अर्नबचं भाजपशी नातं | मामा भाजप आमदार | वडील सदस्य व माजी लोकसभा उमेदवार - सविस्तर
मुंबई, १२ नोव्हेंबर: वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, अर्णब गोस्वामी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हे नाव प्रखरतेने जाणवू लागलं आहे. टीव्ही पत्रकारितेलं या नावाची चर्चा राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून जास्तच सुरु झाली, याला कारणही तसेच आहे. राज्यात १०५ आमदार निवडूनही शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची साथ सोडत थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला कोडींत पकडण्याचे अनेक प्रयत्न होताना दिसत आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला जातो, यातच पालघर येथे मॉब लिचिंग घटनेत २ साधूंची हत्या करण्यात आली. या घटनेवरुन भारतीय जनता पक्षाने शिवसेनेविरोधात रान उठवलं, हिंदू साधूंची हत्या झाली ही बातमी वेगाने पसरली, यात शिवसेनेला आक्रमकपणे घेरण्यासाठी अर्णब गोस्वामी यांची रिपब्लिक टीव्ही सज्ज झाली.
पालघर साधू हत्याकांड, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या, कंगना राणौत, बॉलिवूड ड्रग्स प्रकरण एका मागोमाग एक घटनेवरुन अर्णब गोस्वामीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत उल्लेख करून टीका केली, मागील काही महिने उद्धव ठाकरे सरकारविरोधात अर्णब गोस्वामीने रान उठवलं होतं. आव्हानाची भाषा वापरली.
अर्णबने १९९५ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली, द टेलिग्राफ, एनडीटीव्ही, टाईम्स नाऊ आणि त्यानंतर रिपब्लिक टीव्ही संपादक असा अर्णब गोस्वामीचा प्रवास राहिला आहे. २०१६ मध्ये अर्णब गोस्वामी यांनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्ही सुरु केला, याच रिपब्लिक टीव्हीच्या स्टुडिओ कामानिमित्त अन्वय नाईक आणि अर्णब गोस्वामी यांचा संबंध आला होता.
पण याच दरम्यान २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक आणि त्यांची आई यांच्या आत्महत्येची चौकशी पुन्हा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आदेश दिले, अन्वय नाईक प्रकरणात सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख आहे, आर्थिक बिले दिले नसल्याने अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्याचं या सुसाईड नोटमधून स्पष्ट होतं,
काही दिवसांपूर्वी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीला या प्रकरणात अटक केली, त्यानंतर राज्यासह देशभरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. अर्णबला एका वैयक्तिक गुन्ह्यात अटक झाली असून त्याचा पत्रकारितेची काही संबंध नाही, त्यामुळे अर्णबसाठी रडणं बंद करा असा टोला शिवसेनेने लगावला. अर्णब भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित केला.
या प्रश्नावर अर्णब गोस्वामी यांची सखोल माहिती काढली. अर्णबचा जन्म ९ ऑक्टोबर १९७३ रोजी आसामच्या गुवाहाटी येथे झाला, अर्णबचे वडील मनोरंजन गोस्वामी हे सेवानिवृत्त कर्नल आहेत, नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अर्णबच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.
इतकचं नाही तर मनोरंजन गोस्वामी (Arnab Goswami’s father Manoranjan Goswami) यांनी १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत गुवाहाटी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढली होती, या निवडणुकीत काँग्रेसच्या भुवनेश्वर कलिता यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता, मनोरंजन गोस्वामी यांना या निवडणुकीत २७ टक्के मतदान झालं होतं. अर्णब गोस्वामी यांचे मामा सिद्धार्थ भट्टाचार्य (Arnab Goswami’s Uncle Siddharth Bhattacharya is the BJP MLA) हेदेखील भारतीय जनता पक्षाशी जोडलेले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे आमदार असून आसाम सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. १९९५ मध्ये सिद्धार्थ भट्टाचार्य भारतीय जनता पक्षात सहभागी झाले होते, २०१६ मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवले होते. त्यामुळेच अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर आंदोलनाचे सर्वाधिक इव्हेंट हे गुवाहाटी आणि आसाम मध्ये झाले होते.
News English Summary: Manoranjan Goswami had contested from the Guwahati constituency in the 1998 Lok Sabha elections on behalf of the Bharatiya Janata Party. He was defeated by Bhuvneshwar Kalita of the Congress in this election. Arnab Goswami’s uncle Siddharth Bhattacharya is also associated with the Bharatiya Janata Party. He is a Bharatiya Janata Party MLA and Education Minister in the Assam government. Siddharth Bhattacharya joined the Bharatiya Janata Party in 1995 and was made the state president of the Bharatiya Janata Party in 2016. That is why most of the events of the agitation after the arrest of Arnab Goswami took place in Guwahati and Assam.
News English Title: Arnab Goswami family relation with BJP Party news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा