महत्वाच्या बातम्या
-
आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती | भाजपकडून जवाबदारीचं वाटप
मुंबई महानगरपालिका निवडणुकी जवळ आली असताना महाविकासआघाडी सरकारमधील पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी जबाबदारीचं वाटप केलं आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांची नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणुक | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस भरती तात्काळ रद्द करा | अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन छेडू
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण (SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्षांभोवतीच्या लोकांवर गितेंना आजही अविश्वास | शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेकांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. भाजपमधील एक गट नाराज असल्याने अनेक माजी आमदार तसेच नगरसेवक शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत. त्यातच माजी आमदार आणि भाजप नेते वसंत गिते यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केले होते. त्यामुळे गिते सुद्धा ‘मिसळी पे चर्चा’ करून भाजपाला राम राम ठोकण्याचा तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सोबत देखील वसंत गीते यांचं राजकीय वैमनस्य असल्याने त्यांचा भाजपातील मार्ग खडतर आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने ED ला काही नेत्यांचे पुरावे दिलेले | ते भाजपवासी होताच...
राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप अडचणीत | औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा | केंद्राला पत्र
एकाबाजूला औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असताना औरंगाबाद शहराचं नामकरण का झालं नाही? असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – उपमुख्यमंत्री
कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी आज केली.
4 वर्षांपूर्वी -
फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी आता बिल्डरला भरावी लागणार | ग्राहकांना मोठा फायदा
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा देण्यात आलाय. या आधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने विरोध केला होता, पण सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर आज या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली | फडणवीसांना टोला
औरंगाबादचं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेसवर टीका केली असून ही नाटक कंपनी असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असं देखील त्या म्हणाल्या आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस भरतीबाबत GR जारी | SEBC आरक्षण न ठेवता भरती | संपूर्ण GR वाचा
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भातखळकर कालपासून खळ-खळ करतायत | तुम्ही गुजराती की मराठी माणसांचे? - हेमराज शहा
मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च स्थानी असल्याने मुंबईची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यासाठी मराठी मतदारांपासून अमराठी मतदार देखील शिवसेनचं लक्ष आहेत. मराठी मतदार भाजपाकडे वर्ग होण्याची शक्यता कमी असून अमराठी मतदारांवरच त्याची राजकीय मदार असेल. शिवसेनासोबत नसल्याने भाजपाला मोठा राजकीय फटका बसणार यात शंका नाही. मात्र भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
९२-९३ च्या दंगलीत गुजराती बांधवांना शिवसेनेने मदत केली | भाजपने फक्त मतदानासाठी वापरले
मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च स्थानी असल्याने मुंबईची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यासाठी मराठी मतदारांपासून अमराठी मतदार देखील शिवसेनचं लक्ष आहेत. मराठी मतदार भाजपाकडे वर्ग होण्याची शक्यता कमी असून अमराठी मतदारांवरच त्याची राजकीय मदार असेल. शिवसेनासोबत नसल्याने भाजपाला मोठा राजकीय फटका बसणार यात शंका नाही. मात्र भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातची सत्ता किती काळ भाजपकडे | मग अहमदाबादच नाव का बदललं नाही? - आ. अमोल मिटकरी
महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षादरम्यान आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भारतीय जनता पक्षाने या मुद्यावरून शिवसेनेला विशेष लक्ष केलं आहे. मात्र आता भाजपाला देखील याच मुद्यावरून कोंडीत पकडण्यास महाविकास आघडीतील नेत्यांकडून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारतीय जनता पक्षावर प्रहार केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इनकमिंग सुरूच | सोलापुरात एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर
विधानसभा निवणुकीनंतर राज्यात पवारांच्या करिष्म्याने महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतरच्या यशानंतर इतर पक्षातील नेते मंडळी राष्ट्रवादीत भविष्यकाळ शोधू लागले आहेत असंच म्हणावं लागेल. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाने सावध राहावं | भूमिका भाजपच्या कार्यालयात ठरतात | मेटेंचं भांड फुटलं
भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी हा निर्णय घेऊ नये व ईड्ब्ल्यूएसचे आरक्षण दिल्यानंतर कोर्टामध्ये एसईबीसीचा लाभ घेण्याकरता न्यायालयीन लढाई कमजोर होईल अशी भूमिका मांडली तर विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६/०९/२०२० रोजी पत्र देऊन ईड्ब्ल्यूएस आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. सरकारने तसा निर्णय घेतल्यानंतर त्याचे स्वागतही मेटेंनी केले होते. भाजपा नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने शासनाने ईडब्ल्यूएसचा निर्णय स्थगित केला होता व या नेत्यांना एकवाक्यता करण्यास सांगितले परंतु पुढील कालावधीत अनेक विद्यार्थी ईडब्ल्यूएसचे आरक्षण लागू करावे यासाठी न्यायालयात गेले आणि अनेक प्रकरणात न्यायालाने ती मागणी मान्य केली.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये शिवसेनेकडून लवकरच लोटसचं ऑपरेशन | दोन बडे नेते शिवबंधन बांधणार
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचं मोठं विधान शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये असलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. यावर शिवसेनेकडून चांगलीच टीका करण्यात आली होती. मात्र काल झाले ते प्रवेश फक्त ‘झांकी’ आहे. भारतीय जनता पक्षाचे बडे नेते अभी ‘बाकी’ आहे, अशा शब्दात सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना इनकमिंगविषयी सूचक वक्तव्य केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांची घोषणाबाजी | शिवसैनिकांकडून दोघा मनसे कार्यकर्त्यांना चोप
मनसे आणि शिवसैनिकांमधील वैर सर्वश्रुत आहे. त्यात ठाण्यातील शिवसेना आणि मनसेतील वादामुळे ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मनसेच्या नेहमीच रडारवर असतात. दरम्यान आज वसईतील एका कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असता स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वादाचं कारण होतं वसई-विरार महापालिकेचे आयुक्त. यावेळी “आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या” अशा घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | नवी मुंबईतील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत
नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीने देखील भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. भाभारतीय जनता पक्ष जप नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास (रस्ते) विभागात भरती
ग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती २०२१. ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन शासनाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १३ कार्यकारी अभियंता / उप अभियंता पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार आपला अर्ज २८ जानेवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात स्पष्ट केली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
त्या 8 प्रवाशांचा संपर्कात आलेल्यांचा रिपोर्ट आला | आरोग्यमंत्री म्हणाले
कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC