13 December 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Investment Tips | गुंतवणुकीवर 14 लाख परताव्याची हमी, बँक एफडीपेक्षा पैसे वेगाने वाढणार, योजनेबद्दल जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips | आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि त्याचा परिपाक म्हणजे ही वाढलेली महागाई आणि इंधन व गॅस दरवाढीमुळे शेअर बाजारावर दबाव आहे. यामुळे, गुंतवणूकदारांनी आता स्थिर उत्पन्न किंवा सुरक्षित हमी परतावा देणाऱ्या योजनांचा शोध सुरू केला आहे.

इंडिया पोस्ट स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम :
अस्थिरता आणि जागतिक घडामोडीमुळे निर्माण झालेली महागाई आणि दर वाढीमुळे इक्विटी मार्केटवर दबाव आहे. बाजारा परताव्याबाबत खूप अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा स्थिर उत्पन्न किंवा हमी परतावा मिळवून देणाऱ्या योजनांवर वाढत आहे. यामध्ये परतावा कमी असू शकतो परंतु खात्रीशीर सुरक्षा आणि कमी धोका, पैसे बुडण्याची भीती नाही. बहुतेक लोक लहान बचत म्हणून बँक एफडी निवडतात, परंतु अश्या काही योजना आहेत जे बँक एफडीपेक्षा जलद तुमचे पैसे दुप्पट करते. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC. ही योजना देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेता येते. NSC चा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. त्यावर सध्या ६.८ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे, जे FD वर मिळणाऱ्या व्याज पेक्षा जास्त आहे.

१० लाख गुंतवणुकीवर १४ लाख परतावा:
पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेवर सध्या वार्षिक ६.८ टक्के दराने व्याज मिळत आहे. तर या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. या अर्थाने, जर तुम्ही यामध्ये १० लाख रुपये गुंतवले तर ५ वर्षांत तुमची रक्कम १४ लाख रुपये होईल. या योजनेत, किमान १००० रुपयांमध्ये खाते उघडता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

NSC कसे घ्यावे :
कोणीही इच्छुक व्यक्ती एकल धारक प्रकारचे प्रमाणपत्र कोणत्याही प्रौढ व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या नावाने किंवा त्याच्या मुलाच्या नावाने खरेदी करू शकतो. १००, ५००, १०००, ५०००, १०००० किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे अधिक प्रमाणपत्रे NSC मध्ये उपलब्ध आहेत. त्यात गुंतवणुकीला मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणत्याही रकमेसाठी NSC खरेदी करून गुंतवणूक करू शकता.

NSC योजनेत सध्या वार्षिक ६.८ टक्के व्याजदर उपलब्ध आहे. येथे तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी १२६ महिने लागतील. त्याच वेळी, बहुतेक बँकांमध्ये, 5 वर्षांच्या FD वर फक्त ६ टक्के व्याजदर आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर (TD) व्याज दर देखील ६.७% टक्के प्रतिवर्ष आहे. हे स्पष्ट आहे की NSC मध्ये तुमचे पैसे लवकरच दुप्पट होतील.

प्रमाणपत्रांचे ३ प्रकार आहेत: 

सिंगल प्रकार:
या प्रकारचे प्रमाणपत्र स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी घेतले जाऊ शकते.

संयुक्त ए प्रकार:
या प्रकारचे प्रमाणपत्र संयुक्त खात्याद्वारे म्हणजे २ गुंतवणूकदार एकत्र घेऊ शकतात.

संयुक्त बी प्रकार:
या प्रकारच्या संयुक्त खात्यात २ लोक एकत्रितपणे पैसे गुंतवतात, परंतु मुदतपूर्तीवर पैसे फक्त एकाच गुंतवणूकदाराला दिले जातात.

योजनेचे फायदे:
NSC मध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला इतर काही सुत मिळते जसे की आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आपल्याला कर सूट मिळते. मात्र, ही सूट केवळ १०५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरच उपलब्ध आहे. NSC सर्व बँका आणि NBFC द्वारे कर्जासाठी सुरक्षा म्हणून स्वीकारले जाते त्यावर तुम्ही कर्ज ही घेऊ शकता. गुंतवणूकदार त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनी बनवू शकतो. NSC योजनेअंतर्गत तुम्ही ते इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करू शकता. हा कालावधी पूर्ण हस्तांतरण एकदाच केले जाऊ शकते. प्रमाणपत्र हस्तांतरित केल्यावर, जुन्या प्रमाणपत्रावर आणि त्याच्या खरेदी अर्जावरील जुन्या धारकाचे नाव कापून नवीन धारकाचे नाव लिहिले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेल्या पैशावर सरकारकडून १००% हमी आणि सुरक्षा दिली गेली आहे. म्हणजेच तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Investment Tips NSC 14 lakh profit on 10 lakh investment faster profit than FD on 18 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x