18 April 2024 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

खडसे चौकशीला सहकार्य करत असतील तर अटकेची गरज काय? | हायकोर्टाचा ईडीला सवाल

High Court, Granted relief, NCP leader Eknath Khadse, ED investigation

मुंबई, ०९ मार्च: भारतीय जनता पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. जर खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर, त्यांना अटक करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न न्यायालयाने ईडीला विचारला आहे. एकनाथ खडसे यांना हायकोर्टात होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्यानंतर पुढील सुनावणीवर बोलत असताना न्यायालयाने पुन्हा एकदा खडसेंना दिलासा दिला आहे. (The High Court has once again granted relief to NCP leader Eknath Khadse over ED investigation)

दरम्यान गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या खडसे यांनी १५ जानेवारी रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली. तब्बल सहा तास त्यांची चौकशी सुरू होती. खडसेंनी इसीआयआर रद्द करणे, सुनावणी प्रलंबित असेपर्यंत तपास यंत्रणेला कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली.

समन्स व विचारण्यात आलेल्या प्रश्नांना खडसे योग्य प्रतिसाद देत आहेत. मग त्यांना अटकेची भिती का वाटते? असा प्रश्न हायकोर्टाने ईडीला विचारला आहे.एकनाथ खडसेंनी एक याचिका दाखल करून आपल्यावर नोंदवला गेलेला इसीआयआर रद्द करणे तसेच सुनावणी होईपर्यंत तपास यंत्रणांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने द्यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

एकनाथ खडसेंचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ईडीने आक्षेप घेतला होता. ईडीने घेतलेला आक्षेप अवैध असून तपास यंत्रणेचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप खडसे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

 

News English Summary: The High Court has once again granted relief to NCP leader Eknath Khadse, who joined the NCP after quitting the BJP. If Khadse is cooperating with the ED’s investigation, why arrest him? That is the question the court has asked the ED. Eknath Khadse’s hearing in the High Court was postponed for some reason and he was granted protection till March 8. Speaking at the next hearing after that, the court has once again given relief to Khadse.

News English Title: The High Court has once again granted relief to NCP leader Eknath Khadse over ED investigation news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x