महत्वाच्या बातम्या
-
SaveAarey: पोलखोल; वृक्षतोडीच्या समर्थनार्थ आलेले ते 'मॅनेज' RSS व भाजप कार्यकर्ते: सविस्तर
मेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
SaveAarey: आदित्य ठाकरे नाही; ते तर 'पप्पू ठाकरे' आहेत: आपच्या नेत्या प्रीती शर्मा
आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेड डेपोवरून सध्या मुंबई शहरातील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत, राज्यात, दिल्लीत सत्ता असताना केवळ दाखवण्यापुरता विरोध केला जातं असल्याचा आरोप यापूर्वी देखील विरोधकांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ : भुयारीकरणाच्या कामादरम्यान बोगद्याचा काही भाग कोसळला; एका कामगाराचा मृत्यू
कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत हे काम करण्यात येत असून सात टप्प्यात हे काम सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी भुयारीकरणाच्या कामादरम्यान अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. टनल बोअरिंगच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली
विधानसभा निवडणूक २ दिवसांवर येऊन पोहोचली आहे आणि शिवसेना – भाजपने पक्षीय यात्रेतून संपूर्ण राज्य पिंजून काढलं आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नेमकं काय चाललं आहे तेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजेनासं झालं आहे. आज विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेची स्थायी समिती सुसाट! मुंबई महापालिकेत २ दिवसांत १६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चार-पाच दिवसांत लागू होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कामे मंजुरीचा सपाटाच लावला आहे. पाचशे कोटी रुपयांच्या दीडशे कामांना सोमवारी मंजुरी देणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी आणखी चारशे कोटींच्या ५० हून अधिक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला. यामध्ये रस्ते, जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य काही प्रस्तावांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
अश्विनी भिडेंनी आरेतील जंगलाचा तर्क इतर गृहप्रकल्पांशी जोडला; मनसे विरुद्ध ट्विट वॉर
आरेमधील मेट्रो ३च्या कारशेडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यापासूनच जाहीर विरोध केला आहे. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील २ वर्षांपूर्वी आरेच्या दौऱ्यावर जाऊन तेथील दुर्मिळ प्राणी तसेच जीव जंतूंचं महत्व पत्रकार परिषेदत दाखवलं होतं. इतकंच नाही तर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे थेट आरे पर्यंत पसरल्याने बिबटे आणि इतर दुर्मिळ प्राणी थेट आरे’मध्ये देखील ये जा करत असतात याचे दाखले दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
#SaveAarey: मुंबईकर व पर्यावरणवाद्यांच्या संतापामुळे आदित्य यांचा दिखावा: सविस्तर
आमचा मेट्रो रेल्वेला विरोध नाही, पण आरेमध्ये कारशेड बांधण्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याचा व मुंबईला पुराचा धोका असल्याने पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रो-३ अशक्य असल्याची धमकी धमकी देत आहेत, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीकास्त्र सोडले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना जमत नसेल तर सरकारने दुसरा सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणीही आदित्य यांनी अश्विनी भिडे यांचा नामोल्लेख न करता केली.
6 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचार प्रकरण: उद्या कृपाशंकर सिंह यांना गुजरातच्या वॉशिंग पावडरने धुवून भाजपमध्ये घेणार
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकी अगोदर काँग्रेस व राष्ट्रावादीतील दिग्गज नेत्यांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे सत्र जोरदार सुरू आहे. आज दुपारीच काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या व उत्तर मुंबई मतदारसंघातून पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असताना आता, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली
काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असं आजच अभिनेत्री आणि खासदारकीला उभ्या राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी जाहीर केलं. या राजीनाम्यावरुन आता मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात जुंपली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत असं म्हटलं आहे. काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष म्हणून मी उर्मिला मातोंडकर यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
6 वर्षांपूर्वी -
आरे वाचवा! त्या चिमुकलीला भविष्यकाळ उमगला, मोठ्यांना फक्त निवडणुका आणि सत्ता? सविस्तर
मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वनस्पती तज्ज्ञांनीही अनुकूलता दाखविली. मात्र, यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून, कारशेड उभारणाऱ्या कंपनीने तीन तज्ज्ञांना एकूण दीड कोटी रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी केला. नियमबाह्य पद्धतीने पालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर केल्याने, या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रो कारशेडचे प्रकरण पुन्हा पेटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजीनामा मंजूर; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा सेनेकडून निवडणूक लढवण्याची शक्यता
राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. प्रदीप शर्मा हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. प्रदीप शर्मा यांनी जुलै महिन्यातच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते निवडणूक लढवू शकतात अशीही चर्चा रंगली होती. आता एएनआयनेही ही शक्यता वर्तवली आहे. प्रदीप शर्मा येत्या विधानसभा निडवणुकीत निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं एएनआयने म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे खासदार मजीद मेमन देखील भाजपात प्रवेश करणार
मागील काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला माजिद मेमन उपस्थित राहिल्याने ते देखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी डावलून हिंदीला स्थान; मोदींचे छोटे भाऊ सुद्धा शांत
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. वांद्रे-कुर्ला संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर येथील कार्यक्रमात मोदी यांनी गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्ग १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ या तीन नवीन मार्गाचे भूमिपूजन केले. या तीन नवीन मार्गामुळे मेट्रोच्या जाळ्यात ४२ किमीची वाढ होईल.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.
6 वर्षांपूर्वी -
आम्हाला सत्तेची हाव नाही, केवळ राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी: उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणूक: मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन
महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी तीन नवीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन तसेच पहिल्या कोचचे आणि बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटनदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोहिनूर मिल प्रकरण: ईडीकडून मनसे नेते नितीन सरदेसाईंची चौकशी
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी करण्यात आली आहे. आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांना देखील ईडीकडून बोलावण्यात आलं आहे. सरदेसाई यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ९ तास राज ठाकरे यांची बंद दाराआड ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
६ तासात मुंबईत १०० मिमी पावसाची नोंद! १३०० नागरिकांना हलवले
मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन कोलमडले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या सहा तासात शहरात सरासरी १००.९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये १३१.४९ मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये १४५.६५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील मिठी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेले असून एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पावसाचा जोर वाढला; सिद्धिविनायक मंदिरात पाणी शिरलं तर लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी ओसरली
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं अक्षरशः धुमशान घातला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. बंगलाच्या उपसागरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपटटी, मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: आरे'तील वृक्षतोडीविरोधात अमित ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन; पुढे या व्यक्त व्हा!
मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील झाडे तोडण्यासाठी मुंबई वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात मनसेने अनेकदा आंदोलनं केली आहेत. यातच पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाने आरेतील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत मनसेने मुंबईकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL