महत्वाच्या बातम्या
-
आगामी लोकसभा? मोदींनी NSC २०१७-१८ रोजगार व बेरोजगारी अहवाल रोखला, प्रभारी प्रमुखांचा राजीनामा
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या अर्थात एनएसएसओ’चा वर्ष २०१७-१८ च्या रोजगार आणि बेरोजगारीचे वार्षिक सर्वेक्षण रोखल्याचा विरोध करत राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (एनएससी) प्रभारी प्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या अजून एका सहकाऱ्याने सुद्धा पद सोडले आहे. सांख्यिकीतज्ज्ञ पी सी मोहनन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक जे व्ही मीनाक्षी यांना जून २०१७ मध्ये NSC च्या सदस्यपदी अधिकृतरीत्या नियुक्त केले होते. दोघांनाही ३ वर्षांचा कार्यकाळ ठरवून देण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी शेतकऱ्यांना फसवून केवळ मित्रांचे उत्पन्न वाढवले: राहुल गांधी
पंतप्रधान मोदींनी केवळ स्वतःच्या जवळच्या १५ मित्रांना कमाल उत्पन्न वाढण्याची गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र पूर्णपणे फसविले आहे. तुम्ही केवळ अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. तर या उलट आमचा काँग्रेस पक्षाने किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व सामान्य देशवासियांसाठी लागू होईल, अशी टीका करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष केले.
6 वर्षांपूर्वी -
जगातील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुह, एकमेव भारतीय ब्रँड
टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या शंभर ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून जागा पटकावली आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने २०१९ मधील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुहाला ८६ व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा १०४ व्या स्थानावर होता. तर अॅमेझॉन कंपनी १३.३६ लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी घेतली पर्रिकरांची सदीच्छा भेट, केली तब्येतीची विचारपूस
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री आणि पूर्व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची सदीच्छा भेट घेतली. राहुल गांधी हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत गोव्यामध्ये सुट्यांसाठी आले आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनौपचारिक स्वरुपाची होती, अशी माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी केवळ मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या हेतूने सदर भेट घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन मंदिर समितीला द्या, केंद्राची न्यायालयात मागणी
केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे अयोध्येतील राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी मंदिर समिती न्यासाला द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केली आहे. सदर विषयासंबंधित याचिका केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. एकूण ६७ एकर जमिनीचे केंद्र सरकारने अधिग्रहण केले होते, परंतु सुप्रीम कोर्टाने त्या अधिग्रहणाला कायदेशीर स्थगिती दिली होती. त्यातच आता पुन्हा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत ६७ एकरातील वादग्रस्त जमिनीचा भाग वगळता शिल्लक राहणारी जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी याचेकेद्वारे कोर्टात मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभेच्या तारखा जाहीर होणार?
आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख अद्याप जरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकापूर्व सर्व तयारी सुरु केली आहे आणि त्यामधून हे संकेत मिळत आहेत. देशातील सर्व राज्यसरकारांना २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रशासकीय तयारी आणि तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ICC T20 वर्ल्ड कप २०२०; आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
पुढच्या वर्षी २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. इतिहासात पहिल्यांदाच पुरुष आणि महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार खेळलेल्या जाणार आहेत. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
माजी संरक्षण मंत्री आणि बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे काल सकाळी दिल्लीतील इस्पितळात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. कामगार नेते, मुंबईच्या सामान्यांशी जोडलेले आणि उभ्या हयातीत मोठी पद भूषवून देखील जमिनीवर राहिलेले, तसेच एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज एनसीपी’त जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात राहिलेल्या वाघेला यांनी आता एनसीपी’सोबत पुढचा राजकीय प्रवास सुरु करण्याची तयारी केली आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी तशी अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी मुलांसाठी एक शाळाही उभारलेेली नाही: अरविंद केजरीवाल
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी थेट शिक्षणव्यवस्था तसेच नव्या शाळांचा दाखल देत दिल्लीतील पालकांना ‘देशभक्ती’ आणि ‘मोदीभक्ती’ या दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
PNB घोटाळा; चोक्सीचे नागरिकत्व आम्ही रद्द करू शकत नाही : अँटिग्वा सरकार
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याचे आमच्या देशाचे दिलेले नागरिकत्व आम्ही रद्द करू शकत नाही, असे अँटिग्वा सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतातील बहुचर्चित पीएनबी घोटाळ्यातील आरोप मेहुल चोक्सी याला भारतात आणताना केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
जिंद पोटनिवडणूक : काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला रिंगणात
हरयाणातील जिंद विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तब्बल २१ उमेदवार या पोटनिवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला मैदानात उतरल्याने काँग्रेसने सुद्धा ही पोटनिवडणूक प्रतिष्टेची केली आहे. जिंद’ची जागा राखण्यासाठीच काँग्रेसने मोठा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘झी’ समूह अब्जावधींच्या आर्थिक संकटात, सुभाष चंद्रांकडून आर्थिक मदतदात्यांची जाहीर माफी
देशातील आणखी एक दिग्गज कंपनी कर्जाच्या प्रचंड बोजाखाली आली आहे. त्यामुळे कोट्यवधींचे आर्थिक संकट कंपीनीच्या डोक्यावर कोसळले आहे. एस्सेल उद्योग समुहाच्या ‘झी’ टीव्ही, डिश टीव्ही आणि एस्सेल प्रीपेड या कंपन्यांचे शेअरचे भाव बाजारात अक्षरशः जमिनीला टेकले आहेत. त्यामुळे कंपनीच्या कामगिरीवर मोठा नकारात्मक परिणाम झाल्याने ‘झी’चे मालक सुभाष चंद्रा यांनी थेट आर्थिक मदत करणार्यांची जाहीर पत्राद्वारे माफी मागण्याची वेळ आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकांना केवळ स्वप्नं दाखवणारा नेता चांगला वाटतो!....गडकरींचा हा टोला कोणाला?
मागे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या रोखठोक वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये हेतु पुरस्कर जाहीर खोटी आश्वासने सामान्यांना दिल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले होते. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष देशात सत्तेवर येणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती. त्यामुळेच विचाराअंती आम्हाला जाहीर खोटी आणि मोठमोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, आता जेव्हा कधी आम्ही देशात सत्तेत आलो आहोत, तर सामान्य जनता आम्हाला दिलेल्या खोट्या आश्वासनांची बरोबर आठवण करून देत आहेत. परंतु, आम्ही केवळ त्यांना एक स्मित हास्य देतो आणि पुढे चालत राहतो, असे त्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांच्यवर पुन्हा स्वतःच्या वक्तव्यावर खुलासा करण्याची वेळ आली होती.
6 वर्षांपूर्वी -
FDI नियम; फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉनचे मेगा सेल बंद
ईकॉमर्स क्षेत्रातील जाईंट फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉन १ फेब्रुवारीपासून निरनिराळ्या दिवसांच्या निमित्ताने आयोजित करणारे मेगा सेल यापुढे बंद करावे लागणार आहेत. दिवाळी, दसरा, नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा अनेक महत्वाच्या दिवशी ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी खरेदीवर मोठी सूट देऊन एकूण विक्री वाढवायचे. परंतु, सरकारच्या नव्या एफडीआय नियमांमुळे यापुढे या कंपन्यांना हे सर्व येत्या १ फेब्रुवारीपासून करता येणार नाही.
6 वर्षांपूर्वी -
#GoBackModi ट्विटरवर ट्रेंड; 'गो बॅक मोदी', तामिळनाडू दौऱ्याला विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुतील मदुराईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानिमित्त संपूर्ण तामिनाडूत ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करत त्यांना जोरदार विरोध केला जातो आहे. त्यानिमित्त लाखो तमिळ नेटीझन्स आक्रमक झाले असून ट्विटवर मोदींविरोधात रान पेटवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चंदा कोचर यांच्यावर FIR घेणाऱ्या CBI अधिकाऱ्याची १२५० किमी दूर बदली
आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्यावर FIR दाखल करणाऱ्या CBI अधिकाऱ्याची दुसऱ्याच दिवशी १२५० किलोमीटर दूर बदली करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियांका गांधी मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात, भाजपची झोप उडण्याची शक्यता
उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुक हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करून लढणार यात अजिबात शंका नाही. त्यामुळे त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांनी कुंभमेळादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तान दरम्यान 'पाणीबाणी'; पाणी वाद पेटण्याची शक्यता
भारत आणि पाकिस्तान दरम्यान पाण्यावरुन तिढा वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये ५९ वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पाणीवाटपाचा करार झाला. दरम्यान, सदर कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. त्यामुळे लवकरच हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी सुद्धा प्रतिष्ठेचा करणार यात शंका नाही.
6 वर्षांपूर्वी -
#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन
#RepublicDay 2019 – राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA