महत्वाच्या बातम्या
-
भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरमागे तब्बल ७३ ची पातळी ओलांडली
अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य रोज नवे नीचांक गाठताना दिसत आहे. सर्व प्रमुख आशियाई देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य खूप वेगाने घसरत आहे. आज बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७३.३४ असा विक्रमी निच्चांकी तळ रुपयाने गाठला आहे, परिणामी महागाईमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी आंदोलक घरी परतले
भारतीय किसान युनिअनची हरिद्वारहून निघालेली ‘किसान क्रांती पदयात्रा’ नवी दिल्लीतील किसान घाट येथे समाप्त करण्यात आली. काल रात्री उशिरा पोलिसांनी शेतकऱ्यांना किसान घाटावर जाण्याची अधिकृत अनुमती दिली. मात्र, केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप करत शेतकरी निराश होऊन परतण्यास सुरुवात झाली आहे. आपण हे आंदोलन आता मागे घेत आहोत आणि त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा आपापल्या घरी परतावे, असे आवाहन शेतकरी नेते टिकैत यांनी केले.
7 वर्षांपूर्वी -
अच्छे दिनची स्वप्नं; नंतर हिंदुस्तानच्या सामान्य माणसाच्या कापडापासूनच सूत तयार करणारे मोदी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधीजींच्या जयंतीचे अभिवादन करून व्यंगचित्रातून “अच्छे दिनच्या स्वप्नांचं” उपहासात्मक वास्तव मांडलं आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी कापडापासून सूत तयार करणारे महात्मा गांधींजी दर्शवले आहेत. परंतु त्यात महात्मा गांधीजींच्या वेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चरखा चालवताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या बाजूला अमित शहा असणं जरुरीचं असल्याने ते सुद्धा या व्यंगचित्रात दिसत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
दिल्लीत किसान क्रांती यात्रेचा मोर्चा उधळून लावण्यासाठी पॅरामिलिटरी तैनात
दिल्ली सध्या किसान क्रांती यात्रेने तापली आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भारतीय किसान युनियनच्या आंदोलकांना भाजप सरकारच्या जुलमी कारवाईला सामोरे जावं लागत आहे. मोर्चेकऱ्यांनी उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात केली होती. दरम्यान त्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून पोलिसांकडून तुफान पाण्याचा मारा करण्यात येत आहे. पोलिसांसोबत आरपीएफ आणि पॅरामिलिटरी तैनात करून पूर्व दिल्लीच्या अनेक भागात कलम १४४ लागू करून जमावबंदीला सुरुवात करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजीव गांधी बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले, तसे मोदी सरकारने राफेलच्या चौकशीला सामोरे जावे
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून मोदी सरकारला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या काळातील बोफोर्स तोफांच्या करारातील व्यवहाराची चौकशी व्हावी अशी विरोधी पक्षांची मागणी होती आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सुद्धा बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले होते याची आठवण त्यांनी मोदींच थेट नाव न घेता करून दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
तनुश्रीच्या आडून दिल्लीश्वरांचा नाना पाटेकर आणि मनसे विरुद्ध सापळा? सविस्तर
झूम वहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर तनुश्रीने पुन्हा प्रसार माध्यमांसमोर नाना पाटेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ज्या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून तरी तिचे बोलविते धनी दुसरेच कोणी असून सर्व काही सिनेमाप्रमाणे स्किप्टेड (ठरवून) असल्याची कुजबुज प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. अगदी ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाचा वाद, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे असा कशाचा कशाला संदर्भहीन विषय तिच्या पत्रकार परिषदेत आला कसा अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या हातून निसटलेल्या पाणी फाऊंडेशन तसेच ‘अक्षय कुमार’ राजकारणाशी त्याचा थेट संबंध जोडला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं : सुमित्रा महाजन
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर आश्चर्यकारक विधान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं असं थेट विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. शिक्षण तसेच नोकरीमध्ये कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
लोकशाहीत थापा मारून निवडणूक जिंकणं हा एक मार्ग बनला आहे: उद्धव ठाकरे
निवडणुकीत थापा मारण्याच्या भाजपच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून तोंडसुख घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलं आहे. तसेच निवडणुकांतील आश्वासने पूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जाहीर केली होती. मात्र निवडणूक आयोगाची ही घोषणा त्यांच्या मागील घोषणांप्रमाणे केवळ पोकळ आश्वासन ठरु नये, अशी टीका करत अप्रत्यक्षरित्या भाजपच्या खोट्या आश्वासनांना उजाळा देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सीएनजीवर मोदी सरकारची वक्रदृष्टी! आता सीएनजी वाहन धारकांचे बुरे दिन
प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिल गेलं. अनेक वाहन धारक ज्याच्या गाड्या सीएनजीवर चालतात म्हणून खुश होते. परंतु त्यांना सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांसारखं महागडं सीएनजी भराव लागणार आहे. मोदी सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो १.७० रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये १.९५ रुपयांनी दर वाढले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
वायुदलाकडून अभिनंदन, HAL च्या अचाट कामांची क्षमता बघा! मग रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट कंत्राट का दिले?
HAL अर्थात भारतीय संरक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड” कंपनी जीच्या क्षमतेवर समाज माध्यमांवर नकारात्मक गोष्टी फसविण्यास सुरुवात झाली आणि मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक तसेच ऑफसेट नियमांच्या आडून रिलायन्स डिफेन्स लिमिटेड बाबतीत होकारात्मक बातम्या पेरण्यास समाज माध्यमांवर सुरुवात झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
हायअलर्ट! बायोमेड कंपनीची लस महाराष्ट्र व यूपी'मध्ये वापरल्याने पोलिओचा धोका
भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झाल्याने संपूर्ण देशात आणि विशेष करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात याच बायोमेड कंपनीची लस वापरल्याचे समोर आल्याने या दोन राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आधी काँग्रेस आणि आता मोदी सरकारविरोधात अण्णांचं आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडणार आहेत. लोकपाल तसेच कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती दिवशी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा मोदी सरकारला इशारा दिला आहे. राज्य भाजपच्या अनेक दिग्गज नेते मंडळींनी यावर तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, मात्र अण्णांनी माघार घेणार नसल्याचं कळवलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पासवर्ड बदला! फेसबुकवर तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅक, सर्वाधिक भारतीय अकाउंट
फेसबुकवरील तब्बल पाच कोटी अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये सर्वाधिक भारतीय अकाऊंटचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. हॅकर्सनी फेसबुकच्या “View As” या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा नेमका फायदा उचलत फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी नावाच्या फुग्यात हवा माध्यमांनी भरली, ती माध्यमांनाच काढावी लागेल
मोदी नावाच्या फुग्यात हवा माध्यमांनी भरली, ती माध्यमांनाच काढावी लागेल
7 वर्षांपूर्वी -
त्या व्हिडिओ ने खळबळ: डेसॉल्टचे अध्यक्ष बोलले, राफेलसाठी एचएएल'सोबत करार जवळपास झाला होता
२५ मार्च २०१५ म्हणजे नरेंद्र मोदींच्या फ्रान्स भेटीच्या (१० एप्रिल २०१५) केवळ १५ दिवस आधी फ्रान्समध्ये मिराज-२००० या लढाऊ विमानांच्या हस्तांतराचा कार्यक्रम फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. डेसॉल्ट एव्हिएशन आयोजित या कार्यक्रमात म्हणजे मोदींनी राफेल बाबत नवीन करार अंमलात आणण्यापूर्वी जे घडलं होत, त्याचे अनेक खुलासे आणि वास्तव समोर आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा व्हिडिओ डेसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल’वरीलच आहे. दरम्यान या कार्यक्रमात मिराज-२००० लढाऊ विमानांच्या हस्तांतरानंतर भारत सरकार आणि भारतीय वायू दल पुढच्या नव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या बांधणीत म्हणजे राफेलच्या करारात उतरणार होत. त्यात एचएएल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच नाव जवळपास निश्चित झालं होत, असं या व्हिडिओमधून समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेलवरून क्लीनचिट भोवली? पवारांना धक्का, विश्वासू नेते तारिक अन्वर यांचा राष्ट्रवादीला रामराम
एनसीपीचे राष्ट्रीय सचिव तसेच खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांना जोरदार राजकीय धक्का दिला आहे. लोकसभेतल्या खासदारकीचा सुद्धा त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी एका मुलाखतीदरम्यान राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली होती. तसेच नरेंद्र मोदींच्या हेतूवर सुद्धा जनतेला संशय नसल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं होत.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मोदींच्या भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला: सविस्तर
सरकार बदललं तरी देशातील गरीब श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बार्कलेज हुरुन रिच लिस्टवरुन देशातील हे वास्तव समोर आलं आहे. मोदींच्या प्रत्येक भाषणात गरीब आणि गरिबी झळकते, परंतु जमिनीवरील वास्तव वेगळंच असल्याचं चित्र आहे. आधीच वाढत्या इंधन दरामुळे विकोपाला गेलेली महागाई आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य माणसाची अवस्था फारच कठीण होऊन बसली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला
भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला
7 वर्षांपूर्वी -
विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही, कलम ४९७ रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा क्रांतिकारी निकाल
देशातील स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान म्हणजे आयपीसी कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणं महत्त्वाचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS