महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरेंनी रेखाटले स्वतः मध्ये रममाण झालेल्या प्र'सिद्धि विनायका'च व्यंगचित्र, होरपळणारी जनता पोरकी
सध्या देशात महागाईपासून अनेक ज्वलंत विषय पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ स्वतःची प्रसिद्धी करण्यातच व्यस्त असल्याचा धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच प्र’सिद्धिविनायका’च व्यंगचित्र रेखाटलं आहे. देशात अनेक महापुरुष असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये नरेंद्र मोदींवरील चित्रित करण्यात आलेला लघुपट दाखविण्याचे डिजिटल फर्मान सुद्धा सोडण्यात आले होते, त्या मुद्याला सुद्धा राज ठाकरे यांनी हात घातला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशातील भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकिटासाठी उत्सुक?
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यात मोठा फटका बसून काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता अनेक सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यात भाजपला सर्वाधिक फटका हा राजस्थान आणि मध्यप्रदेश बसण्याची शक्यता असल्याने भाजपचे विद्यमान आमदार राजकीय गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त करून काँग्रेसची मोदींना वाढदिवसाची भेट
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असून परिणामी महागाईचा भडका उडाला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे मोदी सरकार विरोधात जनतेचा रोष वाढत असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २ रुपयांची कपात करून सामान्यांना दिलासा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझेल ३५-४० रुपयांना विकेन
केंद्रातील मोदी सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझल ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो असं धक्कादायक विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. सरकारने जर मला केवळ करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत दिली तर मी ते शक्य करू शकतो, असं रामदेव म्हणाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला २० घरांचं लक्ष्य, पण लोकं घरात गप्पांसाठी कार्यकर्त्याना 'चहा' पाजणार का ?
भाजपच्या गोटातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्याला २० घरांचं लक्ष्य आखून दिलं आहे. भाजपने आखून दिलेल्या या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ते रहिवासी असलेल्या स्थानिक लोकांच्या २० घरांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेली कामं त्यांच्यासोबत ‘चहाचा आस्वाद’ घेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहेत, असं लक्ष आखून देण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जदयू'मध्ये प्रवेश
२०१४ मधील निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार तसेच प्रसिद्ध निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सत्ताधारी पक्ष जदयू’मध्ये प्रवेश घेऊन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. रविवारी बिहारची राजधानी पाटणामध्ये जदयू कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी औपचारिकरित्या जदयूत प्रवेश केला आणि सक्रिय राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी मंत्री असल्यामुळे माझ्या गाडीत सरकारकडून पेट्रोल-डिझेल भरले जाते: आठवले
सध्या देशभरात इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आणि त्या अनुषंगाने वाढत्या महागाईमुळे सामान्य हैराण झाले असताना देशातील मंत्र्यांना त्याची काहीच झळ बसत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेत तसंच काहीस सत्य समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी दिल्लीला रवाना, मुख्यमंत्रीपद सोडणार?
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती कारणास्तव सध्या गोव्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात येणार आहे. पर्रीकर ६ सप्टेंबरला अमेरिकेतून उपचार घेऊन परतले. मागील ७ महिन्यांपासून आजाराने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
7 वर्षांपूर्वी -
अशा लोकांमुळे भारत जागोजागी अस्वच्छ होतो
अशा लोकांमुळे भारत जागोजागी अस्वच्छ होतो
7 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू - डीएमके'चे नगरसेवक सेल्वाकुमार यांचा महिलेवर हल्ला
तामिळनाडू – डीएमके’चे नगरसेवक सेल्वाकुमार यांचा महिलेवर हल्ला
7 वर्षांपूर्वी -
हरियाणा : सीबीएसई टॉपर मुलीवर सामूहिक बलात्कार - आईचा मोदींना प्रश्न
हरियाणा : सीबीएसई टॉपर मुलीवर सामूहिक बलात्कार – आईचा मोदींना प्रश्न
7 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश - मशिदीमध्ये दाउदी बोहरा समुदायाला संबोधित करताना मोदी
मध्य प्रदेश – मशिदीमध्ये दाउदी बोहरा समुदायाला संबोधित करताना मोदी
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल डिझेलचे दर आणि त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता
मागील अनेक दिवसांपासून वाढणारे इंधनाचे दर आणि त्यामुळे वाढत जाणारी महागाई कमी होण्याची शक्यता नसून ती अधिकच वाढण्याची लक्षण दिसू लागली आहेत. कारण मागील महिन्यापासून जागतिक पातळीवर क्रुड ऑईलचे उत्पादन प्रति दिन १० कोटी बॅरेल इतके विक्रमी झाले होते. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत जागतिक घडामोडींमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, त्यामुळे इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
फरार आरोपींचे भाजपवर एकामागे एक आरोप, अर्थमंत्री अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय: ललित मोदी
काही दिवसांपूर्वी भारतीय बँकांचे ९००० कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर पलायन केलेल्या आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, अशी धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. परंतु, त्यानंतर आता अजून एक भारताबाहेर पलायन केलेला आरोपी ललित मोदीने अर्थमंत्री अरुण जेटलींची तुलना सापाशी करत, त्यांना खोटं बोलण्याची सवय असल्याचा दावा करत विजय मल्ल्याची भेट झाल्याचं खरं असल्याचं म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपतींकडून रंजन गोगई यांची भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगई यांची आज राष्ट्रपतींकडून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीश रंजन गोगई ३ ऑक्टोबरपासून त्यांचा पदभार स्वीकारतील. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तथ्यहीन आरोप? राहुल गांधी किंगफिशरचे मालक मग बँकांची आणि ईडी'ची कारवाई मल्ल्यावर का?
किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटल्याचा आणि बँकेच्या कर्जप्रकरणी अरुण जेटलींकडे सेटलमेंटचा प्रस्ताव मांडल्याचा खुलासा केला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले आणि त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अर्थमंत्र्यां अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
केंद्रीय आरोग्य विभागाकडून तब्बल ३४३ औषधांवर बंदी
केंद्रीय आरोग्य विभागाने एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या तब्बल ३४३ औषधांवर कायमची बंदी घातली आहे. या औषधांना ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ म्हटले जाते आणि ते सामान्यांच्या आरोग्यास हानीकारक असल्याने या औषधांवर आता बंदी घातली गेली आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडीओ: मल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली होती
भारतीय बँकांना करोडो रुपयांचा चुना लावून भारतातून पलायन करणारा आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याने धक्कादायक खुलासा केला आहे. मोदी सरकार अडचणीत येणार विधान त्याने केलं असून मल्ल्या लंडनमधील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाला की, ‘त्याने भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती’.
7 वर्षांपूर्वी -
रघुराम राजन मोदींच्या पीएमओ'बद्दल बोलले की मनमोहन सिंग यांच्या? स्पष्टता टाळली
सध्या आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या बँकांमधील बुडीत कर्जाच्या संबंधित विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्याच मूळ कारण म्हणजे रघुराम राजन यांनी निवेदनात म्हटलं आहे की, ‘हाय प्रोफाईल’ कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती. मात्र त्या यादीचं पुढे काय झालं, तसेच सरकारनं त्यांच्यावर काय कारवाई केली, याची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र राजन यांनी निवेदनात पीएमओबद्दल स्पष्ट तसेच सविस्तर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ते नक्की मोदींच्या पीएमओबद्दल बोलत आहेत, की मनमोहन सिंग यांच्या पीएमओबद्दल याबद्दल जराही स्पष्टता नसल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
महागाईने जगणं मुश्किल केल्यानंतर, मोदींवरील 'चलो जिते है' लघुपटाचं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्क्रीनिंग?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील लघुपट ‘चलो जिते है’ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविला जाणार आहे. राज्य शासनाने तशा प्रकारचे लेखी आदेश काढले नसले तरी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना व्हॉट्सअँपच्या माध्यमातून फर्मान सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER