13 December 2024 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सेना, राष्ट्रवादी किंवा कॉग्रेसचा १ आमदारही फुटला नाही | फडणवीसांनी एमआयएमच्या साथीने स्क्रिप्ट आखल्याची माहिती

Rajya Sabha Election

Rajya Sabha Election | राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत तीनही उमेदवार निवडून आणले. भाजपच्या बेरजेच्या राजकारणांची राज्यात चर्चा अजून सुरू आहे. ज्या MIM ला सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘भाजपची बी टीम’ म्हणून हिणवलं त्यांचा आधार घेत शिवसेनेचा गेम झाल्याचं बोललं जात आहे. कारण इतर पक्षांनी जरी आपल्या आमदारांना व्हिप जारी केला असला तरी, एमआयएम आणि अपक्ष आमदारांची मतं कुणाला दिली जाणार यावर दोन्ही बाजूंनी अनिश्चितता होती. पण मतांची आकडेवारी पाहता MIM ची मतं भाजपकडे वळाली असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एमआयएमला सातत्याने भाजपची बी टीम म्हणून हिणवतं. पण सध्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र एकेका मतासाठी रस्सीखेच झाली. त्यात ज्या एमआयएमवर पदोपदी टीका केली त्याच एमआयएमच्या दोन मतांसाठी महाविकास आघाडीला त्यांच्याशी हात मिळवणी करावी लागली.

एमआयएम भाजपसोबत असल्याचे फडणवीस आणि जवळच्यांना माहिती होते.
प्रसार माध्यमांसमोर एमआयएमचे खासदार मुख्यमंत्र्यांकडून आम्ही आमच्या मतदारसंघातील कामं करून घेण्यासाठी महाविकास आघाडीला मतं देणार हे भाजपच्या सांगण्यावरूनच केलं गेल्याच सूत्रांनी सांगितलं. फडणवीसांचे ते मुख्यमंत्री असल्यापासून एमआयएमच्या आमदार आणि खासदारांसोबत चांगले राजकीय संबंध आहेत.

फडणवीसांची संपूर्ण स्क्रिप्ट जवळच्या भाजपमधील लोकांना माहिती असल्यानेच निकाल लागण्यापूर्वीच गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार जिंकतील असं आव्हान दिलं होतं. अरविंद देशमुख यांनी आधीच सोशल मीडियावर पोस्ट करून लाख रुपयाची पैज लावण्याचं आव्हान दिलं होतं.

फडणवीसांकडून भाजपमधील आयात नेत्यांवर राजकीय पुडयांची जवाबदारी :
एमआयएम पडद्याआडून स्वतःसोबत असल्याची भाजपाला खात्री असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने काही मोठा डाव टाकल्यास त्यासाठी देखील एमआयएमचा ‘मुस्लिम’ शब्द पकडून पुन्हा त्यावर बोंबाबोंब करण्याची रणनीती तयार होती. त्यासाठी दरेकर आणि आ. राम कदमांना पुन्हा पुन्हा पुड्या सोडण्यासाठी माध्यमांच्या समोर धाडण्यात आलं आणि एमआयएम’चा उल्लेख जाणून बुजून वारंवार करण्यात आला.

दुसऱ्या बाजूला स्वतः फडणवीस दिवसभर बाहेरच पडले नाही आणि एमआयएमच्या संपर्कात असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. सर्व बाबतीत मोठा घोडेबाजार झाल्याचं म्हटलं जातंय आणि त्याला कारण असेल औरंगाबाद आणि मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका असं म्हटलं जातंय. काँग्रेसचा मतदार शिवसेनेकडे जाऊ नये यासाठी एमआयएम काम करेल अशी डील झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय, ज्याची सुरुवात राज्यसभा निवडणुकीत झाली आहे.

एकीकडे सहाव्या जागेसाठी पुरेशी मतं असल्याचं भासवण्यात महाविकास आघाडी व्यस्त होती. तर दुसरीकडे भाजप अपक्षांची मनं आणि मतं आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील होतं. त्यातच त्यांनी एमआयएमलाही आपल्यकडे आकृष्ट करण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. त्याचमुळे ती दोन मतंही भाजपला मिळाल्याची चर्चा आहे.

आक्षेपांची स्क्रिप्ट’ संजय राऊतांविरोधात :
या निवडणुकीत अचानक भाजपकडून आक्षेप घेण्यात आले आणि थेट केंद्रीय निवडणूक आयोगाची इंट्री एकही मिनिटात झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे संजय पवार नव्हे तर संजय राऊतांच्या बाबतीत काही ‘केंद्रीय दगाफटका’ करण्याची योजना होती का यावरही संशय व्यक्त झाला आहे. कारण जे मत बाद ठरविण्यात आलं ते संजय राऊतांच्या कोट्यातील होते. मात्र त्यात अतिरेक केला असता तर न्यायालयीन हस्तक्षेपात पोलखोल होण्याच्या भीतीने भाजपने थोडं नमतं घेतल्याचं म्हटलं जातंय. या विषयावरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या ‘राऊत पराभवातून थोडक्यात वाचले’ या वक्तव्यावरून त्याला अप्रत्यक्षरीत्या दुजोरा मिळाला आहे.

कारण निकाल लागताच फडणवीसांनी नेमका त्यासंबंधित उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की आमच्या उमेदवाराला राऊतांपेक्षा अधिक मतं मिळाली आणि इथेच फडवावीसांनी त्या फेल स्क्रिप्टचा अशी प्रतिक्रिया देण्यापुरता वापर केल्याचं म्हटलं जातंय. एकूण फडणवीसांनी काहीच राजकीय चमत्कार केलेला नाही. एक काम ईडीच्या कारवायांमधून बहुजन विकास आघाडीच्या बाबतीत (३ आमदार) आणि दुसरं एमआयएमच्या बाबतीत (दोन आमदार आणि मनसे बोनसमध्ये) यांच्यासोबत विधान भवनातून बाहेर न पडता सतत संपर्कात राहून केलं. मात्र स्वतःची मार्केटिंग जोरदार करून घेतली यात शंका नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rajya Sabha Election in Maharashtra check details 12 June 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x