12 December 2024 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Suzlon Share Price | आता नाही थांबणार! सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 13 ऑगस्ट रोजी सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy Share Price) स्टॉक 84.40 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सोमवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.15 टक्के वाढून 82.45 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.11 लाख कोटी रुपये होते. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.93 टक्के घसरणीसह 79.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉकचा (NSE: Suzlon) सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 72.8 वर होता. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे.

सोमवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 39.18 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. याचे एकूण मुल्य 31.78 कोटी रुपये होते. सुझलॉन एनर्जी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 322 टक्के वाढले आहेत. 18 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 19.50 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 313 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 1376 टक्के मजबूत झाला आहे. सुझलॉन एनर्जी शेअर्सचा बीटा 0.8 आहे, जो एका वर्षात कमी अस्थिरता दर्शवतो. सँक्टम वेल्थचे डेरिव्हेटिव्ह फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 94-102 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्या या स्टॉकला 80-82 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे.

तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 64 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म जिओजितच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक आपल्या स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचा महसूल 53 टक्के वाढू शकतो. परिणामी शेअरच्या ROE मध्ये देखील सुधारणा होईल. सुझलॉन एनर्जी ही एक अक्षय ऊर्जा प्रदाता कंपनी आहे. ही कंपनी पवन ऊर्जा टर्बाइनची उत्पादक आहे.

News Title | Suzlon Share Price NSE: Suzlon 20 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x