महत्वाच्या बातम्या
-
TRP घोटाळा उघड करून त्यांनी माध्यमांचं हित जपलं | माध्यमांनी त्यांनाच लक्ष केलं - सविस्तर वृत्त
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांचा स्कॉर्पिओ प्रकरणाशी सचिन वाझे यांचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. सध्या ठाकरे सरकारला लक्ष करण्यासाठी भाजप नेते कोणताच वापर कोणत्या थराला जाऊन करतील याची शाश्वती देता येणार नाही. कारण ठाकरे सरकारला नकारात्मक विषयावरून चर्चेत ठेवणं हाच भाजपाचा एकमात्र कार्यक्रम झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय - मुख्यमंत्री
मला कल्पना आहे, काही गैरसोय होतेय. पण सध्याचे दिवस असे आहेत, गर्दी करु नये. गर्दी होऊ नये म्हणून मी विनंती केली, ती माध्यमांनी मानली धन्यवाद, गैरसोयीबद्दल दिलगिरी असं प्रथम मुख्यमंत्री म्हणाले. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं. हे अधिवेशन घेणे कोरोना काळात आव्हान होतं. मात्र ते घेतलं, सर्वांचे धन्यवाद असं मुख्यमंत्री म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला मान्यता मिळावी म्हणून भाजपने हा कट रचला
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझेंवर चर्चा होते | लोकहिताच्या प्रश्नांवर नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असा अप्रत्यक्ष टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.ते आज मुंबईत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना याविषयावर प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | फडणवीसांचं विधान म्हणजे खोटे बोला पण रेटून बोला असा प्रकार - अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वाद सुरू झाल्याचे आज पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिलेला आहे. आता यावर अशोक चव्हाणांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षण हे कोणाच्याही मालकीचे नाही आणि खोटे बोल पण रेटून बोला असे फडणवीसांचे आहे असे म्हणत अशोक चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले आहे.
4 वर्षांपूर्वी -
३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी लागताच | मुनगंटीवारांना आशा देवेंद्रजींच्या पुन्हा येण्याची
विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ | ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समिती जाहीर
विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग दाखल | तर अशोक चव्हाणांविरुद्ध सुद्धा हक्कभंग आणणार
मनसुख हिरेन प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांना क्राइम ब्रांचमधून काढले जाणार असल्याची घोषणा केली. ते विधान परिषदेत बोलत होते. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधिमंडळात भाजपने थेट एपीआय सचिन वझे यांचे नाव घेतले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले, की सचिन वझे यांना बाजूला करावे अशी मागणी विरोधकांकडून झाली. त्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. त्यांना क्राइम ब्रांचमधून बाहेर केले आहे. त्यांना इतर ठिकाणी पाठवले जाईल.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया केस | NIA' कडून मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर 25 फेब्रुवारीला आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेच (NIA) ने सुरु केला आहे. मंगळवारी एक टीम मुंबईत पोहचली आहे. या टीमने मुंबईत येताच विविध ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIAची टीम स्कॉर्पियो गाडीच्या मागे दोन वेळेस दिसून आलेल्या इनोव्हा गाडीच्या तपासाच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन परीक्षा | इंटरनेट नेटवर्कसाठी गोंदियातील विद्यार्थ्यांची छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव
देशातील ग्रामीण भागाच्या अनेक पट्ट्यांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात अनेक ठिकाणी दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्याचा थेट परिणाम शिक्षणावर होताना दिसत असला तरी सरकारी यंत्रणांना त्याचं गांभीर्य नाही असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले | फडणवीसांच्या वक्तव्यावरून पोलीस वसाहतींमध्ये संताप
मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन हत्या आणि अन्वय नाईक, भाजप खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणांवरून मंगळवारी विधानसभेत रणकंदन झाले. मनसुख हिरेन यांची हत्या मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीच केल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते देेेवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सत्ताधारी आणि आघाडी सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप फैरी आणि घोषणाबाजीने सभागृह दणाणले. दुपारी १२ ते ४ अशा पावणेचारपर्यंत ८ वेळा आणि अखेर दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी आठव्या वेळेस दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि निवडणुका | दिल्लीश्वरांना दैवी शक्ती प्राप्त झाल्याने कोरोना त्यांना स्पर्श करीत नसेल
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळायलाच हवी असं सांगत ‘सद्यपरिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन? टाळता आला तर बघा’, असा अग्रलेखात म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
राज्यांना अधिकारच नसताना भाजपने समाजाची अशी दिशाभूल केली होती | मग ते सेलिब्रेशन मतांसाठी?
देशातील राज्यांना अधिकार नसताना फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा करून दिशाभूल केल्याचे निवेदन आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत केले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी केंद्र सरकारने १०२ वी घटनादुरुस्ती करून कोणत्याही आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारांकडून काढून घेतले असताना, त्यानंतर तीन महिन्यांनी, २९ नोव्हेंबरला फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेेला कायदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे ते म्हणाले. अशोक चव्हाणांच्या या निवेदनावर बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही म्हणून विरोधी पक्षाने सभात्याग केला.
4 वर्षांपूर्वी -
जस्टीस लोयांची नागपुरात हत्या झाली | सचिन वाझे तपास अधिकारी राहिले तर यांचं बिंग फुटेल - आ. जाधव
आज देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात हसमुख हिरे प्रकरणी थेट टीआरपी घोटाळा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी सचिन वझेंवर खून केल्याचे आरोप केले. तसेच हसमुख हिरेन यांच्या पत्नीने तक्रारीत काय म्हटले त्याचं वाचन करून दाखवलं. त्यामुळे फडणवीसांवर समाज माध्यमांवर आणि थेट विधानसभेत आरोप होतं असून त्यासाठी त्यांच्या काळातील प्रकरणात त्यांनी कशी बघ्याची भूमिका घेतली होती ते समोर येऊ लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अक्षता नाईक यांच्या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष | हसमुख यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जावर आक्रमक - सविस्तर
आज देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात हसमुख हिरे प्रकरणी थेट टीआरपी घोटाळा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी सचिन वझेंवर खून केल्याचे आरोप केले. तसेच हसमुख हिरेन यांच्या पत्नीने तक्रारीत काय म्हटले त्याचं वाचन करून दाखवलं. त्यामुळे फडणवीसांवर समाज माध्यमांवर आणि थेट विधानसभेत आरोप होतं असून त्यासाठी त्यांच्या काळातील प्रकरणात त्यांनी कशी बघ्याची भूमिका घेतली होती ते समोर येऊ लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख यांचे शेवटचे लोकेशन वसई आणि मी वसईत राहतो या निष्कर्षाने आरोप म्हणजे...
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वझेंनी केल्याचा फडणवीसांकडून संशय | अधिवेशनात गोंधळ
मनसुख हिरेन यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचे तक्रार अर्ज जशास तसे वाचून दाखवले. विमला हिरेन यांना संशय आहे, की एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनीच मनसुख यांची हत्या केली. देवेंद्र फडणवीस यांनी हे वाचताच सभागृहात गदारोळ उडाला. तर सत्ताधाऱ्यांनी प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यामुळे भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. अशात सभागृहाचे कामकाज 4 वेळा तहकूब कारावे लागले.
4 वर्षांपूर्वी -
खडसे चौकशीला सहकार्य करत असतील तर अटकेची गरज काय? | हायकोर्टाचा ईडीला सवाल
भारतीय जनता पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. जर खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर, त्यांना अटक करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न न्यायालयाने ईडीला विचारला आहे.एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयात होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्यानंतर पुढील सुनावणीवर बोलत असताना न्यायालयाने पुन्हा एकदा खडसेंना दिलासा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
विवाहबाह्य संबंध | केवळ मार्केटिंगसाठी भारतीय महिलांची बदनामी | डेटिंग अॅपवर बंदीची मागणी
जागतिक महिला दिनी ग्लिडेन या फ्रेंच डेटिंग अॅपने महिलांच्या डेटिंगबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला. काळाच्या ओघात लोकांची विचारसरणीही बदलत आहे. लोक आता सेक्स या गोष्टीला त्यांची गरज म्हणून स्वीकारत आहेत. अलीकडील काही सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, लोक आपल्या सेक्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लग्नानंतरही विश्वासघात करण्यास धजावत नाहीत. याबाबत ग्लोबल एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप, ग्लेडेनच्या (Gleeden) सर्वेक्षणात काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
Maha Budget 2021-22 | दारुच्या किमती वाढणार | व्हॅटमध्ये 5% वाढ
आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या. पण राज्यात नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. राज्याचं करसंकलनाचं उद्दिष्ट आणि आर्थिक गणित बसवण्यासाठी अजित पवारांनी मद्यावर करवाढ प्रस्तावित केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA