महत्वाच्या बातम्या
-
ठाकरे सरकारचा महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय | कामाचे तास कमी करून फक्त 8 तासांची ड्युटी
महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे म्हणाले की, राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 12 वरून 8 करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पुणे ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिस कॉन्स्टेबलसाठी आठ तासांच्या शिफ्ट सुरू केल्या. जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर, आठ तासांची शिफ्ट पुरुष पोलीस कॉन्स्टेबलसाठीही केली जाईल,” असे पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Schools Reopen | शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता | या तारखेपासून शाळा सुरु
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विनाकारण मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू | आम्ही मुश्रीफ यांच्या पाठीशी - मंत्री सतेज पाटील
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी किरीट सोमैयांना इशारा दिला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा दिल्यानंतर सोमैयांनी कोल्हापुरात येण्याची गरज काय? विनाकारण मुश्रीफ यांना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
हिंदू धर्म संकटात आहे हा भाजपाचा जुमला असल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट | भाजपवर 302 खाली गुन्हा नोंदवा
हिंदू धर्माला कोणताही धोका नसून हिंदू धर्माला धोका असल्याच्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत’ असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. नागपूरमधील कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाऱ्याला प्रतिसाद देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील हिंदू धर्माला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी जबलपुरे यांनी आरटीआयद्वारे देशातील हिंदू धर्माला धोका असल्याचा पुरावा गृहमंत्रालयाकडे मागितला होता.
4 वर्षांपूर्वी -
लहान मुलांसाठी लस उपलब्ध नाहीत | लस आल्या की मुलांचे लसीकरण करायचे, त्यानंतर शाळांचा विचार - उपमुख्यमंत्री
देशभरातील अनेक राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत. पण अद्याप महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप असल्याने अद्याप सर्व शाळा सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने आता सरकार सर्व शाळा सुरु करण्याच्या दिशेने विचार करत असल्याचे दिसून येते.
4 वर्षांपूर्वी -
Health Alert | महाराष्ट्रात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं | डेंगी, काविळीने लोक हैराण
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असतानाच राज्यात डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या नऊ महिन्यात डेंगीचे ५,९४४ रुग्ण आढळले असून तब्बल ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी महानगरपालिका निवडणुका | प्रभाग रचनेचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा?
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुसाठी प्रभागरचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबई वगळता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर आधारित घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय समिकरणे बदलणार आहेत. हा निर्णय महाविकास आघाडीला फायदाचा ठरावा म्हणून घेतला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
डोंबिवली बलात्कार | अनेक आरोपी सत्ताधारी व विरोधक राजकीय पुढाऱ्यांची मुले | भाजप नगरसेविकेचा तर पोलिसांवर फोन करून दबाव
१५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफीत बनवून या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर २९ जणांनी मागील ९ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून २ अल्पवयीन आरोपींसह २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, उर्वरित ६ आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवड | भाजप लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी, भाजपची कीव येते | भाजप नगरसेविकेचा आरोप
भारतीय जनता पक्ष हा लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहत आहे. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय संबोधलं जातं, अशा शब्दात पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका आशा शेगडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या बोर्डावर आणि अभियंत्याच्या खुर्चीवर शाफी फेकल्याप्रकरणी शेडगे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज भाजपवर तोंडसुख घेतलं.
4 वर्षांपूर्वी -
मेहबूब शेख यांना धक्का | बलात्कार प्रकरणातील अहवाल फेटाळत न्यायालयाचे पुन्हा तपास करण्याचे आदेश
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी अहवाल’ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. “या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला धक्का | आ. लक्ष्मण जगतापांचे कट्टर समर्थक अरुण पवार, विष्णू शेळकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘गळती’ सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. आज भाजप पदाधिकारी आणि मराठवाडा जनसंघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजप सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशी भाजप युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सौदेबाजी करत नाही | काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे - फडणवीस
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महा मेट्रो पुणे मध्ये 96 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
MMRCL पुणे भरती 2021. MMRCL पुणे भरती 2021. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे ने भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 96 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 14 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी महा मेट्रो पुणे भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | मोदी सरकार इम्पेरिकल डेटावरून अडचणीत येताच सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही?
ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यापाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारनं पाठवलेल्या अध्यादेशात त्रुटी दाखवली होती. त्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील आमदार, खासदारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय परंपरा... म्हणून
काँग्रेस खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घातली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Nashik Municipal Elections 2022 | नाशिकसाठी मनसेचे दोन जिल्हाध्यक्ष तर शहर अध्यक्षपदी दिलीप दातीर
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. हॉटेल एसएके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) ही यादी जाहीर करण्यात आली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांसह 122 नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | केंद्राचा इम्पेरिकल डेटा देण्यास नकार | मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी - हरी नरके
राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहेत. दरम्यान आज महाराष्ट्रातील सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. राज्याला ओबीसी इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्राने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. यामुळे सुनावणी आता चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | इम्पेरिकल डेटाबाबत केंद्राची भूमिका स्पष्ट | आघाडीला सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेला सुनावणी बाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत, राज्याला इम्पेरिकल डेटा देता येणार नाही असे सांगितले आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधत ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका समोर आली असल्याची टीका केंद्रसरकारवर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खोटं रडून दाखवता, आता ताईंगिरी कुठे गेली? | फोन बंद का? | किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना झापलं
भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सडेतोड प्रश्न विचारले होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची पोलखोल? | OBC आरक्षणासंदर्भात इम्पीरिकल डेटा देण्यास केंद्राचा नकार | सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण हे तापलेले आहे. असे असताना या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतं आहे. राज्य सरकारने केंद्राकडून इम्पॅरिकल डेटा मागितलेला आहे. आता या मागणीवर केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमके काय उत्तर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC