Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्ज व्याजदरात मोठी कपात, प्रोसेसिंग फी सुद्धा माफ, 5 महत्त्वाच्या गोष्टी नोट करा
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जाचा व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 8.35 टक्के केला आहे. यापूर्वी हा दर 8.5 टक्के होता. बँकेने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फीही माफ केली आहे. याशिवाय बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियादेखील जवळपास समान व्याजदर देत आहेत.
अशापरिस्थितीत जर तुम्ही गृहकर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येथे आम्ही विविध बँकांचे व्याजदर आणि होम लोन घेण्यापूर्वी प्रत्येकाने काळजी घ्यावी अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत. याशिवाय फिक्स्ड आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट काय असतो, कर्जाचा व्याजदर कोणत्या घटकांवर अवलंबून असतो, याचीही माहिती आम्ही येथे देत आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जाची ठळक वैशिष्ट्ये
* बँक ऑफ महाराष्ट्र 8.35% ते 11.15% व्याज दर देत आहे.
* गृहकर्जाचा कमाल कालावधी 30 वर्षापर्यंत आणि वयाच्या 75 वर्षापर्यंत.
* बँक कोणतेही प्री-पेमेंट / डेबिट कार्ड प्री क्लोजर पार्ट पेमेंटसाठी शुल्क आकारले जात नाही.
* कार आणि एज्युकेशन लोनमध्ये गृहकर्ज घेणाऱ्याला आरओआयमध्ये सवलत.
* बँक कोणतेही प्रोसेसिंग फी आकारत नाही. तसेच कोणताही छुपा चार्जही नाही.
कर्ज घेण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या
कर्जाचा कालावधी लक्षात ठेवा
शक्यतो अल्पमुदतीच्या गृहकर्जाचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला जातो. कारण कर्जाचा कालावधी जितका कमी असेल तितके कमी व्याज द्यावे लागेल.
प्रीपेमेंट दंडाची माहिती
अनेक बँका कर्जाच्या प्रीपेमेंटवर दंड आकारतात. अशा तऱ्हेने बँकांकडून याबाबत संपूर्ण माहिती मिळवा. त्याच्या सर्व अटी व शर्ती नीट वाचा.
टर्म इन्शुरन्स घ्या
गृहकर्ज घेताच टर्म इन्शुरन्स कव्हरही घ्यावे. अपघाती मृत्यू झाल्यास गृहकर्जाची परतफेड करण्याचे टेन्शन वाढते. टर्म इन्शुरन्समुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते.
संबंधित बँकेकडून कर्ज घ्या
ज्या बँकेत तुमचे खाते आहे, मुदत ठेव आहे, त्याच बँकेतून कर्ज घ्या. कारण बँका आपल्या नियमित ग्राहकांना सहज आणि वाजवी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतात.
ऑफर्सबद्दल जाणून घ्या
बँका वेळोवेळी कर्जदारांना चांगल्या ऑफर्स देतात. अशावेळी कर्ज घेण्यापूर्वी बँकेच्या सर्व ऑफर्सबद्दल जाणून घ्या. प्रोसेसिंग फीबद्दल देखील जाणून घ्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Bank of Maharashtra Home Loan Interest Rates 07 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट