महत्वाच्या बातम्या
-
सेलिब्रिटीं संपर्कात, महागाईने होरपळणारा सामान्य 'संपर्क क्षेत्राच्या' बाहेर ?
सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानावर आहेत. अमित शहा आज मुंबईमध्ये प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सुद्धा त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. एकूणच देशभरातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आणि कर्नाटकातील राजकीय कलाटणीने भाजपची झोप उडाल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव प्रकरणी धरपकड सुरू
एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या सोबत इतर ३ जणांना सुद्धा अटक झाली आहे. सुधीर ढवळे यांना सकाळी ६ च्या सुमारास पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अफजल खान व उंदीर यांची उद्या गळाभेट : काँग्रेस
आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अनेक वेळा चिखलफ़ेक आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीवर कॉग्रेसने ट्विटरवरून उपहासात्मक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंच पाशा पटेल व प्रकाश आंबेडकरांना चोख प्रतिउत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धी मिळत नाही अशा तिखट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर आणि पाशा पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वतः शरद पवार निरंजन डावखरेंविरोधात आक्रमक
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार स्वतः निरंजन डावखरेंविरोधात मैदानात उतरले आहेत. निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निरंजन डावखरेंना धडा शिकवायचाच असा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल: शरद पवार
देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला १० जागांपैकी तब्बल ९ जागांवर पराभव झाल्याने २०१९ मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यास मला आवडेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
युवासेनेची नाराजी भोवली, डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवर युवासेनेतून आवाज बुलंद होण्याआधीच घडामोडींना वेग आला होता. अखेर शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यशैलीवर अनेक युवा सैनिक नाराज होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यश संपादन केल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
7 वर्षांपूर्वी -
मराठी नाट्यसंमेलन, उद्घाटन राज ठाकरे करतील आणि समारोप उद्धव ठाकरे
१३ जूनला ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. कालच नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर या निवासस्थानी भेट घेऊन तसं निमंत्रण सुद्धा दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ ची धास्ती, अमित शहा-उद्धव ठाकरे भेट, युतीची चर्चा ?
भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युतीसाठी पुन्हा बोलणी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाना आगामी निवडणुकीचे नकारात्मक संकेत मिळताच जवळीक साधली जाऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांच्या शेतमालाला भाजप सरकारकडूनच कवडीमोल भाव - नांदेड भाजपचे माजी खासदार सुभाष वानखेडे
भाजप नेत्यांच्या शेतमालाला भाजप सरकारकडूनच कवडीमोल भाव – नांदेड भाजपचे माजी खासदार सुभाष वानखेडे
7 वर्षांपूर्वी
५ एकर वांग्यावर ट्रॅक्टर फिरवला -
शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य: फडणवीस
आम्ही यापुढे शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू परंतु त्याआधी शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य आहे हे पालघर लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिक्षणमंत्री विनोद तावडे कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या भेटीला
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा संपूर्ण तपशील अधिकृतपणे समजू शकलेला नसला तरी ठाण्यामध्ये होणाऱ्या नाट्यसंमेलनाच आमंत्रण तसेच इतर राजकीय चर्चा झाल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, या सरकारची नियत दिसत नाही
राज्यातलं सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अजिबात पाळत नाही. एकूणच ह्यांची कार्यपद्धतीची पाहता सरकारची नियत दिसत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी असं रोखठोक आवाहन माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
साहेब! नाहीतर पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल
शिवसेना पक्ष प्रमुखांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षात जनतेतून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पाठींब्यावर निवडून येणारे राज्यसभा व विधानपरिषदेवरील नेते असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. राज्यसभेवरील खासदार भाजपाविरोधात आक्रमक होत आहेत तर जनतेतून निवडणून येणारे खासदार पक्ष नैतृत्वाला युतीचा पुनर्विचार करण्यास सांगत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आरएसएस व भाजप मोदींना पर्याय शोधण्याच्या तयारीत ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि भाजपकडून नरेंद्र मोदींना पर्याय शोधण्याचं काम सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला असून मोदींना पर्याय म्हणून भाजपमध्ये सध्या नितीन गडकरी, राजनाथ सिंग आणि सुषमा स्वराज यांची नावं आघाडीवर असल्याचे केतकर म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
हनीमुनच्या प्रवासातच तिने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
साताऱ्यात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. कारण दीक्षा कांबळे हिने तिचा पती आनंद कांबळे याला हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाताना प्रवासादरम्यान संपविण्याची योजना प्रियकरासोबत रचली आणि पती आनंद कांबळे यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजकारणातील सर्वात मोठं बंड महाराष्ट्रात होईल: शरद यादव
संपूर्ण देशभरात भाजपविरोधात सर्वच पक्षांमध्ये रोष वाढतच आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष शिवसेना भाजपवर प्रचंड नाराज आहे त्यामुळे आगामी काळात राजकारणातील सर्वात मोठं बंड हे महाराष्ट्रात होईल असं सूचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
दर्या मे खसखस! सरकारी उपाय व त्यावर राज ठाकरेंच व्यंगचित्र
सध्या देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतच चालल्याने सामान्य जनता चांगलीच हैराण झाली आहे. सामान्य जनतेचा रोष पाहता १-२ दिवसांपासून त्या किमतीत अतिक्षुष्म प्रमाणात घट करण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
...नाहीतर सेनेला लोकसभेत मोठा फटका बसेल ?
आगामी निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत आघाडी न झाल्यास शिवसेनेच्या निम्यापेक्षा अधिक जागा कमी होऊन त्यांना जेमतेम ९ जागा मिळतील अशी भीती शिवसेनेतीलच एक वरिष्ठ गटाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्ष नैतृत्वाने युतीचा फेरविचार करावा अशी भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राजवटीतली महागाई थांबता थांबेना, सामान्य हैराण
सर्वच शहरांमध्ये रोजच्या जीवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून त्यात भाजीपाल्यासारख्या वस्तू महागण्याची शक्यता. आधीच कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपानंतर आता संपूर्ण देशातील शेतकरी संपावर गेल्याने दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB