27 April 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी खालावल्याने माजी NSG प्रमुख जे. के दत्त यांचं निधन

India corona pandemic

नवी दिल्ली, २० मे | देशात कोरोनाचा संसर्ग हळु-हळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 76 हजार 59 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 3 लाख 68 हजार 788 रुग्ण ठीक झाले. तसेच, 3,876 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आज सलग सातवा दिवस असेल, जेव्हा नवीन संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बुधवारी अॅक्टिव केस म्हणजेच, उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत 96,647 ची घट झाली. सध्या देशभरात 31 लाख 25 हजार 140 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 11 दिवसांपूर्वी, हा आकडा 37.41 लाख होता.

दरम्यान, कोरोना आपत्तीत अनेक प्रतिष्ठित व्यक्ती देखील प्राण सोडत आहेत. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवणी आजही लोकांसमोर ताज्या आहेत. या लढाईत राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG)चं नेतृत्व करणारे माजी प्रमुख जे.के दत्त यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचे निधन झाल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. गेल्या १४ एप्रिलपासून ते गुडगांवच्या मेदान्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो. तर मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे. सीआरपीएफचे एडीजी जुल्फिकार हसन म्हणाले की, जे के दत्त असे अधिकारी होते ज्यांनी कॅडर आणि केद्रीय प्रतिनियुक्तीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. नेहमीच त्यांनी पुढं येऊन नेतृत्व केले होते. NSG नं ट्विट केलंय की, श्री ज्योतिकृष्ण दत्त यांचे गुरुग्रामच्या हॉस्पिटलमध्ये १९ मे रोजी निधन झालं. जे के दत्त यांनी देशासाठी दिलेलं योगदान नेहमीच आठवणीत ठेवलं जाईल. त्यांच्या नेतृत्वात ब्लॅक कमांडोंनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी नेतृत्व केले होते हे कधीच विसरता येणार नाही असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

News English Summary: Sh Jyoti Krishan Dutt IPS ,former DG NSG ( Aug 2006- Feb 2009) passed away today on 19th May at Gurugram. NSG condoles the sad and untimely demise of former DG and remembers his distinguished service to the Nation said National Security Guard.

News English Title: Former NSG chief J K Datta Died Due to Corona news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x