बनवून पक्षाने राजस्थानचे राजकारण सुधारण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे.
२०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसला १००, भाजपला ७३, बसपाला ६, रालोपीला ३, माकपला २, बीटीपीला २, रालोदला १ आणि १३ अपक्षांना जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप (२४) आणि मित्रपक्ष रालोप (एक) यांनी सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यात काँग्रेस मजबूत झालेली असताना दुसरीकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने चित्र बदललं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसेल असं स्थानिक राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
News Title : Rajasthan BJP politics check details on 15 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा