14 December 2024 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

मोदींनी स्वतः कोरोना लस घेऊन लोकांच्या मनातील शंका दूर करावी | राष्ट्रवादीची मागणी

PM Narendra Modi, Covid vaccination campaign, Vaccinating himself, Minister Nawab Malik

मुंबई, ११ जानेवारी: देश करोना लसीकरणासाठी सज्ज झाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने यानिमित्ताने लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना मांडले.

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेत कोरोना लसीविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेण्याची मागणी केली. त्यामुळे आता भाजपकडून नवाब मलिक यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी कोरोना लसीकरणाच्या मोहीमेविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. तेव्हा मोदींनी येत्या 16 तारखेपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले.

 

News English Summary: While the country is gearing up for corona vaccination, the Nationalist Congress Party (NCP) has made a big demand to allay people’s doubts. Prime Minister Narendra Modi should start the Kovid vaccination campaign by vaccinating himself, said Nawab Malik, National Spokesperson of the Nationalist Congress Party (NCP) and Minister for Minorities, while talking to reporters here today.

News English Title: PM Narendra Modi should start Covid vaccination campaign by vaccinating himself says minister Nawab Malik news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x