14 December 2024 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

लॉकडाऊनचा कालावधी अजून वाढणार का ? केंद्रीय सचिवांचं उत्तर...

Corona Crisis, Corona Virus, Lock Down

नवी दिल्ली, ३० मार्च: करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना सतावतोय. जनतेच्या मनातील याच प्रश्नाचं उत्तर नकारार्थी देत केंद्र सरकारनं सामान्यांना दिलासा दिलाय.

कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लोक आपल्याच घरात कैद आहेत. याचदरम्यान लोकांमध्ये आता लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यात मोठ्याप्रमाणात अफवाही पसरल्या आहेत. यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गोबा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लॉकडाऊन वाढवले जाणार असल्याच्या वृत्तामुळे चकित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. आमची अशी कोणतीच योजना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १००० पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे भारतातील धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी घरात राहणे आणि स्वत:चा बचाव करणे हा एकमेव पर्याय आहे.

 

News English Summary: There is a lock down nationwide due to the Corona virus. People are imprisoned in our own homes. In the meantime, discussions are now on about whether the lock down period will be extended to the public. There have been widespread rumors. Cabinet Secretary Rajiv Goba has expressed surprise at this. He said he was surprised by the report that the lock down would be extended. This news is shocking. They have made it clear that we have no such plans.

 

News English Title: Story corona lock down to extend after 21 days know what the cabinet secretary said News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x