महत्वाच्या बातम्या
-
मध्य प्रदेश निवडणूक; मुख्यमंत्र्यांचे मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे निकटवर्तीय आणि मेहुणे संजय सिंह यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, के कमलनाथ मध्य प्रदेशात जोमाने पक्ष कामाला लागले असून काँग्रेससाठी सध्या मध्य प्रदेशात पोषक वातावरण आहे.
7 वर्षांपूर्वी -
पैशाच्या जोरावर मोदी सरकार फेक सर्व्हे करत आहे: रणदीप सुरजेवाला
सध्या देशात मोठ्याप्रमाणावर महागाई वाढली आहे, त्यात पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी आणि रुपयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेली किंमत यामुळे मोदी सरकार अडचणीत आले असताना देशात वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणूक पूर्व सर्व्हे येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सर्वच थरातून सामान्य मतदार नाराज असताना देशात सर्वांना मोदीच हवे आहेत असे एकावर एक सर्वे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; एमपी गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल
मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी होईल असा अहवाल मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने दिल्याने भाजपची धाकधूक वाढली आहे. या गोपनीय अहवालात राज्यातील एकूण २३० जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक म्हणजे १२८ जागांवर आघाडी घेईल तर भाजपच्या जागा घटून थेट ९२ वर येतील.
7 वर्षांपूर्वी -
RBI आणि केंद्र सरकारच्या वादावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची नजर
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बँंकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोडीस तीव्र विरोध दर्शविला असून, जगातील कोणत्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत आडकाठी आणण्याच्या हालचालींवर एएमएफ’ची नजर असल्याचं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलं आहे. तसेच जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना एएमएफ’चा तीव्र विरोध असल्याचे सुद्धा म्हटले आहे. सध्या भारतात RBI आणि मोदी सरकारमध्ये वाद पेटल्याच्या विषयाला अनुसरून IMF ने मत व्यक्त केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राम मंदिर प्रश्नी या प्रकारचा कायदा केंद्र सरकार आणू शकतं : माजी न्या. चेलमेश्वर
सध्या देशभर राम मंदिराचा मुद्दा उचल घेताना दिसत आहे. त्यात मोदी सरकारच्या राजवटीत बिघडलेली आर्थिक स्थिती, महागाई, पेट्रोल-डिझेलच्या किमती, रुपयाचे घसरते मूल्य आणि वाढलेली बेरोजगारी या पासून सामान्यांना आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मूळ विषयांपासून परावृत्त करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा सत्ताधारी पक्ष पेटवताना दिसत आहे. संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता न्यायालयावर सुद्धा दबाव आणण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
दसॉल्ट एव्हिएशनच्या पैशातून अनिल अंबानींनी जमीन खरेदी केली: राहुल गांधी
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल डील प्रकरणात निर्दोष असते तर ते याप्रकरणी आरोप होत असताना ते प्रत्येक गोष्टीच्या चौकशीला तयार झाले असते असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राफेल डील प्रकरणात अनिल अंबनी यांच्याकडे जमीन उपलब्ध होती म्हणून रिलायन्स सोबत हा करार करण्यात आला हे धादांत खोटं आहे. कारण दसॉल्ट एव्हिएशनच्या पैशातूनच अनिल अंबानींनी ती जमीन खरेदी केली होती आणि त्यासाठीच दसॉल्ट एव्हिएशनने काही लाख किंमतीच्या रिलायन्समध्ये तब्बल २८४ कोटी रुपयांचे समभाग विकत घेऊन भलीमोठी गुंतवणूक केली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात भाजप ४० पेक्षा अधिक विद्यमान आमदारांना तिकीट नाकारणार?
पुढील महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली आहे. दरम्यान, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते.
7 वर्षांपूर्वी -
अमित शहा आणि मोहन भागवत यांच्यात भेट, राम मंदिरावर चर्चा?
आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद आदी महत्वाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याकरिता मोदी सरकारवर दबाव आणला असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे. या बैठकीत राम मंदिर तसेच शबरीमला मंदिर अशा मुद्यावर बराचवेळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेलमुळे तोट्यातील रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स कंपनी कोट्यवधींच्या फायद्यात?
अनिल धीरूभाई अंबानी यांच्या अखत्यारीतील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि अनेक वर्ष प्रचंड तोटा नोंदवणारी तसेच भांडवल बाजारात सूचिबद्ध नसलेली रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी राफेल डीलच्या कारणाने कोट्यवधींच्या नफ्यात आल्याचे वृत्त डिजिटल न्यूज ‘द वायर’ने प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे अनिल अंबानी राफेल डीलवरून पुन्हा संशयाच्या छायेत आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी'ची काँग्रेससोबत युती, भाजपची आंध्र-तेलंगणा वाट बिकट
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि टीडीपी’ने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला आले असता दोन्ही नेत्यांनी चर्चेअंती हा निर्णय प्रसार माध्यमांसमोर घोषित केला. त्यामुळे आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची लढाई भाजपासाठी अधिकच कठीण होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिल्यास पुढची १ हजार वर्षे राम मंदिर होणार नाही
सध्या लोकसभा निवडुकीच्या तोंडावर सत्त्ताधारी पक्ष राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक होताना दिसत आहे. त्यात केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना विकासाच्या मुद्यावर तोंडघशी पडल्याने त्यांनी केवळ अयोध्येतील राम मंदिरावर मोर्चा वळवला आहे. सत्ताकाळात वाढलेल्या महागाईपासून सामान्यांचं परावृत्त करण्यासाठी शिवसेनेकडून केवळ राम मंदिरावर रोजच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अयोध्येतील राममंदिरासाठी ती जागा ताब्यात घ्या : आरएसएस
अयोध्येतील विवादित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे थेट जानेवारी महिन्यात ढकलली असतानाच, आरएसएस’ने राममंदिर उभारणीबाबत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आक्रमक पवित्र घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी आता विवादित जागेचा ताबा घेणे आणि ती संबंधित ट्रस्टकडे हस्तांतरित करणे बाकी आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने तातडीने तशी हालचाल करावी, अशी मागणी उचलून धरली केली.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार राफेलच्या किंमतीची माहिती सर्वोच्च न्यायालयालाही देणार नाही?
वादग्रस्त ठरलेले आणि देशभर वादंग निर्माण करणारे राफेल लढाऊ विमान डील प्रकरणातील विमानांच्या मूळ किंमती संदर्भातील माहिती सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे बंद लिफाफ्यातून मागितली होती आणि तसे आदेश सुद्धा देण्यात आले होते. परंतु, ही गोपनीय माहिती मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयालासुद्धा देणार नसल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. त्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, ही अत्यंत गोपनिय माहिती असून ती न्यायालयालासुद्धा देण्यास मोदी सरकार असमर्थता दर्शविणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे आहे.
7 वर्षांपूर्वी -
सामान्यांचे भर दिवाळीत बुरे दिन! गॅस सिलिंडर महागले
संपूर्ण देशात विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल साठ रुपयांची तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये २.९४ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे भर दिवाळीत घरात फराळ बनवताना सुद्धा दहावेळा विचार करावा लागणार आहे. आधीच प्रचंड महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाचा एकही सण आनंदात जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुद्धा तब्बल ५९ रुपयांची वाढ झाली होती. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग ७ वी वाढ आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठी भाषेला स्थान नाही; तमीळ, उर्दू नावांमध्ये चुका, तर विदेशी भाषा खास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. तसेच हे शिल्प साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली खरी, परंतु मोदींच्या गुजरातमध्ये त्या पुतळ्याजवळ ५ विदेशी भाषा आणि ५ भारतीय भाषांना स्थान देताना मराठीला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. तसेच गुजराती भाषा वगळून इतर भारतीय भाषांमध्ये व्याकरण्याच्या चुका झाल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल डील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला १० दिवसांची मुदत
राफेल डील संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला बुधवारी झालेल्या सुनावणीत दहा दिवसांची मुदत ठरवून दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने दहा दिवसांत राफेल डील’मधील सर्व धोरणात्मक प्रक्रिया आणि किंमती संदर्भातील संपूर्ण तपशील लखोटाबंद पाकिटात न्यालयासमोर सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
'मेक इन इंडिया - स्किल इंडिया' नारा देत चिनी कामगारांकडून बनवून घेतला 'स्टॅचू ऑफ युनिटी'
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील नर्मदा नदीच्या क्षेत्रात तब्बल २,९८९ कोटी खर्च करून उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण केले. वास्तविक या पुतळ्याची उभारणी करताना त्याची सर्वाधिक झळ ही स्थानिक २२ गावातील गावकऱ्यांना बसली आहे. हा पुतळा उभारताना आजूबाजूच्या धरणक्षेत्राची सुद्धा मोडतोड झाल्याचे स्थानिक लोकं सांगतात. दरम्यान, इथल्या आजूबाजूच्या अनेक भागाचं नुकसान झाल्याने गावातील लोकांच्या उपजीविकेचा मार्ग सुद्धा बंद झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
RBI गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार?
RBI गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देऊ शकतात असे वृत्त सध्या प्रसार माध्यमांवर झळकत आहे आणि तसे झाल्यास नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात. सध्या स्वायत्ततेच्या प्रश्नावरून RBI आणि मोदी सरकार दरम्यान तणाव वाढत असून RBIच्या कर्मचारी संघटनेने सुद्धा केंद्राला त्या संदर्भात लेखी पत्र लिहिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची आज ३४ वी पुण्यतिथी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह देशातील अनेक मान्यवरांनी इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या भीतीने भाजपवर पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकार दत्तक घेण्याची वेळ? सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशिष्ठ विषयाला अनुसरून आणि अचूक संदर्भ जोडून सत्ताधाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरून हैराण करून सोडलं आहे. विशेष म्हणजे प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांवर त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यात मोदी आणि अमित शहा व्यंगचित्रात नेहमीच केंद्रस्थानी असल्याने समाज माध्यमांवर चांगलाच धुरळा उडत आहे. परंतु, राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला व्यंगचित्राच्याच माध्यमातून प्रतिउत्तर देताना भाजपच्या पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकारांना विषय आणि संदर्भ याचं प्राथमिक ज्ञान नसल्याचं दिसत असून, त्यात भाजपचीच फजिती होत आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS