2 May 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Paytm Share Buyback | पेटीएमचे शेअर तेजीत आले, कंपनीच्या बायबॅक ऑफरवर तज्ञांकडून प्रश्न उपस्थित, काय होणार शेअरचं?

Paytm Share Buyback

Paytm Share Buyback | Paytm कंपनीचा IPO शेअर बाजारात सूचीबद्ध झाला, आणि शेअर्स गडगडायला सुरुवात झाली. Paytm कंपनीचे शेअर्स नुकताच 450 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पण मागील काही दिवसांपासून Paytm कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. वास्तविक पेटीएम कंपनीने नुकताच बायबॅकची घोषणा केली होती. बाय बॅक मुळे Paytm कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी NSE निर्देशांकावर Paytm कंपनीच्या शेअरमध्ये 36 रुपयाची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र Paytm कंपनीचे शेअर्स एकीकडे पडत असताना कंपनी शेअर्स बाय बॅक करत आहे, या निर्णयावर स्टॉक मार्केट तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

Paytm शेअरची वाटचाल :
9 डिसेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 36.55 रुपये म्हणजेच 7.19 टक्क्यांच्या वाढीसह 544.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पेटीएम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 1644.70 रुपये आहे. त्याच वेळी Paytm शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 438.35 रुपये होती.

Paytm ची बायबॅक ऑफर :
Paytm कंपनीने शेअर बायबॅकची ऑफर जाहीर केली आहे. Paytm ची मूळ कंपनी One 97 Communications ने 13 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केली आहे. कंपनी संचालक मंडळाच्या या बैठकीत शेअर्स बायबॅकच्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे. कंपनीला अपेक्षा आहे की, ही बायबॅक ऑफर शेअर धारकांसाठी खूप फायदेशीर ठरेल.

Paytm कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे की, मागील फंडींग राऊंड मधून कंपनीने जी रक्कम उभारली आहे, ते पैसे कंपनी बायबॅकसाठी खर्च करणार आहे. सध्या पेटीएम कंपनीकडे 9 हजार कोटी रुपयांहून जास्त Cash In Hand आहे. पेटीएम कंपनीने दिलेल्या माहितीत कंपनीकडे सप्टेंबर 2022 पर्यंत बायबॅकसाठी 9182 कोटी रुपये रोख राखीव फंड आहे.

उपस्थित करण्यात आलेले प्रश्न :
शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि फंड मॅनेजरनी Paytm कंपनीच्या शेअर बायबॅकवर योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोठ्या कंपन्या जसे की, इन्फोसिस, टीसीएस आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांनी आपल्या कमावलेल्या नफ्यातून जी रक्कम जमा केली आहे, ते पैसे बायबॅक साठी खर्च केले होते. मात्र पेटीएम कंपनीच्या बायबॅकच्या बाबतीत असे नाही. एकीकडे कंपनीचे शेअर जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत असून, दुसरीकडे कंपनीने बायबॅक जाहीर केले आहे. Paytm कंपनी मागील बरच्या काळापासून तोटा सहन करत आहे, म्हणून गुंतवणूकदारांकडून उभारलेल्या निधीतून कंपनीने शेअर्स बायबॅक करण्याचे जाहीर केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm Share Buyback has announced by company on 12 December 2022.

हॅशटॅग्स

Paytm Share Buyback(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x