12 December 2024 3:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Remedium Lifecare Share Price | गुंतवणूकदारांना 2800% परतावा देणाऱ्या रेमेडियम लाइफकेयर शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार

Remedium Lifecare Share Price

Remedium Lifecare Share Price | रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. मागील सात महिन्यांत रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2800 टक्के परतावा कमावून दिला आहे.

23 सप्टेंबर 2022 रोजी रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 136.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3949 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 4,000.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बोनस शेअर्स तपशील

रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. 23 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बोनस शेअर्स वाटपासाठी कंपनीने 29 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. सोमवारी रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4,118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कंपनीचे स्पष्टीकरण

रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, SEBI च्या नियमावली 42 मधील लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता नियम 2015 नुसार रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनी सेबीला सूचित करते की कंपनीने शनिवार दिनांक 29 जुलै 2023 हा दिवस बोनस शेअर वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना 5 शेअर्सवर 9 शेअर्स मोफत देणार आहे. अवघ्या सात महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2800 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Remedium Lifecare Share Price today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

Remedium Lifecare Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x