महत्वाच्या बातम्या
-
नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा...सरकारची विनंती
कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही.
4 वर्षांपूर्वी -
विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या | गृहमंत्र्यांचा खोचक टोला
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी (State Home Minister Anil Deshmukh) एका हिंदी सिनेमाच्या गाण्याच्या ओळी शेअर करत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय | अन्यथा मुंबई पोलीस - गृहमंत्री
बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन यावरुन राजकारण देखील तापले आहे. यावर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एक महत्वाची माहिती दिली आहे. एनसीबीने तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
योगी दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात | पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं
“योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्याच राज्यामध्ये जंगलराज आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”, असा सणसणीत टोला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाथरस प्रकरणावरून योगींना लगावला आहे. (Home Minister Anil Deshmukh Slam Yogi Adityanath over Hathras Rape Case)
5 वर्षांपूर्वी -
राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे | IPS अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न - गृहमंत्री
राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ‘लोकमत’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता, असे देशमुख यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
भाजप खा. उन्मेष पाटील यांचं माजी सैनिकाला मारहाण प्रकरण | सरकारचे चौकशीचे आदेश
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता राज्यातील वातावरण आणखीनच तापू लागले आहे. एका कार्टूनच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. मात्र, आता याच मुद्द्यावर अडचण वाढत असल्याचे पाहून शिवसेनेने २०१६’चा मुद्दा उकरून काढला आहे. यात भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकावर हल्ला केला होता. यासंदर्भात आता राज्यातील शिवसेना अथवा ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंह प्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी | गृहमंत्रालयाने सीबीआयला निवेदन सोपवले
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या तक्रारीसंदर्भातलं निवेदन गृहमंत्रालयाने सीबीआयकडे दिले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सुशांत मृत्यूशी भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे. या सगळ्याला भाजपनंही उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु : गृहमंत्री
देशभरात पसरलेल्या करोनानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याचं आव्हान निर्माण झाल्यानं केंद्र सरकारबरोबरच राज्यानीही लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यामुळे माल वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. याचे परिणाम आर्थिक स्वरूपात दिसून आल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यांना राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यातील वाहतूक विना निर्बंध सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
१२,५३८ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य गृहविभागाला आदेश
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर आहे. कारण, राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
ALERT - प्लाझ्मा थेरेपीसंदर्भात सामान्यांची फसवणूक, गृहमंत्र्यांनी दिला इशारा
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभम मिश्राला अटक
इन्स्टाग्रामवरील शुभम मिश्रा या तरुणाने जोशुआला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप स्वराने केला होता. यासंदर्भात तिने काही ट्विट केले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच शुभम हा गुजरातचा असल्याची शक्यता असल्याने गुजरात पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. “सर इन्स्टाग्राम इनफ्ल्यूएन्सर असणाऱ्या शुभम मिश्रा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अग्रिमा जोशुआला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांनी केलेल्या १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून रद्द
काल चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहता येणार
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या काळात कर्तव्य बजावताना आपला जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटूंबासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या कुटुंबांना सरकार ६५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवाय त्यांना सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत सरकारी निवासस्थानात राहता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON