महत्वाच्या बातम्या
-
भाजप-शिवसेनेने टोप्या लावल्या...शिक्षक भरतीत मराठा समाजाला डावलले
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी आणि निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करण्याआधी हवा निर्मितीसाठी मोठा गाजावाजा करत शिक्षक भरतीची घोषणा केली. परंतु त्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे आणि मराठा समाजासाठी म्हणजे ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी’ संतापजनक बातमी आहे. कारण राज्यातील तब्बल १७ जिल्हा परिषदांमध्ये मराठा समाजाला एकही जागा राखीव नसल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाणारवासियांच्या व विरोधकांच्या लढ्याला यश, रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द
विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आलीये, बच्चू कडू संतापले
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आली आहे आणि आपण काय बोलतो आहोत हे त्यांना कळत नाही, अशा कठोर शब्दात आमदार बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत? तेच मला कळत नाही. त्यांना या निवडणुकीत आपण उत्तर जरूर देणार…, असं कडू म्हणाले. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार
२४ फेब्रुवारी रोजी “महाहिट २४ मराठी” या नवीन वृत्तवाहिनीच्या उदघाटन समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या या वाहिनीच्या उदघाटन समारंभात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याचं सरकार काय गैरप्रकार करत आहे याची उजळणी करून दिली. आणि या बातमीचा दाखला देत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले “राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल” आणि आता तसंच काहीसं घडलं आहे म्हणून त्यांनी केलेलं भाकित गंभीरतेने घ्यायला हवं.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: तुलसी जोशींचा दणका; शिवसैनिकाचे पैसे बिल्डरने परत केले, शिवसैनिकाने मानले राज ठाकरेंचे आभार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलप्रत्येक त नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. परंतु विषय आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवसैनिक आणि त्यांच्या सामान्य कुटुंबियांशी संबंधित असल्याने विषयाला वेगळेच महत्व प्राप्त होते.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर हाय अलर्ट; दहशदवादी हल्ल्याची भीती
मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी ३ महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी अरबी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वीरपत्नींनी केली फेसबुक - व्हॉट्सअँप योध्यांची कानउघडणी
वीरपत्नींनी केली फेसबुक – व्हॉट्सअँप योध्यांची कानउघडणी
6 वर्षांपूर्वी -
माध्यमांशी संवाद साधतांना शहीद निनाद यांच्या पत्नी विजेता मांडवगणे
माध्यमांशी संवाद साधतांना शहीद निनाद यांच्या पत्नी विजेता मांडवगणे
6 वर्षांपूर्वी -
पवारांच्या गाडीच्या मागे धावणारे आज पवारांच्या ताफ्यात सामील, शिवबंधन तोडले
“स्वराज्य रक्षक संभाजी महाराज” फेम आणि जुने “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून माहित असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल. आज त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते, आणि आता शिवसेनेच्या दुटप्पी धोरणांना कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी -
जमली नाही गर्दी म्हणून सभा लवकर आटोपली... रावसाहेब दानवेंना कार्यकर्त्यांची पाठ
#ApnaBoothSabseMajboot भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये भाजपचा संवाद संघटन मेळावा होणार होता. मात्र अमित शहांच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते व बुथ प्रमुखांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित असतानादेखील मेळाव्याकडे पाठ फिरवली. खासदार, चार आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आदी असूनदेखील जाहीर केल्याप्रमाणे पाच हजार कार्यकर्तेदेखील भाजप नेत्यांना जमा करता आले नाहीत. मोकळ्या खुर्च्या पाहून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपले भाषण आटोपते घेत काढता पाय घेतला.
6 वर्षांपूर्वी -
अफझल खान सरकारला अजून ५ वर्ष देऊन बघू - उद्धव ठाकरे एवढे का नरमले?
स्वतःला शिव-शंभूंचे अवतार मानून अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे पूर्वीचे उद्धव ठाकरे आणि सध्या भाजपच्या हातात हात घालून त्यांचे गोडवे गाणारे उद्धव ठाकरे हे मराठी माणसांना रुचण्यासारखं नक्कीच नाही. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजप पुढे शड्डू ठोकून उभा असलेला सामान्य शिवसैनिक मात्र मातोश्री आदेशानंतर बुचकाळ्यात पडला आहे. सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांची शपथ देऊन आणि वचन घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा शंख वाजवला खरा परंतु असे काय नेमके घडले कि त्यांना भाजप सोबत युती करावी लागली?
6 वर्षांपूर्वी -
स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांना त्यांच्या चिमुकलीने दिलेला निरोप पाहून मन भारावलं
भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये क्रॅश झाले आणि त्यात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला धक्का, अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर?
छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून एनसीपीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांचा आज पक्षप्रवेश होणार असल्याची वृत्त आहे. असं झाल्यास हा शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का आहे असंच मानलं जातं आहे. तसेच शिवसेनेचे शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी पाकशी चर्चेची संधी सोडू नये, राज ठाकरेंचे आवाहन - सविस्तर वृत्त
राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे कि, जर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे तर त्यांनी ताबडतोब भारतीय वैमानिक अभिनंदन यांना भारतात परत पाठवावे आणि बॉर्डरवर होणारा गोळीबार थांबवावा. म्हणजेच आपण खरंच शांततेच्या मार्गाने हा विषय सोडवण्याच्या मानसिकतेत आहेत हे स्पष्ट होईल.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांच्याकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आर्थिक मदत
देशातील विविध स्तरातील लोकांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक तसेच शैक्षणिक मदत जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने देखील थोडी पण मदत जाहीर केली. परंतु मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्या नगरसेवक पदासाठी मिळणारे पुढील एक वर्षाचे मानधन पुलवामा येथील शहिद झालेल्या CRPF जवानांना समर्पित केले. हि मदत जरी थोडी असली तरी त्यांनी दाखवलेली भावना हि मोठी आहे आणि त्यांच्या या कार्याला लक्षात घेऊन इतर राजकारण्यांनी देखील शहीद जवानांना मदत केली पाहीजे.
6 वर्षांपूर्वी -
बेकायदेशीर होर्डिंग व मारहाण; भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांना हायकोर्टाने झापले
मुंबई अंधेरी पूर्वेचे भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं चांगलच धारेवर धरलं आणि कडक ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, घडलेल्या गंभीर प्रकरणाची जबाबदारी घेत जाहीर माफी मागा आणि मुंबई पालिका अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल पालिकेकडे योग्य नुकसानभरपाई देऊन सदर प्रकरण संपवा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
6 वर्षांपूर्वी -
तुलसी जोशींचा दणका, बांधकाम व्यवसायिकाने मराठी १२ तरुणांना अखेर धनादेश दिले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून एक मदतीचं प्रकरण वसई येथून समोर आलं आहे. तब्बल १२ मराठी तरुणांनी कष्टाचा पैसे वसईमध्ये स्वतःचे घर घेण्याच्या उद्देशाने एका प्रकल्पात गुंतवला होता.
6 वर्षांपूर्वी -
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून सलग सहा दिवस अधिवेशन चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विशेष महत्व आहे. मराठा, सवर्ण, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी सांगितले होते.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहा पाकच्या पाण्यात झोपले की पाकिस्तानचं पाणी बंद होणार का? राज ठाकरेंचा टोला
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
फक्त अजित डोभालची सखोल चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल: राज ठाकरे
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH