महत्वाच्या बातम्या
-
उद्धव ठाकरे कुटुंबीय आज विशेष विमानाने अयोध्येला रवाना होणार
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी धार्मिक राजकारण तापविण्यास सुरुवात केली आहे. आधीच भाजप समर्थक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा आणि लॉन्गमार्च आयोजित करत आहेत. त्यात उद्या उद्धव ठाकरे कुटुंबीय सुद्धा आज विशेष विमानाने अयोध्येला प्रयाण करत आहेत. सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण करून त्याचा पक्षाला कसा फायदा करून घेता येईल अशी सत्ताधाऱ्यांची रणनिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
जागतिक बॉक्सिंग स्पर्धा: मेरीकोमची अंतिम फेरीत धडक
जागतिक ख्यातीची भारतीय बॉक्सिंग सुपरस्टार एम. सी. मेरी कोम हीने तिच्या कारकिर्दीतील ६व्या विश्वविजेतेपदासाठी नवी दिल्ली येथील विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याआधी तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने सहज पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली आहे.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात सोहराबुद्दीन चकमक: अमित शहा सुद्धा कटात होते, पण कागदोपत्री पुरावे?
कथित गुंड सोहराबुद्दीन शेख आणि त्याचा साथीदार तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीचा कट रचणाऱ्यांमध्ये मुख्यत्वे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा, डी.जी. वंजारा, राजकुमार पांडियन व एम. एन. दिनेश हे ३ IPS अधिकारी सामील होते. परंतु, हे आरोप सिद्ध करणारे कोणता सुद्धा कागदोपत्री पुरावे नव्हते’, असे CBIचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी बुधवारी विशेष CBI न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्याकडे नोंदवलेल्या साक्षीत नमूद केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
महिला ट्वेण्टी-२० वर्ल्ड कप; भारतीय महिला टीमचे आव्हान संपुष्टात
महिलांच्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय संघाचे आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडच्या महिला टीमकडून पराभव झाला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून इंग्लंड टीम समोर ११३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. परंतु, इंग्लंडच्या टीमने भारतावर ८ विकेट्सने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. आता अंतिम सामान्यतर इंग्लंडची गाठ ऑस्ट्रेलिया टीमसोबत पडणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थान निवडणूक: भाजपच्या ४ मंत्र्यांच्या बंडखोरीनंतर पक्षातून निलंबन
राजस्थानमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जोरदार घडामोडी घडताना दिसते आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कॅबिनेटमधील तब्बल चार मंत्र्यांसह भाजपच्या स्थानिक ११ जेष्ठ नेत्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजस्थान भाजपकडून त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या सर्व ११ जणांना सहा वर्षांपर्यंत पक्षाच्या प्राथमिक सदस्य यादीतून सुद्धा हटविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अयोध्येत संयुक्त व्यापार मंडळं उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार
अयोध्येत राम मंदिर निर्माणाचे काम सुरु करण्यात यावे यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर इतर अनेक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत त्याच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यात स्थानिक व्यापारी वर्गाच्या मनात भितीची भावना निर्माण झाली असून केवळ निवडणुकीच्या राजकारणापायी इथली शांती भंग करण्याचा या संघटनांनी चंग बांधला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना व विहिंप नेत्यांना श्रीरामापेक्षा राजकारणात अधिक रस: महंत नरेंद्र गिरी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या विषयाला अनुसरून आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी शिवसेना नेत्यांना आणि उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. ‘या नेत्यांना प्रभू रामापेक्षा केवळ राजकारणात अधिक रस आहे’, अशा शब्दात खडे बोल सुनावले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
गुरु ग्रंथ साहिब अवमान; अक्षय कुमारची पंजाब एसआयटीकडून चौकशी
शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब राज्य एसआयटीकडून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची आज तब्बल २ तास प्रश्नांचा भडीमार करत कसून चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाब राज्य एसआयटीने अक्षय कुमारला चौकशीदरम्यान तब्बल ४२ प्रश्न विचारल्याची माहिती आहे. परंतु, अक्षय कुमारने पोलिसांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपाची अवस्था पाहून सुषमा स्वराजांनी लोकसभेचं मैदान सोडले : चिदंबरम
भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय काल इंदूर येथे जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी खोचक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “सुषमा स्वराज या स्मार्ट असून मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांनी निवडणुकीचे मैदान सोडून दिल्याचे ट्विट केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०१९: सुषमा स्वराज निवडणूक लढवणार नाहीत!
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. इंदूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. तसेच या निर्णयाची पूर्ण कल्पना मी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुलगाव: शस्त्र भांडाराजवळ स्फोट; ६ ठार
येथील पुलगावमध्ये असणाऱ्या भारतीय लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ जुनी स्फोटकं निकामी करत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ६ जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या भीषण स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये काही स्थानिक नागरिकांचा सुद्धा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच जखमींचा आकडा अजून वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण स्फोटामुळे आसपासच्या परिसरात जोरदार हादरे बसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
7 वर्षांपूर्वी -
नीरव मोदीची चौकशी थांबवण्यासाठी माझी बदली: सीबीआय DIG मनीष कुमार सिन्हा
नरेंद्र मोदी सरकार आणि CBI मधील संघर्ष अद्याप सुरूच असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कारण, आज सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी सुप्रीम कोर्टात त्यांच्या बदलीला आव्हान दिलं आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि नीरव मोदीच्या पीएनबी बँकेतील घोटाळ्याची चौकशी थांबवण्यासाठी माझी बदली नागपुर येथे करण्यात आली, असा त्यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
7 वर्षांपूर्वी -
रिझर्व्ह बॅंक व मोदी सरकार; RBI संचालक मंडळाची आज महत्वाची बैठक
RBI’च्या कामकाजातील मोदी सरकारचा हस्तक्षेप हा भविष्यात अर्थव्यवस्थेला धोकादायक ठरू शकतो, या डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या जाहीर वक्तव्यानंतर मोदी सरकार तसेच RBI मधील तीव्र मतभेद अक्षरशा चव्हाट्यावर आले आहेत. त्यानंतर केंद्रीय अर्थ खाते आणि RBI दरम्यान अनेक विवादित खटके सुद्धा उडाल्याचे पाहायला मिळाले आणि तणाव अधिकच वाढल्याचे प्रसार माध्यमांमध्ये समोर येऊ लागले.
7 वर्षांपूर्वी -
पहिली केंद्रात-राज्यात सत्ता उपभोगून घेतली, निवडणुका येताच "पहिले मंदिर फिर सरकार"चा नारा?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानिमित्त पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे नेत्यांची सेनाभवन येथे तयारीचा आढावा आला, ज्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. दरम्यान, यावेळी पक्षाचे राज्यातील सर्व जिल्ह्याप्रमुख,संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख सुद्धा उपस्थित होते.
7 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर: शोपियान चकमकीत २ दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात मोठी चकमक झाली. उपलब्ध वृतानुसार, भारतीय लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्तपणे पार पाडलेल्या मोहीमत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदीजी ‘माझ्याशी केवळ १५ मिनिटे ‘राफेल’वर खुली चर्चा करा’ : राहुल गांधी
छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप तसेच मोदींवर तुफान टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शनिवारी सरगुजा येथे आयोजित एका रॅलीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट मोदींनी राफेल करारावर केवळ १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी असं खुलं आव्हान दिलं. त्यांनी केवळ १५ मिनिटं माझ्याबरोबर राफेलच्या विषयावर बोलू द्यावं आणि त्यानंतर तेवढ्याच वेळ स्वतः सुद्धा त्याविषयी बोलावं असं राहुल गांधी म्हणाले. राफेल लढाऊ विमानांच्या कराराद्वारे मोदींनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला तब्बल ३०,००० कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
7 वर्षांपूर्वी -
सीबीआयला आंध्र पाठोपाठ प. बंगालमध्ये सुद्धा बंदी?
एनडीएमधून बाहेर पडलेले आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि तसेच मोदींच्या धोरणांचा नेहमी आक्रमक विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला चांगलाच झटका दिला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीबीआय या सर्वात मोठ्या तपास यंत्रणेला यापुढे आंध्र प्रदेशातील कोणत्याही प्रकरणात थेट हस्तक्षेप करता येणार नाही आणि आंध्र प्रदेशातील पोलीस सुद्धा CBI’च्या तपासात कोणतीही मदत करणार नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
नोटाबंदी हा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा : राहुल गांधी
सध्या छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या प्रचारादरम्यान एकाबाजूला छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे पंतप्रधानांनी प्रचारसभेत काँग्रेस पेशावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील देवरी सागर येथील प्रचारसभेत मोदींवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिल्याची आठवण करुन दिली. पण, चीन सरकार केवळ २४ तासात तब्बल ५० हजार तरुणांना रोजगार देत आहे. तसेच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमेतून मोदी सरकार २४ तासात लेव्हल ४५० युवकांना रोजगार देत आहे असा आरोप केला.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांकडून स्पष्टीकरण मागवले
CBI मधील अंतर्गत वादावर सीव्हीसीने अहवाल सादर केल्यानंतर आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. दरम्यान, रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सीव्हीसीच्या अहवालाची एक प्रत धाडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच अलोक वर्मा यांनी या अहवालावर सोमवारपर्यंत आपले सविस्तर स्पष्टीकरण सादर करावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. असं असलं तरी दुसऱ्या बाजूला राकेश अस्थाना यांना सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
लिव्ह-इन रिलेशनशिप: महिलेला पोटगीचा अधिकार: सुप्रीम कोर्ट
स्वच्छेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेला तिच्या जोडीदाराकडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगी मागण्याचा अधिक आहे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात दिला आहे. त्यामुळे केवळ शारीरिक किंवा मानसिक नव्हे तर आर्थिक प्रकरणात सुद्धा महिलेचा छळ केल्याप्रकरणी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांनासुद्धा कायद्याने पोटगी मागण्याचा अधिकार आहे. तसेच संबंधित महिला अशा जोडीदाराविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात, असे कोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS