28 April 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Paytm Share Price | कमाई होईल! पेटीएम शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेणार?

Paytm Share Price

Paytm Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर पेटीएम स्टॉक 898.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच पेटीएम कंपनीने आपले ऑगस्ट महिन्याचे बिझनेस अपडेट जाहीर केले आहेत.

One97 Communications Ltd ही पेटीएम कंपनीची मूळ कंपनी आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात कंपनीने व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या वापरकर्त्यांची संख्या 79 दशलक्ष होती. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के घसरणीसह 892.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पेटीएम कंपनीचे शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 100 टक्के मजबूत झाले आहेत. मागील सहा महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरने सेन्सेक्स इंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मागील सहा महिन्यांत, सेन्सेक्स इंडेक्समध्ये 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे तर पेटीएम कंपनीचे शेअर्स 44 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

25 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 939 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 439.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

सध्या पेटीएम कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपासून 100 टक्के मजबूत झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील कलात आणखी वाढू शकतात. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी पेटीएम स्टॉकवर 1000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीवरून हा स्टॉक 13 टक्के वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते एकूण व्यापारी मूल्य आणि वितरणामध्ये मजबूत वाढीची अपेक्षा यामुळे पेटीएम कंपनीच्या व्यवसायात अधिक वाढ होऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price today on 07 September 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x