महत्वाच्या बातम्या
-
एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसमोर स्थानिक शिवसैनिकांचे सेल्फी-शो
एल्फिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरी दुर्घटनेत अनेक मुंबईकरांनी त्यांचे प्राण गमावले होते. आज त्याच दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मुंबईकरांच्या आयुष्यातील ती एक न विसरता येणारी अत्यंत दुःखद घटना होती. आजही ती घटना आठवली तरी मृतांच्या नातेवाईकांचे डोळे पाणावतात. त्या घटनेला एक वर्ष झाल्याच्या कारणाने मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रभादेवी स्थानकाजवळ सकाळी शेकडो मुंबईकर तसेच मृतांचे नातेवाईक आले होते. त्यावेळी एकाबाजूला संबंधित ठिकाणी पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सेल्फी-शो जोरात सुरु असल्याचे पाहून मृतांचे नातेवाईक तो संताप डोळ्यात साठवत होते.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र टोल मुक्त कधी होणार?
व्हिडिओ: २०१४ मध्ये जाहीर केलेल्या वचननाम्यात शिवसेना आणि भाजपने महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे वचनच दिले होते, परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला. मुंबई प्रवेशद्वारांवर असलेले टोलनाके म्हणजे ट्रॅफिक आणि प्रदूषण समस्या निर्माण करणारे मूळ होय.
7 वर्षांपूर्वी -
कामालाही सुरुवात नाही आणि समाज माध्यमांवर 'करून दाखवलं' प्रोमोशन सुसाट
कालच मुंबई महानगरपालिका बांधत असलेल्या कोस्टल रोडच्या तब्बल १२,००० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली. मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोकापर्यंतच्या कामाला सुरवात होणं अजून प्रलंबित आहे. या कोस्टल रोडचे नियोजित बांधकाम पूर्ण होण्यास ४ वर्षाचा कालावधी लागणार असला तरी मुंबईत कधी सुसाट व्हायची ती होईल, परंतु, समाज माध्यमांवर प्रोमोशन मात्र सुसाट सुरु झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
7 वर्षांपूर्वी -
नाशिक : मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने पंचाग पाहून मंत्रिमंडळ विस्तार - गुलाबराव पाटील शिवसेना आमदार
नाशिक : मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने पंचाग पाहून मंत्रिमंडळ विस्तार – गुलाबराव पाटील शिवसेना आमदार
7 वर्षांपूर्वी -
गुलाबराव पाटलांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली, ब्राह्मण असल्याने पंचाग पाहून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील
प्रसार माध्यमांनी लवकरच होऊ घातलेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाविषयी सहज प्रश्न विचारला असता त्यांनी असं उत्तर दिल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवताना आमदार गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना राजवटीत महाराष्ट्राचा औद्योगिक विकासदर घसरला: राज्य सरकारची कबुली
भाजप-शिवसेना राजवटीत महाराष्ट्राचा औद्योगिक विकासदर घटत असून महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात अधोगती होत असल्याचे आकडेवारीत स्पष्ट होत आहे. या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये ८ टक्के असलेला औद्योगिक विकासदर २०१७-१८ या आर्थिक वर्षात थेट ६.५ टक्क्यांवर घसरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर न बोलण्याची सूचना मला शिवसेनेकडून देण्यात आली होती : हर्षवर्धन जाधव
शिवसेनेचे कन्नड मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढण्याच्या विषयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, शिवसेनेने जी काही धोरणे घेतली आहेत, ती मला अजिबात पटलेली नाहीत. त्यात मराठा आरक्षणावर काहीही बोलायचे नाही, अशी सक्त सूचना मला देण्यात आली होती. परंतु त्यांची ती सूचना मला पटली नाही. त्यात शिवसेनेची इतर काही धोरणे सुद्धा मला पटलेली नाहीत. तेव्हाच मी त्यांच्याबरोबर आता अजिबात थांबायचे नाही, असे ठरविले होते.
7 वर्षांपूर्वी -
नैतृत्वावर आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून पैशाच्या मोबदल्यात उपऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपूरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सेनेला घनसावंगी विधानसभा मतदासंघात फटका बसण्याची शक्यता.
7 वर्षांपूर्वी -
कोकण; अतिउत्साही शिवसेना नेत्यांकडून 'बाप्पाला' बॉक्समधून लगेज'ने चिपी विमानतळावर आणून प्राणप्रतिष्ठा
आज कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी लागणा-या ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने मिळाले असताना घाईघाईने एचडीएल कंपनीचे खासगी विमान उतरविण्याचा अतिउत्साहीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे गणेश चतुर्थीच्या तोंडावर गणरायाचं प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं, परंतु त्याच गणरायाला लगेज’मध्ये बॉक्समधून भरून आणण्यात आलं. सार्वजानिक असो वा घरगुती ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करतांना त्याला ‘सीलबंद’ करून आणण्यात येत नाही.
7 वर्षांपूर्वी -
समाज माध्यमांवर एकच हशा! बंद सेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते
आज इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या भारत बंद आंदोलना विषयी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जी टिपणी केली, त्या विधानाची समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणावर खिल्ली उडवण्यात येत आहे. खासदार संजय राऊत आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काँग्रेसचे भारत बंद आंदोलन पूर्णपणे फसले आहे. परंतु हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते, असं विधान केलं आणि त्यांच्या प्रतिक्रियेची समाज माध्यमांनी चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
गल्ली ते दिल्ली सत्तेत सामील असलेल्या सेनेची 'हेच काय अच्छे दिन?' अशी पोश्टरबाजी
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रसाद लाड म्हणतात नाणार प्रकल्प होणारच, पण कोकणी माणूस भाजपचे हे 'लाड' सहन करणार?
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले . दरम्यान, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाणार विषयावर बोलताना ‘नाणार प्रकल्प काही झाले, तरी आम्ही करणार’ असं धक्कादायक विधान केलं आणि त्यामुळे भाजप विरोधात कोकणात संतापाची लाट येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची शिवसेनेकडून गंभीर दखल, सामाना'तून संकेत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. त्यासाठी पक्षाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पक्षाच्या विश्वासातील सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई-ठाणे आज दहीहंडी गोविंदा पथक गाजवणार
जन्माष्टमीची रात्र सरली असून आज सकाळपासून दहीहंडीचा जल्लोष मुंबई ठाण्यात जोरदार सुरु झाला आहे. मागील २ वर्षे सार्वजनिक दहिकाल्यावर न्यायालयाच्या नियमावली लागू झाल्याने अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली होती. असे असले तरी सुद्धा दहीहंडी उत्सवाचा आणि दहीहंडी पथकांचा आनंद कमी झालेला नाही.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने पडद्याआड गेम केला? हाजी अराफात शेख यांनी शिवसेनेचं शिवबंधन गुपचूप तोडलं
शिवसेनेचे उपनेते तसेच वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी काल गुपचूप शिवसेनेचं शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला. कारण भाजपने आधी त्यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली आणि शिवसेनेपुढे संभ्रम ठेऊन त्यांना एकारात्रीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: 'आम्हाला महामंडळच नको' ही भूमिका बदलत, संधी मिळताच सेनेने ५ मलईदार महामंडळ घेतली
मागील महिन्यातच म्हणजे जुन मध्ये युतीतील तेढ इतकं टोकाला गेलं होत की महामंडळांच्या नियुक्त्यांवरून शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते अनिल देसाई यांनी थेट पक्ष प्रमुखांच नाव घेत, महामंडळावरील नियुक्त्यांवरून तीव्र मत प्रदर्शन करून उद्धव ठाकरेंची भूमिका प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केली होती.
7 वर्षांपूर्वी -
सेना आमदार किणेकरांविरुद्ध अंबरनाथमध्ये संताप वाढत आहे? यापूर्वी सुद्धा त्यांना भीमनगर परिसरात महिलांनी घेरलं होत: VIDEO
शिवसेनेचे अंबरनाथमधील आमदार बालाजी किणेकरांविरुद्ध स्थानिकांमध्ये दिवसेंदिवस रोष वाढताना दिसत आहे. शहरातील खराब रस्त्यांना कंटाळल्यामुळे शहरात त्यांच्याविरुद्ध होर्डिंगबाजी सुरु झाली आहे. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, त्याचा सामान्यांना प्रचंड त्रास होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची महत्वाची बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची आज शिवसेना भवनमध्ये महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून सर्व नेतेमंडळींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अटलजींचे निधन नक्की कोणत्या तारखेला? संजय राऊतांना तारखेबद्दल शंका
मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगते अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची केवळ घोषणा करण्यात आली होती, अशी शंका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL