26 April 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण

NCP candidate Arun Anna Lad, Graduate constituency, Pune Legislative Council

पुणे, १२ नोव्हेंबर: राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर केले जातील. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (१२ नोव्हेंबर) आहे. उद्या (१३ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.

दरम्यान, पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड (NCP Candidate Arun Anna Lad) यांना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक – क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत. एनसीपीकडून अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादीला धक्का बसला आहे कारण पक्षात बंडखोरीने तोंड वर काढलं आहे. राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने यांनी देखील पुणे पदवीधर मतदारसंघात आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणीत देखील भर पडली आहे.

 

News English Summary: NCP candidate Arun Anna Lad has been declared the official candidate from the graduate constituency of Pune Legislative Council. Arun Anna Lad is also the Chairman of Kranti Sugar Factory. Also freedom fighter – Krantiagrani Swargiya G. D. Bapu is the son of Lad. After the announcement of Arun Lad’s candidature from the NCP, the NCP has been shocked as insurgency in the party has come to the fore. NCP supporter Pratap Mane has also filed his official candidature in the Pune graduate constituency. This has also added to the difficulties of the NCP.

News English Title: NCP candidate Arun Anna Lad is the official candidate from the graduate constituency of Pune Legislative Council News updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x