महत्वाच्या बातम्या
-
भाजप-शिवसेना गप्प, गुजरातचा महाराष्ट्राला तापी खोऱ्यातील हक्काचे पाणी देण्यास नकार
गुजरात राज्याने पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्र पाठवून गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी द्यावे अशी विनंती केली होती. परंतु गुजरात सरकारने स्पष्ट नकार देत महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावत मुख्यमंत्र्यांच्या विनंती पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनतेने इंदिरा गांधींना धडा शिकवला होता, तसा मोदींनाही धडा शिकवेल: पवार
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधींचा दाखला देत हे वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी -
अखेर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले आणि विरोधी पक्षाने सुद्धा सरकार स्थापन करण्यात रस न दाखविल्याने अखेर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर, भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला, सत्तेतून बाहेर
जम्मू काश्मीरमध्ये सत्तेतून बाहेर पडून भाजपने पीडीपीला धक्का दिला आहे. पीडीपी बरोबर सत्तेत राहण्यामागे जो हेतू तो साध्य न झाल्याचे कारण देत भाजपने पाठिंबा काढला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सामांन्यांचे हाल पण तेल कंपन्या मालामाल, ५२ हजार कोटीचा नफा
देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव भडकल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली असली तरी भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी बक्कळ कमाई केल्याचे चित्र आहे. कारण या कंपन्यांनी तब्बल ५२ हजार कोटी इतका प्रचंड नफा कमावल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांची उचलबांगडी ?
व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी ICICI बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना हटवून त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कडून संचालक आणि सीओओ पद काढून संचालक मंडळाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रादेशिक पक्षात देशात सेनेला सर्वाधिक देणग्या, सर्वाधिक देणगीदार बांधकाम क्षेत्रातील
सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला शिवसेना पक्ष हा संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय देणग्या मिळवण्यात अव्वल ठरली असल्याचे २०१६-१७ च्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे अधीकृत रित्या उघड झालेल्या देणगीदारांच्या यादीत बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी तो १३५० किमी पायी दिल्लीला
तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशाचा दौऱ्यावर आले असता त्यांनी जनतेला इस्पात जनरल हॉस्पिटलला सुपर स्पेशलिटी करण्याचे व ब्राह्मणी पुल उभा करण्याचे जाहीर आश्वासन दिल होत. मोदींचा तेच आश्वासन २०१८ उजाडल तरी प्रत्यक्ष अस्तित्वात न उतरल्याने, त्याची आठवण मोदींना करून देण्यासाठी ३० वर्षीय मुक्तिकांत बिस्वल पायी दिल्लीला पोहोचला.
7 वर्षांपूर्वी -
याचना नाही आता युद्धच, पंतप्रधान निवासस्थानावर आपचा मोर्चा
आप पक्षाने मोदी सरकारविरोधात दंड थोपटले असून थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा घेऊन जात गेले. दिल्लीच्या मंडी हाऊस ते पंतप्रधान निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवारांना निमंत्रित करून उपराष्ट्रपतींचे स्वागत पुणेरी पगडीने?
सध्या महाराष्ट्रात पगडी राजकारणाने जोर पकडल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून करण्याचा निर्णय पुण्यातील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेतल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
मला कर्नाटकच्या फिटनेस व विकासाची चिंता, मोदींच फिटनेस चॅलेंज झिडकारल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींना दिलेलं फिटनेसच चॅलेंज झुगारून तर लावलेच पण मोदींना चांगलेच झोंबेल असं प्रतिउत्तर ट्विटर वरून दिल आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वत:वर गोळी झाडून भय्यूजी महाराजांची आत्महत्या
स्वत:वर गोळी झाडून भय्यूजी महाराजांनी जीवन संपवलं असलं तरी अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट असल्याचं समजतं. इंदूरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
7 वर्षांपूर्वी -
आदर्श ग्राम योजनेत सत्ताधाऱ्यांच्या खासदारांनाच रस नसल्याचं उघड
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी अशा ‘आदर्श ग्राम योजनेत’ भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांसहित लोकसभा आणि राज्यसभेतील तिसऱ्या टप्यात ७८ टक्के खासदारांनी या योजनेकडे अक्षरशः पाठ फिरवल्याच एका आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अनास्था समोर आली आहे. तब्बल ७८ टक्के खासदारांनी अजूनपर्यंत गाव देखील दत्तक घेतलेलं नाही.
7 वर्षांपूर्वी -
टीडीपीच्या केंद्रातील रिक्त मंत्रिपदांवर सेनेचा डोळा ?
सत्तेत राहून भाजपला विरोध करत राहायचा आणि योग्य वेळ येताच स्वतःची ‘बार्गेनिंग पवार’ वापरून महत्वाची खाती पदरात पाडून घ्यायची रणनीती सध्या सत्ताधारी आपसातच करताना दिसत आहेत. ज्या चंद्रा बाबूंच्या तेलुगू स्वाभिमानाने केंद्रातील मंत्रिपदांना मागचा पुढचा विचार न करता लाथ मारली त्याच रिक्त झालेल्या मंत्रिपदावर दिखाऊ स्वाभिमान दाखविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा डोळा असल्याचे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून समजलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रणव मुखर्जींच्या प्रतिमेचे फोटोशॉप, शर्मिष्ठा मुखर्जीची भीती खरी ठरली ?
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळ्याला उपस्थितीत होते. तिथे त्यांनी उपस्थितांना दिलेल्या भाषणात भारताच्या लोकशाहीचे अर्थ आणि महत्व पटवून दिले. परंतु प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जीनी वडिलांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. काल त्यांनी भाषण दिल आणि आज प्रणव मुखर्जींचे बदललेले फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत. शर्मिष्ठा मुखर्जीनी काही भाजप आणि संघाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटनं ते केलं अशी शंका उपस्थित केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर?
२०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूका लक्षात घेता सध्या बिहारमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडी एनडीएला डोकेदुखी ठरू शकतात. कारण भाजपप्रणीत एनडीए बिहारमध्ये फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे समजतं.
7 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबूंकडे जाण्याचं धाडस नाही झालं, पण मातोश्रीवर आत्मविश्वासाने गेले?
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे जर भाजप नेतृत्वाला खरोखरच जुन्या मित्र पक्षासोबत पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जोडायचे होते तर तो प्रयत्नं टीडीपी सोबत म्हणजे चंद्राबाबूंना भेटून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न का नाही झाला, जसा शिवसेनेसोबत अगदी सहज झाला?
7 वर्षांपूर्वी -
आरबीआयकडून रेपो दरात वाढ, महागाई अजून वाढण्याची शक्यता
भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१८-१९ या वर्षाचे पतधोरण जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वीचा रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के असेल. त्यामुळे ग्राहकांसाठी एक वाईट बातमी अशी या निर्णयामुळे महागाईही वाढण्याची चिन्हं असून कर्जाचा हप्ता सुद्धा वाढणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
सीबीआयला इशरत जहाँ प्रकरणी मोदींना व शहांना अटक करायचं होत
सीबीआयला गुजरातमधील इशरत जहाँप्रकरणी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक करायची होत असं खुलासा गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक डी. जी. वंजारा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अफजल खान व उंदीर यांची उद्या गळाभेट : काँग्रेस
आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अनेक वेळा चिखलफ़ेक आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीवर कॉग्रेसने ट्विटरवरून उपहासात्मक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER