महत्वाच्या बातम्या
-
३ तारखेनंतर काही भागात मोकळीक पण....? सविस्तर वाचा
कोरोनामुळे गेल्या महिना-दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह इतर रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नाही. तुम्हीही मोकळीक दिल्यानंतर काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे ५ वर्ष नेतृत्त्व करणार, मग कशाला राजकीय खेळ करायचे - संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात करोनामुळे चिंतेचं वातावरण असताना त्यात अशी अस्थिरता निर्माण होता कामा नये. उद्धव ठाकरेंना निवडून येण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण करोनाच्या संकटामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. याचं कोणीही राजकारण करु नये”.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रश्न हायकोर्टात; तर केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसतं नाहीयत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची यावरी भूमिका अद्याप स्पष्ट होत नाहीय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी याविषयावर संवाद साधला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वबाजुने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भातील पत्र पाठविले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिक्षण संदर्भातील मागण्यांसाठी मुख्यमंत्री व मंत्र्यांना टाळून शेलार राज्यपालांकडे
मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला होता. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली होती
5 वर्षांपूर्वी -
गृहमंत्री फडणवीसांच्या काळातील क्लिप; म्हणाले 'असंच चालायचं महाआघाडी सरकारमध्ये'
भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी आणि विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातही धार्मिक वाद कसा वाढेल याची विशेष काळजी घेतली जाते असाच एकूण अनुभव येतो. अगदी त्यासाठी कोणतीही शहानिशा न करताच समाज माध्यमांवर झोड उठवली जाते.
5 वर्षांपूर्वी -
ते जॅकेट कायमचं उतरलं की हा ‘Lockdown Look’ आहे? - फडणवीसांची खिल्ली
मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
माध्यमांची मुस्कटदाबी, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती; भाजपचा आरोप
राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, असं निवेदन भाजप नेत्यांनी राज्यपालांना दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विनोद तावडे, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांनी घरी थांबावे, आयुक्तांचे आदेश
कोरोना माहामारीवर मात करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असताना पोलीस खातं मात्र दिवस-रात्र काम करत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पोलीस कर्मचा-यांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरंतर आतापर्यंत ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हा निर्णय मुंबई पोलिसांकडून घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांसाठी राखीव नाही; पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांमध्ये सरकार विरोधात खदखद...सविस्तर रिपोर्ट
कालच कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली. तत्पूर्वी जे घडलं त्याबद्दल धक्कादायक माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी अनास्था! मृत्यू पूर्वी त्या पोलिसाला ४-५ सरकारी रूग्णालयात फिरवण्यात आलं
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी सोनावणे यांचं निधन
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीपुढे भाजपनीती फिकी? उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेवरील मार्ग मोकळा होणार?
राज्यावर कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. या संकटाशी तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे. राज्यपालांनी जर याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाहीतर महाविकास आघाडी सरकार नवीन पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विरोधी लढ्यात अजून एका पोलिसाचं बलिदान
राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शनिवारी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. शनिवारी ८११ नागरिक बाधित आढळल्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिस दलातील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू
देशातील सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेलं नाही. राज्यात गेल्या गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०० च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ती सूचना होती, या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही - अमेय खोपकर
राज ठाकरेंनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना केली, हे या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच मनसेच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा असंही अमेय खोपकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
वाईनशॉप खुले करण्यामागे नक्की महसुलाचाच विचार? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाचा
टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउननंतर परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी मुंबई पुण्यातून गाड्या सोडा - अजित पवार
येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे सुरू झाल्यावर राज्यातील विविध भागात थांबलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने या मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
घाबरू नका! मे महिन्यात मुंबईत कोरोनाचे काही लाख रुग्ण वाढणार हे वृत्त खोटं - बीएमसी
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ९० हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मृतांच्या दरातही घट झाली आहे. सध्याची परिस्थिती ही आशादायी असून राज्य सरकार कोरोना विषाणूच्या संकटातून सावरण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकूण ३८ लॅब उपलब्ध असून प्रत्येक दिवसाला ७ हजारहून अधिक चाचण्या घेणे शक्य होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावणाऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण; रिपोर्ट पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या मंत्र्याने सोमवारीच मंत्रालयामध्ये एका बैठकीला हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे. या मंत्र्याची तब्येत मंगळवारी काहीशी बिघडली होती. यामुळे त्यांच्यावर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या मंत्र्याने सोमवारी मंत्रालयात बैठकीला हजेरी लावल्याने त्यांना भेटलेल्या अधिकारी, कार्यकर्त्यांनाही क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्र्यांची माहिती
“वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ आज दुपारी दोन वाजता संपत आहे. त्यामुळे आपल्या पोलीस खात्यातर्फे सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवलं आहे. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL