5 June 2023 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | झटपट पैसा! एक आठवड्यात 73 टक्के पर्यंत बंपर परतावा देतं आहेत हे शेअर्स, लिस्ट सेव्ह करा Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या
x

Mumbai Municipal Corporation Election 2022 | भाजपचे 15-20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार - यशवंत जाधव

Mumbai Municipal Corporation Election 2022

मुंबई, १८ ऑक्टोबर | मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांचे नेते फोडण्याला सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका शिवसेना आणि भाजप मोठ्या ताकदीने आणि द्वेषाने लढतील अशी शक्यता (Mumbai Municipal Corporation Election 2022) वर्तविण्यात येतं आहे.

Mumbai Municipal Corporation Election 2022. About 15 to 20 BJP corporators will join Shiv Sena. Yashwant Jadhav has claimed that the corporator, who is fed up with the arbitrariness of the party leadership, will join the Shiv Sena soon :

परिणामी दोन्ही पक्ष एकमेकांचे विद्यमान आणि माजी नगरसेवक पळवापळवी सुरु करतील असं म्हटलं जातं होतं. त्याला शिवसेनेपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना भाजपाला मोठा राजकीय धक्का देण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे तब्बल 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

मुंबई महापालिकेत असलेले भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलणं, यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा आधार वाटतोय’, असा दावा यशवंत जाधव यांनी केलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Mumbai Municipal Corporation Election 2022 BJP 15 to 20 corporators will join Shivsena party said Yashwant Jadhav.

हॅशटॅग्स

#BMCElection2022(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x