15 December 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

शेतकऱ्यांवर हल्ले करणारे अनेकजण मास्क घालून | पण अनेक माध्यमांची डोळेझाक

Sindhu Border, thugs are attacking, protesting farmers

नवी दिल्ली, २९ जानेवारी: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला धार चढली आहे. सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकरी आंदोलन दडपत आहे, असा गंभीर आरोप राकेश टिकैत यांनी केला होता. सरकार आणि पोलिसांच्या दबावामुळे संयमाचा बांध फुटलेल्या राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हेच अश्रू खचलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा उमेद देणारे ठरले आहेत. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकवटण्यास सुरुवात झाली आहे.

दिल्लीमध्ये असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाला आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर खाली करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. शेतकरी आंदोलनामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 1.45 च्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांच्या तंबूजवळ गेले आणि त्यांचं सामान तोडायला सुरूवात केली. यानंतर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली, ज्यात दगडफेकही करण्यात आली.

जे शेतकरी मुद्दे आहे त्यावर सरकारसोबत बातचीत होईल. शेतकऱ्यांचे मागण्यांवर समाधान झाल्यानंतर ही जागा सोडू. तोपर्यंत कुठलीही बॉर्डर खाली होणर नाही, असं राकेश टिकैत म्हणाले.

दुसरीकडे अनेक संशयास्पद मुद्दे देखील पुढे यात आहेत. या हिंसाचारात मास्क घालून अनेक चेहरे धुडगूस घालत असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक ठिकाणी मॉब जेव्हा शेतकऱ्यांच्या दिशेने दगडफेक करायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने हजर असलेले पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: The tears of farmer leader Rakesh Tikait have once again sharpened the farmers’ movement. Rakesh Tikait had made a serious allegation that the government was suppressing the farmers’ agitation with the help of the police administration. Rakesh Tikait, who lost his temper due to pressure from the government and the police, shed tears. These are the tears that have rejuvenated the farmers. In Ghazipur, farmers have started regrouping.

News English Title: Sindhi Border thugs are attacking protesting farmers news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x