महत्वाच्या बातम्या
-
धारावी स्पोर्ट्स कॉम्पेक्समधील क्वारंटाईन कक्षात सुविधाच उपलब्ध नाही; नागरिक संतप्त
काल रविवारी राज्यात १९८२ रुग्ण होते. त्यात आता ८२ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा २०६४ झाला आहे. गेल्या १२ तासांत मुंबईत ५९, मालेगावमध्ये १२, ठाण्यात ५, पुण्यात ३, पालघरमध्ये दोन आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड, नागपूर, यवतमाळ, जळगाव, औरंगाबादमध्ये गेल्या १२ तासांत एकही रुग्ण सापडलेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
थाळ्या-टाळ्या वाजवूनही परिस्थिती गंभीर; 'डिजिटल' मंत्र्यांना हजर होण्याचे केंद्राचे आदेश
आज देशव्यापी लॉकडाउनचा २० वा दिवस असून देशभरातील रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात रुग्णांची संख्या ९,००० वर पोहोचली असून आतापर्यंत ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सोमवारपर्यंत कोरोना विषाणूची बाधा होऊन ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत भारतात ३५ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तर ६२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात रुग्णांची संख्या ही ९ हजार १५२ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केवळ २४ तासात भारतात कोरोनाचे ६२० नवे रुग्ण
जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १८ लाखांवर गेला असन १ लाख १४ हजार जणांनी जीव गमावला आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ४४७ झाली आहे. आतापर्यंत २७३ जणांनी यामध्ये जीव गमावला आहे. तर ७६५ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आपले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आपापले कामकाज संभाळण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून स्थगित केलेला इयत्ता दहावीचा बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर इयत्ता नववी आणि अकरावीची परीक्षाही होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: पॉर्न पाहण्यात भारतीय जगात अव्वल; तब्बल ९५% ची वाढ
सध्या जगभरात जीवघेण्या करोना व्हायरसने अक्षरशा थैमान घातले आहे. सध्या याचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार गत २४ तासांत एकट्या अमेरिकेत करोनामुळे तब्बल १ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८३५६ वर, १२७ रुग्णांना डिस्चार्ज
भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात विदेशी नागरिकांसह कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ८ हजार ३५६ वर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत रविवारी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे २७३ रुग्णांचा मृत्यू झाला तर कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार ३७६ वर पोहचला होता. तर २४ तासांमध्ये कोरोनाचे आणखी ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करतात? राष्ट्रवादीचं फेसबुक-ट्विटर हॅन्डल फॉलो करत जा
महाराष्टारीत करोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: काही भागात आरएसएस कार्यकर्ते थेट पोलिसांच्या भूमिकेत? प्रवाशांची झडती
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरु आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित IT रिटर्न आणि GST रिटर्न त्वरीत जारी केले जाणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला होता. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली होती. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मित्रांनो घरातच थांबा! जसं राज्यातून आमचं भाजप सरकार गेलंय तसा कोरोनाही जाईल
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज कोरोनाचे आणखी १३४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,८९५ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत राज्यात १२७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शर्मिला राज ठाकरे यांच्याकडून पोलिसांना पीपीई किट वाटप; पोलिसांची सुरक्षा महत्वाची
राज्यातील करोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरी आव्हान आणखी वाढले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात लॉकडाऊन वाढत राहिल्यास भयानक आर्थिक परिणाम होतील: जागतिक बँक
जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला. या अहवालात २०१९-२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ५ टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा १८९५वर; राज्य तीन विभागात विभागणार
राज्यातील करोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरी आव्हान आणखी वाढले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ करोना रुग्ण आढळले असून त्यात आज दिवसभरात सापडलेल्या १३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच गेल्या २४ तासांत १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२७वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: टवाळखोरांनी पोलिसाचा तलवारीने हात छाटला
लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलीस अधिकाऱ्याचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. यामध्ये आणखी काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. हे सर्वजण सनोर भाजीपाला मार्केटच्या परिसरात वाहन घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांकडे कर्फ्यु पासची विचारण केली. मात्र, या टोळक्याकडे कोणतेही पास नसल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.
5 वर्षांपूर्वी -
PM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले
पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अमेरिकेत थैमान, केवळ २४ तासांत १९२० बळी
जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या पाच लाखांहून अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या २० हजारांहून अधिक झाली आहे. करोनाच्या संसर्गाने आता सर्वाधिक मृत्यूंची नोंद अमेरिकेत झाली आहे. युरोप, अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. इटली व स्पेनमध्ये मागील काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत स्थिरता आल्याचे चित्र आहे. इटलीत १९ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, स्पेनमध्ये १६ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: ताज हॉटेलच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबईत कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ होत चालली आहे. अशात दक्षिण मुंबईतील पंचतारांकित ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. ताज हॉटेलमधील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई धारावीत प्रत्येकाच्या घरी जाऊन कोरोना स्क्रिनिंग सुरू
मुंबईतील धारावीमध्ये आणखी एकाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालाय. बलिगा नगर परिसरातील ८० वर्षांच्या रूग्णाच्या मृत्यूनंतर धारावीतील मृतांचा आकडा हा चारवर पोहचला आहे. आतापर्यंत या भागात २८ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले असून परिसर संपूर्पणे सील करण्यात आलाय. मुंईतील सर्वाधिक धोकादायक क्षेत्र म्हणून धारावीकडे पाहिले जात असून या भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती : मुंबईतील धारावीत कोरोनाचा चौथा बळी
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे हे सत्य आहे. पंतप्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मला बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी १४ तारखेनंतरही लॉकडाऊन ठेवणार असल्याचं त्यांना सांगितले. राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषित केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार: मुख्यमंत्री
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे हे सत्य आहे. पंतप्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मला बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी १४ तारखेनंतरही लॉकडाऊन ठेवणार असल्याचं त्यांना सांगितले. राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषित केले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL