5 May 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम
x

Canara Robeco Mutual Fund | फंडे का फंडा, ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूकीचे पैसे अनेक पटींनी वाढवतेय, तुम्हीही पैसा वाढवा

Canara Robeco Mutual Fund

Canara Robeco Mutual Fund | कोविड नंतरच्या शेअर बाजारातील तेजीमध्ये काही शेअर्स इतके वाढले होते की त्यांनी अल्पावधीतच गुंतवणुकदारांना मालामाल केले होते. मागील काही महिन्यांत अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स बाजारात तयार झाले आहेत. यामुळे अनेक इक्विटी म्युच्युअल फंडांनीही चांगला लोकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. यापैकी एक फंड जबरदस्त म्युचुअल fund म्हणजे “कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड”. हा एक असा म्युच्युअल फंड आहे ज्याचा CAGR/कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट मागील तीन वर्षांत 38 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, या कालावधीत म्हणजे गेल्या 3 वर्षांत, या म्युचुअल फंड श्रेणीचा परतावा 30 टक्के पेक्षा अधिक राहिला आहे.

5 स्टार रेटिंग असलेला म्युचुअल फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 5 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा म्युचुअल फंड मागील अनेक वर्षापासून जबरदस्त सतत परतावा देत आहे. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या इक्विटी म्युच्युअल फंडात 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती, तर आजच तुमचे एकूण गुंतवणूक मूल्य 1.27 लाख रुपये झाली असते.

2 वर्षांतील परतावा :
जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात 10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती तर तुमची एकूण गुंतवणूक 2.40 लाख रुपये जमा झाली असती. परंतु परताव्याच्या रकमेसह तुम्हाला एकूण 3.18 लाख रुपये मिळाले असते.

3 वर्षांतील परतावा :
जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडमध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती, तर परताव्यासह तुम्हाला एकूण 6.34 लाख रुपये मिळाले असते. यात तुमची एकूण गुंतवणूक फक्त 3.60 लाख रुपये.होती, आणि त्यावर तुम्हाला 2.84 लाख रुपयांचा परतावा मिळाला.

इक्विटी म्युचुअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपोजर आहे. हा एक स्मॉल कॅप इक्विटी म्युच्युअल फंड असून बहुतेक पैसे इक्विटी फंडांमध्ये गुंतवतो. देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये या म्युचुअल फंडाने एकूण गुंतवणुकीपैकी 94.43 टक्के गुंतवणूक केली आहे. यातील 56.28 टक्के स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये, तर 16.98 टक्के आणि 3.55 टक्के अनुक्रमे मिड-कॅप आणि लार्ज-कॅप स्टॉकमध्ये गुंतवले जातात.

सर्वाधिक गुंतवणूक असलेले स्टॉक :
तुम्ही या इक्विटी म्युच्युअल फंडाच्या स्टॉक पोर्टफोलिओचे निरीक्षण केल्यास तुम्हाला समजेल की, यांनी सर्वाधिक गगुंतवणूक सिटी युनियन बँक, शेफ्लर इंडिया, सेरा सॅनिटरीवेअर, इंडियन हॉटेल्स कंपनी, सेंच्युरी टेक्सटाईल आणि इंडस्ट्रीज यांमध्ये केली आहे. असे इतर अनेक म्युचुअल फंडही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 3, 5 आणि 10 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. दरम्यान, काही तज्ज्ञ गुंतवणूकदारांना डेट म्युच्युअल फंडांकडेही लक्ष ठेवण्याचा सल्ला देतात. कारण वाढत्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा गुंतवणूक पर्याय अतिशय आकर्षक वाटत आहे. पुढील काळात व्याजदर आणखी वाढू शकतात, कारण आरबीआय रेपो दर आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Canara Robeco Mutual Fund investment opportunities and return on investment on 25 October 2022.

हॅशटॅग्स

#Canara Robeco Mutual Fund(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x