महत्वाच्या बातम्या
-
आता ट्रॅफिक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही
केंद्रीय परिवाहन मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर तुमच्या वाहनांची मूळ कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची ट्रॅफिक पोलिसांच्या नियमातून सुटका होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
नालासोपाऱ्यात ATS च्या धाडीत 'सनातन' साधकाच्या घरातून स्फोटकांचा साठा जप्त
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने म्हणजे एटीएसने नालासोपारा येथे धाड टाकून वैभव राऊत या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. परंतु सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा सनातनता साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असं स्पष्टीकरण दिल आहे. दरम्यान वैभव राऊत असं काही करेल असं मला वाटत नाहीअशी प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
VIDEO; माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत घोषणाबाजी..एक मराठा..लाख मराठा
बारामतीतील `गोविंदबाग`या शरद पवारांच्या बंगल्यासमोर आज मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी ठिय्या धरला. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आंदोलनकर्त्यांमध्ये सामील झाले. त्यांनी थेट ‘एक मराठा…लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद; मराठा आरक्षण मोर्चेकऱ्यांची उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी आणि राडा
औरंगाबादेत मराठा आरक्षण मोर्चेकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने मराठा क्रांतिमोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप आमदार व प्रवक्ते राम कदम'च मोदी भक्तांच्या ट्रॅपमध्ये, फेक व्हिडिओ'मध्ये मोदी व फडणवीसांना टॅग
मुख्य व्हिडिओमध्ये मोडतोड करून फेक व्हिडिओ बनविणे आणि ते वायरल करणे हे समाज माध्यमांवर नित्याचच झालं आहे. परंतु विषय गंभीर तेव्हा होतो जेव्हा एखाद्या पक्षाचा आमदार आणि प्रवक्ते पदावर असलेली जवाबदार व्यक्ती खोट्या गोष्टी समाज माध्यमांवर वायरल करते. तसाच काहीसा प्रकार केला आहे भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी तो सुद्धा ट्विट करत.
7 वर्षांपूर्वी -
मिशन २०१९; मुंबईत भाजपची आधुनिक टेक्नोलॉजीने वॉररूम सज्ज
भाजपने ‘मिशन २०१९’ची जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबईत आधुनिक टेक्नोलॉजीने सज्ज अशी ‘वॉररूम’ सुरू करण्यात आली आहे. याच ‘वॉररूम’मध्ये निवडणुकीची रणनिती आखली जाणार असून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मीरारोडचे रहिवासी मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकाकुल, पण भाजप नेते पार्टीत दंग
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ भारतीय जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली असताना मीरारोडचे स्थानिक भाजप नेते पार्टीत दंग झाले आहेत. भाजपचे स्थानिक नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस स्थानिक नेतेमंडळी तसेच आमदारांनी एकदम धुमधडाक्यात साजरा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
'एक देश, एक निवडणूक' अशक्य: मुख्य निवडणूक आयुक्त
काही महिन्यापासून वन नेशन वन ईलेक्शन’वर चर्चा रंगली असताना स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसे करायचे झाल्यास आधी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल तसेच ईव्हीएम’च्या दुप्पट म्हणजे तब्बल ४५ लाख मतदान यंत्र लागतील असं सांगत ‘एक देश, एक निवडणूक’ शक्य नसल्याचं कारण दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके'चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं निधन
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके’चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं आज चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झालं. रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी अधिकृत पत्रक काढून प्रसार माध्यमांना तशी माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
म्हाडाने करार केल्याशिवाय मुंबई 'बीडीडी चाळीं'च्या रहिवाशांनी घर सोडायचं नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विविध प्रश्नां संदर्भात कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे, तरी रहिवाशांचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने अखेर रहिवाशांनी राज ठाकरेंकडे सर्व प्रश्न आज भेट घेऊन मांडले.
7 वर्षांपूर्वी -
देशात तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम बंदी?
देशात जर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाच तर थेट फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. कारण तणावाच्या काळात अफवांचा सुळसुळाट वाढतो आणि अशावेळी परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत आहे.
7 वर्षांपूर्वी -
'ते' दुसरे उदयनराजे बनायला गेले, पण स्वतः उदयनराजें'नी 'तुम्ही उरका' आता म्हणत त्यांना जमिनीवर आणलं
मराठा आरक्षणावरून राजीनामा देणारे शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर बोलताना संधी मिळताच मूळ आरक्षणाच्या मुद्यावरील तोडगा किंवा मार्ग यावर न बोलता थेट मिळेल तेथे मराठ्यांच्या स्वतंत्र पक्ष काढण्यावर त्यांची गाडी घसरवताना वारंवार दिसत आहे. त्यामुळे त्यांचं राजीनाम्यानंतरच एकूण वागणं म्हणजे स्वतःला मराठ्यांच नैतृत्व म्हणून समोर आणण्याचा प्रयत्नं असल्याचं अनेकांना जाणवू लागल होत.
7 वर्षांपूर्वी -
उद्यापासून राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर
आज पार पडलेल्या राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ३ दिवसीय संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या या संपाचा पहिला दिवस असणार आहे, त्यामुळे सामान्यांची उद्या गैरसोय होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
गडकरीजी! देशातील सरकारी नोकऱ्यांबद्दल उत्कृष्ट प्रश्न विचारलात: राहुल गांधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नोकऱ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. कारण त्या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांना आयतीच संधी दिलेली आहे. त्याच विधानाचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींनी आरक्षण आणि सरकारी नोकरीची स्थिती याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल त्यांना खोचक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्ष संघटनेत निवडणूकपूर्व अनेक फेरबदल
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक मोठे फेरबदल होण्यास सुरुवात झाली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाईंची कोकण संपर्कप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत असलेली संपूर्ण कोकणाची जवाबदारी काढून केवळ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग’ची जवाबदारी ठेऊन एकनाथ शिंदेंकडे ठाणे, कल्याण, भिवंडी तसेच पालघरची जवाबदारी देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
गणेश उत्सव आला की सुटले सरकारचे फर्मान : राज ठाकरे
आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून त्याआधी न्यायालय आणि मुंबई महानगर पालिकेकडून निरनिराळे फार्मन सुटू लागल्याने राज ठाकरेंनी त्या मुद्याला हात घातला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आंदोलना दरम्यान परप्रांतीयांच्या हिंसक प्रकारामुळे नाव मराठा समाजाचं खराब होतंय: राज ठाकरे
आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी हिंसक घटना घडवून मराठा समाजाचं खराब करण्याचा प्रयत्नं केला असा गंभीर आरोप केला.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी आरक्षणाबाबत तोडगा काढा: उदयनराजे भोसले
आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील शेकडो समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषद पार पडली.
7 वर्षांपूर्वी -
खडसे'साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांना पंतप्रधानही व्हायला आवडेल
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल विधान केलं होत की, पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. परंतु, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत आहे. एकनाथ खडसेंच्या त्या प्रतिक्रियेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH