5 May 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Credit Card | क्रेडिट कार्डचे हे फायदे आणि तोटे जाणून घ्या, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून स्वतःचं आर्थिक नुकसान टाळा

Credit card

Credit Card | जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी केला तर तुम्हाला जबरदस्त फायदे होऊ शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी गरज नसताना क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमचे नुकसानही जबरदस्त होऊ शकते. अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देतात. क्रेडिट कार्डे वेगवेगळ्या प्रकारची असतात, आणि त्यांची सर्व वैशिष्ट्ये देखील वेगवेगळी असतात. प्रत्येक ग्राहक त्यांच्या गरजेनुसार या क्रेडिट कार्डांचा वापर करत असतो मात्र त्यांना सर्वच फायदे आणि तोटे माहित नसतात.

रिवॉर्ड पॉइंट्स आणि व्याज मुक्त कालावधी :
तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करून एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्सही दिले जातात. तुम्ही रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून पेमेंट करू शकता. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट करता तेव्हा तुम्हाला 45 दिवस ते 50 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी दिला जातो. यासाठी एक बिलिंग तारीख दिली जाते आणि आणि दुसरी पेमेंट देय तारीख दिली जाते.

विमानतळ लाउंज सुविधा आणि अपघाती विमा :
क्रेडिट कार्ड धारकाना विमानतळ लाउंज सुविधा देखील उपलब्ध असते. यासोबतच काही रेस्टॉरंट्स असतात जिथे क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला जेवणावर सवलतही मिळते. असे अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या आहे जे आपल्या ग्राहकांना अपघाती विम्याची सुविधाही उपलब्ध करून देतात.

उत्तम सिबील स्कोअर :
सवलत आणि कॅशबॅक यासोबतच तुम्ही क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरत असाल तर तुमचा सीबिल स्कोअर चांगला राहील. यासोबतच क्रेडिट कार्डवर तुम्हाला सेल ऑफरमध्ये डिस्काउंट आणि कॅशबॅकचाही फायदा मिळतो.

खर्चाचा मागोवा घेणे :
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापर करून पैसे पेमेंट करता तेव्हा मासिक बिलमध्ये तुमचे सर्व खर्चाचे तपशील दिले जाते. हे खर्चाचे तपशील तुम्हाला अनावश्यक खर्च कमी करण्यास मदत करतील. क्रेडिट कार्ड घेणे फार सोपे आहे.

सर्वत्र पेमेंट सुविधा आणि क्रेडिट खरेदी :
जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने अनेक ठिकाणी क्रेडिटवर खरेदी करू शकता. ठराविक काळात तुम्ही पैसे परतफेड करू शकता. जर तुमच्या व्यवहाराचे मूल्य जास्त असेल तर तुम्हाला ते EMI मध्ये रूपांतरित करण्याचीही सुविधा दिली जाते. या व्यतिरिक्त, EMI हा पेमेंटचा सर्वात जास्त स्वीकारलेला प्रकार आहे. तुम्ही POS च्या मदतीनेही अगदी सहज स्वाइप करून पेमेंट करून शकता. पेटीएम वॉलेटच्या मदतीने तुम्ही अॅड-ऑन सर्व्हिसही ॲक्टिव करू शकता. या सुविधासाठी तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, जे तुमच्या एकूण बिलाच्या 2.6 टक्के असू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Credit card Use and benefits for avoiding loss on 19 October 2022.

हॅशटॅग्स

#Credit Card(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x