केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस
मुंबई, २६ मे: कोरोनाच्या काळात केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना महाराष्ट्रासोबत अन्याय केला जात असल्याची भूमिका तयार केली जात आहे. खोटा प्रचार करून केंद्र सरकराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचू भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी कशा प्रकारे मदत केली व करतंय याचा लेखाजोखा मांडला. महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडण्यात आल्या असून श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी केंद्राने दिले आहेत. तर मजुरांच्या छावण्यांसाठी १ हजार ६११ कोटींचा निधी देण्यात आला आहे. १०लाख पीपीई आणि १६ लाख एन ९५ मास्क यांचा पुरवठा राज्याला करण्यात आला आहे. शिवाय शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला आहे. तसंच राज्याला एप्रिल आणि मे महिन्याचा आगाऊ निधी देण्यात आला आहे. गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ देण्यात आलं आहे. यासह जनधन योजनेचे १३०८ आणि उज्ज्वला अंतर्गत १६२५ कोटी देण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने GDPच्या ५ टक्के कर्ज घेता येईल असा निर्णय घेतला. यामुळे राज्याला एक लाख ६० हजार कोटी कर्ज घेता येऊ शकतं. राज्य सरकारने बोल्ड पावले उचलली पाहिजेत, असंही फडणवीस म्हणाले.
- केंद्र सरकारने काय काय केलं?
- महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडल्या
- श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी दिले
- मजुरांच्या छावण्यांसाठी १ हजार ६११ कोटींचा निधी दिला
- पीपीई आणि एन ९५ मास्क यांचा पुरवठा केला
- शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला
- एप्रिल आणि मे महिन्याचा निधी आगाऊ दिला
- गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ दिली गेली
- जनधन योजनेचे १३०८ कोटी दिले गेले
- उज्ज्वला अंतर्गत १६२५ कोटी
News English Summary: During the Corona period, the Central Government is trying its best to help Maharashtra. But in such a situation, the role is being created that injustice is being done to Maharashtra. Former Chief Minister Devendra Fadnavis has accused the Mahavikas Aghadi government of trying to tarnish the image of the Center by spreading false propaganda.
News English Title: Former Chief Minister Devendra Fadnavis has accused the Mahavikas Aghadi government News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या