12 December 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

SJVN Share Price | 2 वर्षात दिला 400% परतावा, PSU स्टॉक 'BUY' रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्सची किंमत 430 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात एसजेव्हीएन स्टॉक 5.58 टक्के घसरला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 28.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,156 कोटी रुपये आहे. शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.52 टक्के वाढीसह 134 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचे एकूण उत्पन्न 29 टक्के वाढून 958.47 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 744.39 कोटी रुपये नोंदवले गेले होते. एसजेव्हीएन शेअर्सचा बीटा 1.8 आहे, जो एका वर्षात उच्च अस्थिरता दर्शवतो. एसजेव्हीएन स्टॉकने 21 ऑगस्ट 2023 रोजी 55 रुपये ही 52 आठवड्यांची नीचांक किंमत आणि 5 फेब्रुवारी 2024 रोजी 170.45 रुपये उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 50.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

एसजेव्हीएन स्टॉक आपल्या 5 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या SMA पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 147 टक्के परतावा कमावून दिला आहे. जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 31 टक्के वाढीसह 271.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2024 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा खर्च 362.60 कोटी रुपयेवरून 476.39 कोटी रुपयेवर पोहचला होता. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉक 170 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

StoxBox फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकला 160-153 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकने 140 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 148 रुपये किमतीवर रेझिस्टन्स मिळत आहे. या शेअरची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 138 रुपये ते 155 रुपये दरम्यान असेल.

सॅन्क्टम वेल्थ फर्मच्या तज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूकदार 155 रुपये या टार्गेट प्राइससाठी लॉन्ग टर्म पोझिशन्स घेऊ शकतात. एसजेव्हीएन लिमिटेड ही वीज निर्मिती आणि वीज निर्मितीसाठी दर ठरवणारी सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवसाय पोर्टफोलिओमध्ये थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, पॉवर ट्रान्समिशन, सल्लागार आणि पॉवर ट्रेडिंग या कामांचा समावेश होतो.

News Title | SJVN Share Price NSE: SJVN 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SJVN Share price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x