महत्वाच्या बातम्या
-
विनायक निम्हण यांची उध्दव ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ, शिवबंधन काढून काँग्रेसचा हात धरणार?
काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत घरवापसी करणाऱ्या माजी आमदार विनायक निम्हण आयोजित कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती आणि मी वाघाच्या पाठ थोपटण्यासाठी आल्याची स्तुतिसुमनं उधळली होती. परंतु काल जेव्हा तेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले असता विनायक निम्हण यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आयतोबा? भाजप-राष्ट्रवादी पक्ष प्रोमोशनसाठी घेत आहेत मनसेच्या आंदोलनाचा आधार
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी दरांवरून आणि बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यासाठी बंदी असल्याच्या मुद्याला हात घालत आक्रमक आंदोलन छेडलं होत. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना तुरंगवारी सुद्धा करावी लागली होती. याच मुद्यावरून न्यायालयाने सुद्धा राज्य सरकारला झापले असताना विषय गंभीर असल्याचे समोर आलं होत.
7 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
7 वर्षांपूर्वी -
नाणारप्रश्नी सुभाष देसाईंना प्रेझेटेंशन दिलेल, त्यामुळेच भूसंपादनाची अधिसूचना काढली होती: मुख्यमंत्री
सध्या नागपूर पावसाळी अधिवेशनात नाणार रिफायनरीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. संपूर्ण सभागृहाच या मुद्यावरून पेटलं असताना सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काल नाणार आंदोलकांशी शिवसेनेच्या आमदारांशी बाचाबाची झाली होते. त्यावरून कोकणवासीयांमध्ये शिवसेने’प्रती वाढत असलेली नाराजी समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसेच्या आंदोलनाला पहिलं यश, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी: राज्य सरकार
काही दिवसांपूर्वी मनसेने मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांवर अवाजवी दर आकारले जात असल्यामुळे आक्रमक होऊन राज्यभर आंदोलन छेडलं होत. दुसर म्हणजे सामान्य प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास सुद्धा परवानगी नव्हती. महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा पाळले जात नसल्याचे समोर येत होत.
7 वर्षांपूर्वी -
जळगावात खडसे विरोधात प्रचार करतील या भीतीने खाविआ व भाजप युती तुटली
जळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि खान्देश विकास आघाडीचे सर्वेसेवा सुरेशदादा जैन यांचे भाजप-शिवसेना युतीचे सर्व प्रयत्नं एकनाथ खडसेंच्या एका अप्रत्यक्ष धमकीने हाणून पाडले आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी युती झाल्यास विरोधात प्रचार करण्याचे संकेत देताच युतीचा निर्णय बासनात गुंडाळण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसची सत्ता आल्यास मोदींचा बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला महाराष्ट्राबरोबर गुजरातमधून सुद्धा विरोध वाढू लागला आहे. त्यात बुलेट ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले असल्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे विरोध दिवसेंदिवस अजूनच गडद होत जाणार हे काँग्रेसला उमगल्याने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू असं वचन पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप सोशल मिडिया'चा २०१४ मधील 'प्लॅन' २०१९ मध्ये अधिक ताकदीने वापरणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भाजपच्या २०१४ मधील निवडणुकीच्या यशात समाज माध्यमांचा मोठा वाटा होता. त्यामुळे समाज माध्यमांचे महत्व लक्षात घेता तो अधिक ताकदीने राबविण्यासाठी भाजपने त्यांच्या टीमला सूचना दिल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
नागपुरात आंदोलक नाणारवासियांची शिवसेना आमदारांशी बाचाबाची
नागूपर पावसाळी अधिवेशन सध्या रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे गाजत आहे. सभागृत सुद्धा धुमशान पाहावयास मिळत आहे. दरम्यान कोकणातून थेट नागपुरात दाखल झालेल्या नाणार आंदोलकांसोबत शिवसेना नेत्यांशी बाचाबाची झाल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्ताधारी शिवसेना राजदंड कसा पळवू शकते? शिवसेनेची नाटकं कोकणी जनता ओळखून: नितेश राणे
आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच नाणार रिफायनरी विषयाला अनुसरून शिवसेनेचे काही सदस्य हातात बॅनर घेऊन आणि घोषणा देत अध्यक्षांच्या आसनासमोर आले. परंतु आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या समोर गेले आणि सभापतींसमोर ठेवलेल्या राजदंडाजवळ पोहचले. परंतु आक्रमक झालेले आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या राजदंडापर्यंत पोहोचल्याचे दिसताच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजेश क्षीरसागर व राजेंद्र साळवी सुद्धा सभापतींच्या आसनाजवळ पोहोचले.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राज्यात उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर: जागतिक बँक
उद्योग संपन्न म्हणून अनेक वर्ष देशभर परिचित असणार महाराष्ट्र राज्य उदयोग सुलभतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र उदयोग सुलभतेच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सुद्धा नाही. अगदी झारखंड आणि छत्तीसगड सारखी मागासलेली समजली जाणारी राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे आहेत असं हा जागतिक बँकेचा रिपोर्ट सांगतो.
7 वर्षांपूर्वी -
महिलांना 'मोफत' गॅस जोडणी देणारी 'उज्ज्वला योजना' केवळ दिखावा?
देशातील गरीब महिलांना मोफत गॅस देऊन स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’तील वास्तव समोर आलं आहे. कारण उज्ज्वला अंतर्गत दिले जाणारे गॅस हे मोफत नसून त्यासाठी गरीब महिलांना नवी जोडणी घेताना तब्बल १७५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामधील ९९० रुपये हे शेगडीसाठी आणि ७६० रुपये हे सिलेंडरसाठी आकारले जात असल्याचं वास्तव समोर आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड - मनसे ब्लू-प्रिंट २०१४
सप्टेंबर २०१४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेपुढे सादर केलेल्या ब्लू-प्रिंट’मध्ये ‘महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड’ चा मुद्दा अधोरेखित केला होता. त्याचा अधिकृत विडिओ सुद्धा सर्वत्र वायरल होत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची राज्याच्या विकासाप्रती असलेली दूरदृष्टी अधोरेखित होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
न्यायव्येवस्थेच्या सुनावणीत राज ठाकरेंच २०१४ मधील 'ते' मत अधोरेखित होत आहे? मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड
कारण उच्च न्यायालयाने १० जुलै २०१८ मध्ये एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मत व्यक्त केलं आहे की, “मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची गरज” आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये राज्यातील जनतेसमोर मांडलेल्या ब्लू-प्रिंट’मध्ये मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर विचार मांडताना आणि मुंबईमधील लोकसंख्या आणि इथल्या वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या ‘मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड’ असावं असं २०१४ मध्ये सादर केलेल्या ब्लू-प्रिंट’मध्ये अधोरेखित केलं होत.
7 वर्षांपूर्वी -
उमेदवारीसाठी भाजपला ३० लाखाचा चेक झळकावून दाखवला, पण शिवसेनेने प्रवेश दिला
सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्याने पक्षातर्फे घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान थेट ३० लाखाचा चेक झळकावला होता. भाजपच्या या सक्रिय कार्यकर्त्याचे सचिन चौगुले असं नाव असल्याचं समोर आलं आहे. परंतु त्याच धनवान भाजप कार्यकर्त्याला शिवसेनेने प्रवेश दिल्याने सांगलीत त्या ३० लाखाच्या चेकची चर्चा रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
एमआयएम-आंबेडकरांची आघाडी कॉंग्रेसच्या मुळाशी तर भाजपला फलदायी?
प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच असदुद्दीन ओवेसीं’च्या एमआयएमशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जर भविष्यात जर ही आघाडी झाल्यास ते भाजपसाठी फलदायी असेल तर काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारी असेल असं दिसत आहे. मुस्लिम समाजाने २०१४ मध्ये एमआयएम’ला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे २०१९ ला मुस्लिम समाज सुद्धा एमआयएम पासून लांब राहू शकतो असं सुद्धा राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नागपूर झालं आता मुंबई तुंबई'च्या दिशेने ? पाणी साचतंय..... तुंबत नाही ?
मुंबईत दोन तीन दिवसापासून बरसणाऱ्या पावसाने शहरातील जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबईकरांचे सुद्धा नागपूरकरांसारखे हाल होऊ शकतात. मुंबईमधील जागोजागो तुंबणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहिल्यास या शहरातील पायाभूत सुविधांची बांधणी करताना महापालिका प्रशासन ‘इंजिनियरिंग’ दृष्टिकोनातून विचार करून पायाभूत सुविधांची बांधणी करते का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
रस्त्यांवरील खड्डे; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट सत्ताधारी व अधिकारी किती निष्पापांचे प्राण घेणार?
काल ज्या घटनास्थळी आरव’चा रस्त्यांवरील खड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, त्या ठिकाणी त्याच्या बाबांनी आरवला आवडणारा दही-भात रस्त्यावर ठेवला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेकांना ते दृश्य पासून रडू कोसळले. पालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे आणि सत्ताधार्यांमुळे अजून किती निरपराध लोक आपल्या प्रियजनांना गमावणार आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
खुशखबर! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक तुलशी तलाव पूर्ण भरलं आहे
मुंबईमध्ये दोन तीन दिवसांपासून बरसणाऱ्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांपैकी एक तलाव म्हणजे तुलशी तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. कारण गेल्यावर्षी हाच तलाव पूर्ण भरण्यासाठी ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली होती.
7 वर्षांपूर्वी -
त्याच जुन्या जोष मध्ये भुज'बळ' विधानसभेत, घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला
तब्बल २ वर्षानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत पुन्हा धडाकेबाज प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विधानसभेत पुन्हा बळ मिळणार आहे. छगन भुजबळांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात सहभाग नोंदविला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER